Virat Kohli Son Citizenship : विराट कोहलीचा मुलगा अकाय कोहली होणार इंग्लंडचा नागरिक? हा आहे इंग्लंडच्या नागरिकत्वचा नियम..

0

Virat Kohli Son Citizenship : विराट कोहली (Virat kohli) आणि त्याच्या परिवारासाठी सध्या आनंदाचा काळ आहे. विराट कोहली दुसऱ्यांदा पिता झाला असून यावेळी त्याला मुलगा झाला आहे. एकूणच विराट कोहलीची फॅमिली आता कम्प्लिट झाल्याने, विराट कोहलीचा परिवार देखील प्रचंड आनंदी आहे. केवळ परिवारातच नाही, तर क्रिकेट चाहत्यांमध्ये देखील विराट कोहलीच्या मुलाची क्रेज सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहायला देखील मिळत आहे.

विराट कोहलीने मुलगा झाला असल्याचं जाहीर केल्यानंतर, सोशल मीडियावर अकाय कोहलीचा (akaay kohli) डंका वाजू लागला आहे. सोशल मीडियावर विराट कोहलीच्या चाहत्यांनी अकाय कोहली क्रिकेटर होणार, हे जाहीर देखील करून टाकले. अनुष्का शर्माने (anushka sharma) लंडनमध्ये आपल्या बाळाला जन्म दिला असल्याने सोशल मीडियावर विराट कोहलीच्या मुलाला इंग्लंडचे नागरिकत्व मिळणार, अशा देखील चर्चा सुरू झाल्या.

इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेतून विराट कोहलीने माघार घेत, आपल्या परिवारासोबत राहणं पसंत केलं. 15 फेब्रुवारीला विराट कोहलीने आपल्या दुसऱ्या अपत्याला जन्म दिला. विराट कोहलीने आपल्या मुलाचे नाव अकाय ठेवले असल्याची माहिती देखील दिली. मात्र विराट कोहलीच्या मुलाने लंडनमध्ये जन्म घेतल्याने, त्याला इंग्लंडचे नागरिकत्व मिळणार अशा चर्चा सुरू झाल्या. मात्र इंग्लंडचे नागरिकत्व मिळवण्यासाठीचा नियम वेगळा आहे.

जरी अकाय कोहलीचा जन्म इंग्लंडमध्ये झाला असला, तरी त्याला इंग्लंडचे नागरिकत्व मिळणार नाही. यूकेमध्ये जन्म झाला असला तरी स्वतःहून नागरिकत्व मिळत नाही. जर कोणालाही इंग्लंडचे नागरिकत्व हवं असेल, आई किंवा वडील दोघांपैकी किमान एकजण ब्रिटिश नागरिक असायला हवा. याशिवाय पालक अनेक वर्षांपासून युकेमध्ये राहत असायला हवेत.

जर पालकांना इंग्लंडचे नागरिकत्व असेल, आणि त्यांनी आपल्या मुलाला इतर देशात जन्म दिला तर मात्र ब्रिटिश नागरिकत्व मिळते. इतर देशातून आलेल्या नागरिकांनी आपल्या मुलाला इंग्लंडमध्ये जन्म दिल्यास ब्रिटिश नागरिकत्व बहाल केले जात नाही. त्यामुळे विराट कोहलीचा मुलगा अकाय कोहलीला ब्रिटिश नागरिकत्व मिळणार नाही.

हे देखील वाचा IND vs ENG 4th test in Ranchi : रोहित शर्माला नाईलाजाने करावे लागणार संघात दोन बदल; असा असेल चौथ्या कसोटीसाठी भारतीय संघ..

Love tips : मुलगी तुमच्यावर फिदा असल्यावर देते हे चार इशारे..

Ishan Kishan Shreyas Iyer : BCCI ने श्रेयस अय्यर ईशान, किशनला करारातून वगळले; एक वर्ष संधीही नाही, निर्णयाची अंमलबजावणी बाकी..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.