Post Office Recruitment: भारतीय पोस्ट ऑफिसमध्ये ९८ हजार ८३ पदांची ऐतिहासीक भरती; असा करा अर्ज..

Post Office Recruitment: महागाई आणि बेरोजगारी दिवसेंदिवस वाढत चालली असल्याने, आता अनेकांना जॉबची मोठी चिंता असल्याचे पाहायला मिळतं. बेरोजगारीचा स्तर वाढत चालल्यामुळे, आता उच्च शिक्षण घेऊन देखील भविष्य अंधारात असल्याचे पाहायला मिळतं. साहजिकच याचा परिणाम म्हणून, आता अनेकजण उच्च शिक्षण देखील घेत नसल्याचे दिसतं. यामुळे आता दहावी आणि बारावी झाल्यानंतर, अनेक जण नोकरी शोधून सेटल होण्याचा प्रयत्न करतात. जर तुम्ही देखील दहावी आणि बारावीनंतर नोकरीच्या शोधात असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी ऐतिहासिक आहे.

भारतीय डाक विभागात (indiapost.gov.in) आता तब्बल 98 हजार 83 रिक्त जागांची ऐतिहासिक भरती निघाली आहे. भारतीय डाक विभागाने या संदर्भात अधिसूचना जारी केली असून, या भरती प्रक्रिया संदर्भात सविस्तर माहिती देण्यात आली आहे. या भरती अंतर्गत पोस्टमन, मेन गार्डसह विविध रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. इच्छूक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांनी आता त्वरित अर्ज करून, या सुवर्णसंधीचा लाभ घेणे आवश्यक आहे. आपण भारतीय डाक विभागाकडून केली जाणाऱ्या भरती विषयी सर्व डिटेल्स जाणून घेऊ.

जागांचा तपशील

भारतीय डाक विभागाकडून घेण्यात येणाऱ्या या भरती प्रक्रियाच्या तपशीला विषयी जाऊन घ्यायचे झाल्यास, या भरतीच्या माध्यमातून तब्बल 98 हजार 83 म्हणजे जवळपास एक लाख रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. भारतीय डाक विभागाकडून भरण्यात येणाऱ्या या रिक्त जागा देशातील तब्बल २३ पोस्ट ऑफिस मंडळांमध्ये या जागा भरण्यात येणार आहेत. भारतीय डाक विभागामार्फत भरण्यात येणाऱ्या या रिक्त जागा पोस्टमन, मेन गार्डसह, अनेक पदांकरिता भरण्यात येणार आहेत.

शैक्षणिक पात्रता

भारतीय डाक विभागाकडून करण्यात येणाऱ्या या भरतीसाठी उमेदवारांची पात्रता पदानुसार ठरविण्यात आली आहे. यामध्ये टपाल खात्यात नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांच्या शैक्षणिक पात्रतेचा विचार करायचा झाल्यास, कोणत्याही मान्यता प्राप्त शिक्षण मंडळातून दहावीची परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. सोबतच उमेदवारांना कॅम्पुटरचे बेसिक ज्ञान देखील असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर इतर काही पदांसाठी उमेदवारांची बारावी पूर्ण होणे आवश्यक आहे. शैक्षणिक पात्रतेविषयी अधिक जाणून घ्यायचं असेल, तर तुम्ही यावर क्लिक करा.

अशी केली जाणार निवड

भारतीय डाक विभागाकडून घेण्यात येणाऱ्या या भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांच्या निवडीबाबत विचार करायचा झाल्यास, उमेदवारांना दहावी आणि बारावीमध्ये सर्वाधिक टक्केवारी असेल, त्यानुसार निवड प्रक्रिया पार पडणार आहे. कॅम्पुटर ज्ञानाची देखील पडताळणी केली जाणार आहे. याशिवाय प्रत्यक्ष मुलाखत घेतल्यानंतर, मेरिट लिस्ट लावण्यात येणार असल्याची माहिती आहे. मात्र कमी टक्केवारी असली तरी देखील अर्ज कारणे आवश्यक आहे, कारण तब्बल एक लाख रिक्त जागा भरण्यात येणार असल्याने, अनेकांना नोकरी करण्याची संधी मिळू शकते.

