Pomegranate Farming: तेल्याने त्रस्त आहात? करा ही उपाययोजना तेल्याचा होईल कायमचा बंदोबस्त..

Pomegranate Farming: संकट हे शेतकऱ्यांच्या पाचवीला पुजलेले आहे. शेतीच्या मशागतीपासून, ते निघालेला शेतमाल विकून जाईपर्यंत, विविध मार्गांनी शेतकऱ्याचे नुकसान होत राहते. यामध्ये सर्वात जास्त नुकसान हे फळबागा शेतकऱ्यांचे होते. वातावरणात होणाऱ्या सतत बदलामुळे, त्याचबरोबर अचानक कोसळणाऱ्या पाऊसामुळे अनेकदा शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास अक्षरशः निसर्ग हिरवून घेतो. अशा परिस्थितीमध्ये पिकांची अधिक काळजी घेण्याची आवश्यकता असते. यामध्ये डाळिंब या फळ बागेला अशा वातावरणाचा अधिक फटका बसतो. आणि म्हणून आज आपण या विषयावर सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

वातावरणामध्ये होणारे सतत बदल आणि अचानक कोसळणाऱ्या पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. अशा परिस्थितीमध्ये रोगराई मोठ्या प्रमाणात पसरते. अनेक औषधांचा वापर करून देखील पिकाची परिस्थिती पूर्ववत होत नाही. हा अनुभव प्रत्येक शेतकऱ्याला येत असतो. अलीकडच्या काळात डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांचे प्रमाण वाढल्याचं पाहायला मिळतं. इतर पिकांच्या तुलनेने डाळिंबाची शेती करण्यासाठी कमी कष्ट लागतं, हे जरी खरं असलं, तरी मात्र डाळिंबाची शेती जोखीमदारीची देखील तितकीच आहे.

वातावरणात होणाऱ्या सतत बदलामुळे आणि अचानक कोसळणाऱ्या पावसामुळे पिकांवर मोठ्या प्रमाणात आघात होतो. साहजिकच या वातावरणामध्ये मोठ्या प्रमाणात रोग पडतो. रोग पडल्यानंतर अनेक महागड्या औषधांची फवारणी करून देखील पीक पूर्वीसारखं येत नाही. आणि म्हणून अशा वातावरणाचा पिकांवर फारसा प्रभाव पडू नये, यासाठी सुरुवातीपासूनच पिकांची रोग प्रतिकार शक्ती वाढवण्याचे काम करणं आवश्यक असतं. डाळिंबाच्या बाबतीत देखील हाच नियम लागू होतो.

वातावरणात होणाऱ्या सतत बदलामुळे तेल्या, मर, असे रोग आपलं डोकं वर काढायला सुरुवात करतात. मात्र सुरुवातीपासून बागेची काळजी घेतली, तर वातावरण खराब झालं तरीदेखील आपण या रोगांपासून आपली फळबाग सहजरीत्या वाचवू शकतो. जाणून घेऊया सविस्तर. 

गेल्या काही वर्षांपासून शेतकरी डाळिंब शेती करण्याकडे अधिक वळाल्याचं पाहायला मिळतं. कमी मेहनत आणि खर्च देखील कमी लागत असल्याने, शेतकरी या शेतीकडे वळला. एकीकडे ही परिस्थिती असली, तरी दुसरीकडे अलीकडच्या काळात अनेक शेतकऱ्यांना आपल्या डाळिंब फळबागा जमीनदोस्त देखील कराव्या लागल्या आहेत. अनेक उपाययोजना करून देखील डाळिंब बागेवरून तेल्या रोग जाईला तयार नाही. ही वस्तुस्थिती आहे. मात्र ही परिस्थिती शेतकऱ्यांनी स्वतः आपल्यावर ओढवून घेतली आहे.

शेतीच्या मशागती पासून ते फळबाग लागवडी दरम्यान काही उपाययोजना, आणि काळजी घेतली, तर तेल्या रोगासारख्या समस्या उद्भवणार नाहीत. सोबतच जर डाळिंबाची लागवड केल्यानंतर, झाडांना असणारे पोषक घटक सातत्याने मिळत राहिले, तर शेतकऱ्यांना या समस्यांना तोंड द्यावे लागणार नाही. फळबागेवर तेल्या आल्यानंतर, उपाययोजना करून काहीही उपयोग होणार नाही. शेतकऱ्यांना तेल्या रोगापासून आपल्या बागेचे संरक्षण करायचे असेल, तर ते तेल्या येण्यापूर्वीच बागेचे व्यवस्थापन करणे आवश्यक आहे.

तेल्या रोग येण्यापूर्वीच व्यवस्थापन करणं आवश्यक

या विषयाचे अभ्यासक विनय सुपे यांनी एका कार्यक्रमांमध्ये डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना ‘तेल्या’ या रोगाविषयी माहिती देताना म्हटले, तेल्या, आपल्या बागेवर येण्यापूर्वीच बागेचे व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. एकदा का तुमच्या बागेवर तेल्या आला, की मग त्याला कोणत्याही उपाययोजना करून तुम्ही घालवू शकत नाही. वातावरणात होणाऱ्या बदलांचा सामना करण्यासाठी तुमच्या बागेतील झाडांमध्ये ताकद असणे आवश्यक आहे. रोगप्रतिकार शक्ती उत्तम असेल, तर रोगाचा परिणाम झाडांवर होणार नाही. असंही त्यांनी स्पष्ट केले.

आपल्या डाळिंब या फळबागेला या रोगापासून वाचवायचे असेल, तर रोग येण्यापूर्वीच बागेची खबरदारी घ्यायला सुरुवात करणं गरजेचं आहे. योग्य औषधांचा वापर आणि योग्य खतांचा वापर करून, आपण आपल्या बागेची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याचे काम करणं आवश्यक असतं. यासाठी तुम्ही कृषी विद्यापीठाची मदत घेऊ शकता. बागेची लागवड करताना दोन्ही झाडांच्या मधील अंतर नेहमी जास्त असणे आवश्यक आहे. झाडांची शक्ती वाढवल्यानंतर, खराब वातावरणाचा सामना झाडे निश्चित करतात. साहजिकच यामुळे रोग येत नाही.

शेतकऱ्यांना डाळिंब फळबाग लागवड करायची असेल, तर आपल्या शेतीचा पुरेपूर अभ्यास असणं आवश्यक असतं. याबरोबरच शेतीची मशागत योग्य पद्धतीने करणे देखील आवश्यक असतं. सुरुवातीला जर तुम्ही फळबाग लागवड करताना योग्य खबरदारी आणि मेहनत घेतली तर, तुमच्या फळबागेवर रोगाचा प्रादुर्भाव होणार नाही. मशागतीपासून योग्य लागवडीची जर तुम्ही व्यवस्थित काळजी घेतली, तर तुम्ही भविष्यात निर्माण होणाऱ्या समस्यांचे मूळ उपटून काढले आहे, असा त्याचा अर्थ आहे. आणि म्हणून तुम्ही आपल्या झाडांची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्याचे काम करणे आवश्यक आहे. तरच तुम्ही तेल्याचा सामना करू शकता.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.