IPL 2024 Schedule : 22 मार्च ते 7 एप्रिल पर्यंतचे IPL 2024 वेळापत्रक जाहीर; उर्वरित सामने कधी? वाचा सविस्तर..

0

IPL 2024 Schedule : आयपीएल 2024 चे बिगुल आता वाजले आहे. दीर्घ प्रतीक्षा नंतर आता क्रिकेट चाहत्यांना आयपीएल 2024 कधीपासून सुरू होणार, याची माहिती मिळाली आहे. नुकतेच आयपीएल 2024 चे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. आयपीएलचे वेळापत्रक जाहीर झाले असले तरी, यंदा आयपीएल दोन हंगामात खेळले जाणार आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये काहीशी नाराजी देखील आहे. जाणून घेऊया सविस्तर.. (IPL 2024 Schedule announced)

यावर्षी आयपीएल आणि लोकसभा निवडणुका (IPL and Loksabha election) एकत्र येत असल्याने आयपीएल चेअरमन अरुण धुमाळ (arun Dhumal) यांनी केवळ पंधरा दिवसांचे वेळापत्रक तयार केले आहे. उर्वरित स्पर्धा लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर, जाहीर करण्यात येणार आहे. आयपीएलचा पहिला सामना 22 मार्चला चेपॅक मैदानावर चेन्नई आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यामध्ये खेळण्यात येणार आहे. (RCB vs CSK 1St match 2024)

मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाचे नेतृत्व हार्दिक पांड्याकडे (Hardik Pandya) देण्यात आले आहे. रोहित शर्माला (rohit sharma) आता हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात खेळावं लागणार आहे. त्यामुळे रोहित शर्माच्या चाहते मुंबई इंडियन्स संघाचा सामना पाहण्यासाठी उत्सुक आहेत. मुंबई इंडियन्स संघाचा सामना एक एप्रिलला मुंबईच्या वानखेडे मैदानावर राजस्थान रॉयल्स विरुद्ध खेळवण्यात येणार आहे.

22 मार्चपासून आयपीएल सुरुवात होणार असली तरी केवळ पंधरा दिवसांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. पंधरा दिवसांमध्ये एकूण 21 सामने खेळवण्यात येणार आहेत. लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर, उर्वरित वेळापत्रक जाहीर केले जाणार आहे. यावर्षी एक जून पासून टी-ट्वेंटी विश्वचषकाला देखील सुरुवात होणार आहे. त्यामुळे टी-ट्वेंटी विश्वचषकापूर्वी आयपीएल स्पर्धा पूर्ण करण्याचे आव्हान देखील आयोजकांवर असणार आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आयपीएल 2024 चा फायनल 26 मे रोजी खेळवण्यात येणार आहे. वैयक्तिक कारणामुळे इंग्लंड विरुद्धच्या मालिकेत विराट कोहली (Virat Kohli) खेळू शकला नाही. विराट कोहली दुसऱ्याला पिता झाला आहे. त्यामुळे तो आपल्या परिवारासोबत वेळ घालवतो की क्रिकेट खेळण्यासाठी सज्ज होतो हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे. विराट सुरुवातीचे काही सामने खेळणार नसल्याची माहिती आहे. आयपीएलचा पहिला सामना आरसीबी आणि चेन्नई विरुद्ध खेळण्यात येणार आहे. हा सामना विराट कोहली खेळणार की नाही, याचीही उत्सुकता अनेकांना लागली आहे.

हे देखील वाचा  Abhishek Sharma Tanya Singh : गर्लफ्रेंड आत्महत्या प्रकरणात अभिषेक शर्मा अडचणीत; त्या संबंधामुळे पोलिसांनी..

IND vs ENG 4th test in Ranchi : रोहित शर्माला नाईलाजाने करावे लागणार संघात दोन बदल; असा असेल चौथ्या कसोटीसाठी भारतीय संघ..

Shreyas Iyer vs BCCI : ईशान नंतर आता श्रेयस अय्यरच्या करिअरला खीळ! खोटं बोलल्यामुळे कारवाई; त्या पत्रामुळे पडला उघडा..

 

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.