वयोमर्यादा: भारतीय डाक विभागामध्ये नोकरी करण्यासाठी इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांचे वय वर्ष हे 18 ते 32 दरम्यान असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर कॅटेगिरी नुसार उमेदवारांना वयोमर्यादित सूट देखील मिळणार आहे. वयोमर्यादे विषयी सविस्तर जाणून घेण्यासाठी आणि अधिसूचना पाहण्यासाठी यावर क्लिक करा.

अर्ज प्रक्रिया

भारतीय डाक विभागाकडून घेण्यात येणाऱ्या एक लाख रिक्त जागांसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईल मधील क्रोमवर जाऊन indiapostgdsonline.gov.in असं सर्च करावं लागणार आहे. यानंतर भारतीय डाक विभागाची अधिकृत वेबसाईट ओपन झालेली दिसेल. भारतीय डाक विभागाची वेबसाईट ओपन झाल्यानंतर, तुम्ही तुमचं राज्य निवडायचं आहे. राज्य निवडल्यानंतर तुम्हाला राज्यामधील पोस्ट विभागाची नावे पहायला मिळतील. यामध्ये तुम्हाला सर्वात खाली division निवडायचं आहे. division निवडल्यानंतर तुम्हाला तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिचा पत्ता दिसेल. तुम्ही त्या पत्त्यावर ऑनलाईन केलेला अर्ज, जाऊन सबमिट करायचा आहे.

तारीख

भारतीय डाक विभागाकडून घेण्यात येणाऱ्या भरती प्रक्रियेसाठी 23 सप्टेंबर 2022 पर्यंत उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. यासाठी उमेदवारानी त्वरित अर्ज करणे आवश्यक असून, केलेले अर्ज तुम्ही प्रत्यक्ष पत्त्यावर जाऊन सबमिट करू शकता. किंवा स्पीड पोस्ट तसेच नोंदणीकृत पोस्टाने देखील संबंधित पत्त्यावर अर्ज पाठवू शकता. या भरती भरती संदर्भातली अधिसूचना पाहण्यासाठी यावर क्लिक करा. डायरेक्ट अर्ज करण्यासाठी यावर क्लिक करा.

हे देखील वाचा Geological Survey of India Recruitment: दहावी पास उमेदवारांना सरकारी नोकरी करण्याची सुवर्णसंधी; जाणून घ्या डिटेल्स..

Proprietary Rights: हे सात पुरावे तुमच्याकडे असतील तरच तुम्ही जमिनीचे मालक असता..

Infinix Hot 12: 50 MP कॅमेरा आणि 6000mAh बॅटरी असणारा स्मार्टफोन केवळ साडेनऊ हजारांत; जाणून घ्या सर्व डिटेल्स..

अतिक्रमण: जमिनीवरील अतिक्रमण हटवण्याची ही आहे योग्य प्रक्रिया..

Relationship Tips: पार्टनर आपल्यावर खरं प्रेम करतो की नाही हे कसं ओळखाल? वाचा सविस्तर..

Yuzvendra Chahal: श्रेयस अय्यरला डेट करत असल्याची चहलच्या पत्नीची कबुली; चहलही म्हणाला आज पासून नवीन आयुष्य..

Relationship tips: या तीन सवयी couple पती-पत्नीचे आयुष्य करतात उध्वस्त..

MTNL Plan: Airtel, Jio चा उठला बाजार! केवळ २२५ रुपयांमध्ये लाइफटाइम incoming outgoing देतेय ही कंपनी..

Jio Plans: Jio च्या या रिचार्ज प्लॅनमध्ये आता ग्राहकांना पाहता येणार मोफत Netflix, Amazon Prime, Disney + Hotstar

Health Tips: केळाचं नियमित सेवन केल्याने शरीरावर होतात हे पाच महत्वपूर्ण बदल; जाणून घ्या केळी खाण्याचे फायदे तोटे..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.