Abhishek Sharma Tanya Singh : गर्लफ्रेंड आत्महत्या प्रकरणात अभिषेक शर्मा अडचणीत; त्या संबंधामुळे पोलिसांनी..

0

Abhishek Sharma Tanya Singh: भारतामध्ये क्रिकेटला प्रचंड लोकप्रियता प्राप्त झाली आहे. भारतात क्रिकेट सर्वाधिक लोकप्रिय खेळ असून आयपीएलमुळे या खेळाला अधिक महत्त्व प्राप्त झालं आहे. केवळ लोकप्रियताच नाही, तर आयपीएलमुळे कमी वयात खेळाडू मालामाल देखील झाले आहेत. साहजिकच लवकर पैसा आल्यामुळे खेळाडूं कडून वाकडं पाऊल देखील पडण्याची दाट शक्यता असते.

सनरायझर्स हैदराबाद (sunrisers Hyderabad) संघाचा खेळाडू अभिषेक शर्मा (Abhishek Sharma) अडचणीत आला. सुरत मॉडेल तानिया (tanya singh) सिंगने गळफास घेऊन आपले जीवन संपवल्याने अभिषेक शर्मा (Abhishek Sharma) अडचणीत आला आहे. तानिया आत्महत्या प्रकरणात अभिषेक शर्माला पोलिसांकडून समन्स पाठवण्यात आले असून, अभिषेक शर्माची चौकशी केली जाणार आहे.

अभिषेक शर्मा हा प्रतिभावावर भारतीय खेळाडू आहे. सनरायझर्स हैदराबाद संघाचे तो प्रतिनिधित्व करतो. याशिवाय पंजाब संघाकडून देखील देशांतर्गत क्रिकेट खेळतो. आता सुरू असलेल्या रणजी ट्रॉफीमध्ये त्याने दमदार कामगिरी केली आहे. भारतीय संघाचा कमबॅक बॉय म्हणून ओळखला जाणारा माजी डावखुरा फलंदाज युवराज सिंग आणि त्याचे खूप जवळचे संबंध देखील आहेत. अभिषेक शर्माने रणजी ट्रॉफीमध्ये नुकताच एक रेकॉर्ड केला आहे. तामिळनाडू विरुद्ध खेळताना त्याने एकाच ओव्हरमध्ये पाच षटकार लगवण्याचा कारनामा देखील केला आहे.

अभिषेक शर्मा प्रतिभावान खेळाडू आहे. आयपीएलमध्ये त्याने एनेकदा आपल्या आक्रमक फलंदाजीची चुणूक दाखवली आहे. आता मात्र तो अडचणीत आला आहे. सुरत मॉडेल तानिया सिंगचा तो खूप जवळचा मित्र असल्याचं समोर आले आहे. दोघेही एकमेकांवर प्रेम करत होते, असं देखील बोललं जात आहे. मात्र याविषयी अधिकृत माहिती समोर आली नाही.

तानिया सिंगने आपले जीवन संपल्यानंतर आता पोलीस अधिक तपास करत आहेत. सानियाच्या फोन कॉलमध्ये पहिलं नाव अभिषेक असल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. मात्र दोघे बऱ्याच दिवसांपासून एकमेकांसोबत बोलले नसल्याचे देखील समोर आलं आहे. तानियाने आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या फोन कॉलमध्ये अभिषेकचा नंबर डायल केला असल्याचा खुलासा झाला आहे. साहजिक त्यामुळे त्याला चौकशी करण्यासाठी स्थानिक पोलिसांकडून समन्स पाठवण्यात आले आहे.

हे देखील वाचा  IND vs ENG 4th test in Ranchi : रोहित शर्माला नाईलाजाने करावे लागणार संघात दोन बदल; असा असेल चौथ्या कसोटीसाठी भारतीय संघ..

Shreyas Iyer vs BCCI : ईशान नंतर आता श्रेयस अय्यरच्या करिअरला खीळ! खोटं बोलल्यामुळे कारवाई; त्या पत्रामुळे पडला उघडा..

Rohit Sharma IPL 2024 : हार्दिक, सूर्या, बुमराहला देण्यात आला महत्वाचा रोल; आयपीएल मधून रोहित शर्मा बाहेर..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.