Women child development: या उमेदवारांसाठी महिला व बालविकास विभागात मोठी भरती..

Women child development: महागाई आणि बेरोजगारीच्या या दुनियेत नोकरी मिळवणं अलीकडच्या काळात खूप आवश्यक बनले आहे. खरंतर कुठेतरी चांगल्या पगाराची नोकरी मिळवणं हे अनेकांचं स्वप्न असतं. मात्र आता कोणत्याही क्षेत्रात चार पैशाची नोकरी मिळवणं देखील मोठं आव्हान बनलं आहे. कारण बेरोजगारीचा दर दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. असो, आपण आपल्या मूळ विषयाकडे येऊया. तुम्ही देखील नोकरीच्या शोधात असाल, आणि तुम्ही पदवीधरच शिक्षण घेतले असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे.

बाल विकास विभागांमध्ये (women child development department) विविध पदांसाठी मोठी भरती निघाली असून, या संदर्भात अधिसूचना देखील जारी करण्यात आलेली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागविण्यात आले असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 सप्टेंबर 2022 ठेवण्यात आलेली आहे. महिला व बालविकास विभागांमध्ये ही भरती गोंदिया या ठिकाणी होणार आहे. आता आपण या भरती प्रक्रिया संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊ. सर्वप्रथम आपण विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक पात्रतेविषयी जाणून घेऊ.

शैक्षणिक पात्रता

महिला बाल विकास विभागांमध्ये निघालेल्या भरतीसाठी पदवीधर उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. या विभागामार्फत घेण्यात येणाऱ्या भरतीसाठी ठेवण्यात आलेल्या शैक्षणिक पात्रतेविषयी जाणून घ्यायचे झाल्यास, उमेदवारांनी कोणत्याही मान्यता प्राप्त शिक्षण संस्थेमधून पदवीधरचं शिक्षण पूर्ण असणं आवश्यक आहे. याबरोबरच संगणकाचे बेसिक ज्ञान देखील उमेदवारांना असणे आवश्यक आहे. एमएससीआयटी परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. इंग्लिश आणि मराठी टायपिंग प्रति मिनिटांमध्ये 40 शब्द इतकं स्पीड असणे देखील अनिवार्य आहे. टायपिंगचा अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येणार आहे.

पदांचा तपशील आणि वयोमर्यादा

महिला व बाल विकास विभागामार्फत घेण्यात येणाऱ्या रिक्त पदांविषयी जाणून घ्यायचे झाल्यास, “सहाय्यक” या पदासाठी आठ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. याबरोबर ”बहुउद्देशीय कर्मचारी” या पदांसाठी देखील आठ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. वरील सर्व पदांच्या वयोमर्यादेचा विचार करायचा झाल्यास, उमेदवारांचे वय हे 25 ते 45 दरम्यान असणे आवश्यक आहे. या परीक्षेसाठी उमेदवाराकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही.

पगार आणि ठिकाणी

महिला व बालविकास विभागामध्ये भरण्यात येणाऱ्या या जागांचे ठिकाणी गोंदियामध्ये असून, निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना १० ते १२ हजार रुपये मानसिक वेतन दिले जाणार आहे. आता आपण उमेदवारी अर्ज कोणत्या पत्त्यावर पाठवायचा? हे देखील पाहू. इच्छूक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांनी आपला अर्ज, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, गोंदिया या पत्त्यावर १ सप्टेंबर २०२२ संध्याकाळी पाच वाजेपर्यंत पाठवणे आवश्यक आहे.

इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांचे अर्ज ऑफलाइन पद्धतीने स्वीकारले जाणार आहेत. या भरती प्रक्रिया संदर्भात तुम्हाला जाहिरात पाहायची असेल तर यावर क्लिक करून पाहू शकता. यावर क्लिक करून पाहू शकता. इच्छुक उमेदवारांनी यामध्ये एक गोष्ट लक्षात घेण्याची आवश्यकता आहे. ती म्हणजे, तुम्ही प्रत्यक्ष जाऊन अर्ज करू शकता, किंवा स्पीड पोस्टाने देखील अर्ज पाठवू शकता. मात्र एक सप्टेंबर 2022 पर्यंत अर्ज संबंधित कार्यालयात पोहचणं आवश्यक आहे.

हे देखील वाचा Income Certificate: घरबसल्या मोबाइलवर उत्पन्नाचा दाखला कसा काढायचा? जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस सोप्या भाषेत..

Proprietary Rights: हे सात पुरावे तुमच्याकडे असतील तरच तुम्ही जमिनीचे मालक असता..

Childbirth Tips: गरोदरपणात आणि प्रसूती झाल्यानंतर इतक्या दिवसांनी संबंध ठेवणे आवश्यक; अन्यथा होतील हे गंभीर परिणाम..

Fraud Video Call: अगोदर तिचा फेसबुकला मेसेज, नंतर व्हॉट्सॲपला तसला व्हिडिओ कॉल, त्यानंतर खात्यातून १ लाख गायब..

Post Office Recruitment: भारतीय पोस्ट ऑफिसमध्ये ९८ हजार ८३ पदांची ऐतिहासीक भरती; असा करा अर्ज..

Relationship Tips: पार्टनर आपल्यावर खरं प्रेम करतो की नाही हे कसं ओळखाल? वाचा सविस्तर..

Relationship tips: या तीन सवयी couple पती-पत्नीचे आयुष्य करतात उध्वस्त..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.