Love tips : मुलगी तुमच्यावर फिदा असल्यावर देते हे चार इशारे..

0

Love tips : प्रेम म्हणजे प्रेम (love) असतं. तुमचं आमचं अगदी सेम असतं. प्रेम कधीही, कोणालाही, केव्हाही होऊ शकतं. प्रेमाला वय नसतं, असं देखील बोललं जातं. अनेकजण खूप लाजाळू असतात. एखादी मुलगी किंवा मुलगा प्रचंड आवडत असताना देखील आपलं प्रेम व्यक्त करण्याचे धाडस अनेकांना होत नाही. साहजिकच त्यामुळे अनेक जण आपल्या मनातल्या भावना बोलून न दाखवल्यामुळे सिंगलच राहतात. एकीकडे ही वस्तुस्थिती असली तरी दुसरीकडे एखादी मुलगी तुमच्यावर फिदा असेल, तर ती काही इशारे देखील देते. जाऊन घेऊया सविस्तर..

जर तुम्ही देखील एखाद्या मुलीवर प्रेम करत असाल, आणि तिला तुमचं प्रेम व्यक्त करण्याचे धाडस होत नसेल, तर चिंता करण्याची काही आवश्यकता नाही. तुम्ही प्रेम करत असलेली मुलगी तुमच्यावर प्रेम करत आहे, की नाही हे तुम्हाला तपासता येणार आहे. प्रेमात पडलेली मुलगी काही इशारे देते. जर तुम्हाला प्रेमात पडलेल्या मुलीचे इशारे माहिती असतील, तर तुम्ही कोणतीही भीती न बाळगता प्रपोज करू शकता.

प्रेमात पडलेली मुलगी तुमच्याशी बोलण्याचा बहाना शोधण्याचा नेहमी प्रयत्न करते. जर एखादी मुलगी तुमच्यावर फिदा असेल, तर तिला तुमच्या सोबत बोलायला आवडतं. आपल्या अनेक सिक्रेट गोष्टी निःसंकोचपणे एखादी मुलगी शेअर करत असेल, तर समजून जा की तुमच्या प्रेमात पडली आहे. एखादी मुलगी आपल्या वैयक्तिक आयुष्याविषयी इतरांना काही गोष्टी शेअर करत असेल, तर याचा अर्थ तिला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे.

कुठलाही संवाद सुरुवातीला डोळ्यांनी होतो. हे नव्याने सांगण्याची आवश्यकता नाही. एखादी मुलगी जर तुमच्याशी बोलताना डोळ्यात पाहत असेल, तर तो प्रेमात पडल्याचा एक इशारा आहे. प्रेमात पडलेली महिला पुरुषांच्या डोळ्यात डोळे घालून संवाद साधते. ही माहिती संशोधनातून समोर आली आहे. प्रेमात पडलेली महिला डोळ्यात डोळे घालून संवाद साधत असताना केसांवरून देखील हात फिरवते.

प्रेमात पडलेल्या महिलांना पुरुषांमधील सगळ्याच गोष्टी चांगल्या वाटू लागतात. प्रेमात पडलेल्या व्यक्तीला तुमच्यातल्या उणीव कधीच दिसत नाहीत. कदाचित म्हणूनच प्रेम हे आंधळ असते. असं म्हंटले जाते. एखाद्या मुलीला तुम्ही आवडू लागल्यानंतर, ती तुमची स्तुती करण्याची एकाही संधी सोडत नाही. अनेकदा गरज नसताना देखील तुमची तिच्याकडून स्तुती होत असेल, तर समजून जा, ती तुमच्या प्रेमात अखंड बुडाली आहे.

हे देखील वाचा  Ishan Kishan Shreyas Iyer : BCCI ने श्रेयस अय्यर ईशान, किशनला करारातून वगळले; एक वर्ष संधीही नाही, निर्णयाची अंमलबजावणी बाकी..

Health tips : एक महिना आहारातून चपाती काढून टाकल्यास काय होईल? वाचून बसेल धक्का..

CEBS Mumbai Recruitment 2024 : पदवीधरांसाठी या विभागात मोठी भरती; दरमहा 37 हजार पगार..

IPL season17 : भारतीय क्रिकेट गाजवणाऱ्या पाच दिग्गज खेळाडूंचे 2024 ठरणार शेवटचं आयपीएल; दोन नावं धक्कादायक..

Abhishek Sharma Tanya Singh : गर्लफ्रेंड आत्महत्या प्रकरणात अभिषेक शर्मा अडचणीत; त्या संबंधामुळे पोलिसांनी..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.