CEBS Mumbai Recruitment 2024 : पदवीधरांसाठी या विभागात मोठी भरती; दरमहा 37 हजार पगार..

0

CEBS Mumbai Recruitment 2024 : उच्च शिक्षण घेऊन देखील अलीकडे नोकरीच्या संधी पाहिजे त्या प्रमाणात उपलब्ध नसल्याचे पाहायला मिळते. देशात बेरोजगारी प्रचंड मोठ्या प्रमाणात असली तरी काही विभागांमध्ये नोकर भरती देखील केली जात आहे. तुम्ही देखील नोकरीच्या शोधात असाल, तर तुमच्यासाठी मौलिक विज्ञान प्रकर्ष केंद्र मुंबई (Centre for Excellence in Basic Sciences) या ठिकाणी नोकरी करण्याची संधी आहे.

मौलिक विज्ञान प्रकर्ष केंद्र मुंबई या विभागाने भरती आयोजित केली असून, इच्छुक आणि पात्र उमेदवारांचे अर्ज मागविण्यात आले आहेत. उमेदवारांना अर्ज ऑनलाईन ईमेल द्वारे करावा लागणार असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 फेब्रुवारी 2023 निश्चित करण्यात आली आहे. मौलिक विज्ञान प्रकर्ष केंद्र या विभागामध्ये एका जागेसाठी भरती केली जाणार आहे.

पद आणि शैक्षणिक पात्रता

ज्युनियर रिसर्च फेलो या पदासाठी मौलिक विज्ञान प्रकर्ष केंद्र मुंबईमध्ये भरती केली जाणार आहे. यासाठी उमेदवाराची शैक्षणिक पात्रता निश्चित करण्यात आली आहे. भौतिकशास्त्र विषयात उमेदवार एम.एससी. उत्तीर्ण असणे आवश्यक आहे सोबतचUGC-CSIR-NET/SLET / GATE / PET महत्वाचे आहे.

परीक्षा शुल्क आणि पगार

ज्युनियर रिसर्च फेलो या पदासाठी मौलिक विज्ञान प्रकर्ष केंद्र मुंबई या विभागामध्ये अर्ज करण्यासाठी उमेदवारांना कोणतेही परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही. भरतीसाठी निवड केलेल्या उमेदवाराला दरमहा 31 हजार रुपये ते 37 हजार रुपये पगार दिला जाणार आहे. नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण मुंबईमध्ये असणार आहे.

अर्ज प्रक्रिया

उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवाराने registrar@cbs.ac.in या ईमेल आयडीवर अर्ज पाठवायचा आहे. ज्युनियर रिसर्च फेलो या पदासाठी मौलिक विज्ञान प्रकर्ष केंद्र मुंबई या विभागामध्ये निघालेली जाहिरात पहाण्यासाठी यावर क्लिक करा

हे देखील वाचा IPL season17 : भारतीय क्रिकेट गाजवणाऱ्या पाच दिग्गज खेळाडूंचे 2024 ठरणार शेवटचं आयपीएल; दोन नावं धक्कादायक..

IPL 2024 Schedule : 22 मार्च ते 7 एप्रिल पर्यंतचे IPL 2024 वेळापत्रक जाहीर; उर्वरित सामने कधी? वाचा सविस्तर..

Abhishek Sharma Tanya Singh : गर्लफ्रेंड आत्महत्या प्रकरणात अभिषेक शर्मा अडचणीत; त्या संबंधामुळे पोलिसांनी..

Ishan Kishan vs BCCI : जय शहाच्या वॉर्निंग नंतर ईशान किशनचाही पलटवार; म्हणाला..

Shreyas Iyer vs BCCI : ईशान नंतर आता श्रेयस अय्यरच्या करिअरला खीळ! खोटं बोलल्यामुळे कारवाई; त्या पत्रामुळे पडला उघडा..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.