IPL season17 : भारतीय क्रिकेट गाजवणाऱ्या पाच दिग्गज खेळाडूंचे 2024 ठरणार शेवटचं आयपीएल; दोन नावं धक्कादायक..

0

IPL season17 : काल आयपीएल 2024 (ipl 2024) चे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. 22 मार्चपासून आयपीएलला सुरुवात होणार आहे. आयपीएलचे चेअरमन अरुण धुमाळ (Arun Dhumal) यांनी वेळापत्रक जाहीर केले. मात्र लोकसभा निवडणुकांमुळे (Loksabha elections) केवळ पंधरा दिवसांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. या 15 दिवसांमध्ये 21 सामने खेळवण्यात येणार आहेत. लोकसभा निवडणूकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर, उर्वरित वेळापत्रक जारी केलं जाणार आहे.

आयपीएल 2024 चा पहिला सामना चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर बंगलोर यांच्यामध्ये चेन्नईच्या मैदानावर खेळवण्यात येणार आहे. विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनी आमने-सामने येणार असल्याने या सामन्याची उत्सुकता चाहत्यांना देखील मोठ्या प्रमाणात लागून राहिली आहे. एकीकडे आयपीएलची उत्सुकता लागून राहिली असती तरी, दुसरीकडे भारतीय संघात दमदार कामगिरी केलेल्या अनेक खेळाडूंचा हा सिझन अखेरचा देखील ठरणार आहे.

आयपीएल नंतर याच वर्षी आगामी सीजनसाठी मेगा ऑक्शन होणार आहे. त्यामुळे कोणते खेळाडू कोणत्या संघात जाणार? कोण कर्णधार असेल ? याची मोठी उत्सुकता चाहत्यांना देखील लागली आहे. पुढच्या काही वर्षांसाठी संघ बांधण्याच्या दृष्टीने ऑक्शन टेबलवर संघ मालक नवीन खेळाडूंवर बोली लावणार आहेत. साहजिकच त्यामुळे अधिक वय असणाऱ्या खेळाडूंकडे दुर्लक्ष केले जाणार हे निश्चित आहे.

IPL नंतर याच वर्षी मेगा ऑक्शन होणार असल्याने, अनेक खेळाडूंची 2024 आयपीएल स्पर्धा अखेरची असणार आहे. यामध्ये पाच दिग्गज भारतीय खेळाडूंचा देखील समावेश आहे. भारताला आयसीसीच्या तिन्ही ट्रॉफी जिंकून देणाऱ्या महेंद्रसिंग धोनीचा (mahendra singh Dhoni) देखील 2024 आयपीएल सीझन अखेरचा सीजन असणार आहे. गेली दोन सीजन महेंद्रसिंग धोनीचा हा शेवटचा सिझन असल्याचं वारंवार बोललं गेलं.

मात्र महेंद्रसिंग धोनी अनेकांना आश्चर्य चकित करत पुन्हा मैदानात उतरला. यावेळी मात्र तो पुन्हा आयपीएलमध्ये क्रिकेट खेळताना दिसणार नसल्याची माहिती समोर आली आहे. महेंद्रसिंग धोनी नंतर दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) देखील 2024 आयपीएल स्पर्धेनंतर खेळताना दिसणार नाही. दिनेश कार्तिक सध्या 38 वर्षाचा आहे. तो देशांतर्गत क्रिकेट देखील खेळत नाही. आयपीएल नंतर मेगा ऑक्शन होणार असल्याने, त्याला बोली लागण्याची देखील शक्यता कमी आहे. त्यामुळे त्याचा देखील हा सिझन अखेरचा सिझन ठरणार आहे.

शिखर धवनकडे (shikhar dhavan) पंजाब संघाचे नेतृत्व आहे. शिखर धवन देखील 38 वर्षाचा आहे. शिखर देखील देशांतर्गत क्रिकेट खेळत नाही. भारतीय संघापासून देखील शिखर धवन गेल्या काही वर्षांपासून दूर आहे. त्यामुळे त्याचा देखील हा सिझन अखेरचा सिझन ठरण्याची शक्यता आहे. ईशांत शर्मा (ishant sharma) आणि पियूष चावला (piyush chawla) या दोघांचा देखील हा सिझन अखेरचा सिझन ठरणार आहे. तसं पाहायला गेलं, तर अनेक खेळाडूंचा हा सिझन अखेरचा सीजन असेल. मात्र भारतीय संघासाठी दर्जेदार कामगिरी केलेल्या या पाच खेळाडूंना आता पुन्हा खेळताना पाहता येणार नाही.

हे देखील वाचा  IPL 2024 Schedule : 22 मार्च ते 7 एप्रिल पर्यंतचे IPL 2024 वेळापत्रक जाहीर; उर्वरित सामने कधी? वाचा सविस्तर..

Abhishek Sharma Tanya Singh : गर्लफ्रेंड आत्महत्या प्रकरणात अभिषेक शर्मा अडचणीत; त्या संबंधामुळे पोलिसांनी..

Shreyas Iyer vs BCCI : ईशान नंतर आता श्रेयस अय्यरच्या करिअरला खीळ! खोटं बोलल्यामुळे कारवाई; त्या पत्रामुळे पडला उघडा..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.