Fraud Video Call: अगोदर तिचा फेसबुकला मेसेज, नंतर व्हॉट्सॲपला तसला व्हिडिओ कॉल, त्यानंतर खात्यातून १ लाख गायब..

Fraud Video Call: सोशल मीडियाच्या (social media) जगात लोक एवढे गुंतून गेले आहेत की, लोकांना मोबाईल (mobile) आणि सोशल मीडिया हे सर्वस्व वाटत आहे. आज लोकांना एकमेकांशी बोलायला रस राहिला नाही. ३, ४ लोक एकत्र बसले तरीदेखील बऱ्याचदा बोलण्यापेक्षा आपल्या खिशातून १५, २० हजाराचा मोबाईल काढून त्यात मग्न झालेले पाहायला मिळतात. एकंदरीत आता संवाद तुटत चालला आहे. लोकांना अभासी जीवनात (virtual life) रस वाटू लागला आहे. जिवापेक्षा मोबाईल जपला जातोय. आपला मोबाईल म्हणजे आपलं सर्वस्व अशी संकल्पना रुळत चालली आहे.

अगोदर चोऱ्या रस्त्याने, घरफोड्या अशा पद्धतीने होत होत्या, आजही होतात. मात्र लोक देखील सध्याच्या काळात डिजीटल झालीत. आपल्या बँक खात्यावर पैसे ठेवतात. जेव्हा पाहिजे तेव्हा एटीएम (ATM), गूगल पे (Google Pay) , फोन पे (Phone Pay), पे टीएम (Pay TM) या सुविधांचा वापर करून तत्काळ पैसे ट्रान्स्फर करता येतात. कुठल्या दुकानात गेले तरीदेखील पैसे ऑनलाईन पद्धतीने ट्रान्स्फर करता येतात. त्यामुळे बरेच लोक खिशात रोख रक्कम ठेवत नाहीत. त्याच पद्धतीने चोर देखील डिजीटल झाले आहेत. बऱ्याच लोकांना ऑनलाईन गंडा घालून लुटलं गेलंय, परंतु सध्या नवीन प्रकार समोर यायला लागलाय. हा प्रकार नक्की काय आहे, हे तुम्हा सर्वांना जाणून घेणं गरजेचं आहे. तुमच्या मुलांच्या, तुमच्या फायद्याचे आहे, नाहीतर मग पुन्हा पश्चाताप करण्याशिवाय पर्याय उरणार नाही.      हेही वाचा: effects of lack of sex: शारीरिक संबंधांमध्ये अधिक अंतर पडल्यास, तुमच्या आरोग्यावर होतात हेस गंभीर परिणाम.. 

साधारण २६ वर्ष वय असलेला योगेश (या ठिकाणी नाव बदललेले आहे.) सर्वसामान्य कुटुंबातील आहे. त्याचे शिक्षणात डिग्री केल्याने तो सध्या पुण्यातच वास्तव्यास आहे. त्याच्या घरची परिस्थिती तशी बेताचीच. वडील रोजंदारीवर काम करतात. शेती देखील थोडी आहेच. परंतु शेती बघत ते रोजंदारी करतात. आई वडिलांना शेतात मदत करत घराच्या ८, १० शेळ्या सांभाळत असते. तर लहान बहीण शिक्षण घेत आहे. योगेश तसा सोज्वळ आणि शांत मुलगा. अगदी त्याचे चारित्र्य देखील उत्तम आहे. योगेश शक्यतो कधी कोणाच्या भानगडीत नसतोच. कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीमुळे, तो नेहमीच कष्ट करत आला आहे.

कोरोना महामारीच्या अगोदर तो नोकरीला लागला. परंतु मग त्याची नोकरी गेली. आता तो नोकरी करतोय. त्यातून त्याला पुरेसा पगार देखील मिळतो. त्यातील काही रक्कम घरच्यांना देखील पाठवतो. सगळं सुरळीत चालू होते. ऐकेदिवशी त्याला फेसबुकला एका मुलीचा मेसेज आला. त्याने तो मेसेज एक दिवस पहिलाच नाही. परंतु मग त्याने ज्यावेळी स्वत:चे फेसबुक अकाऊंट ओपन केले, तेव्हा मग त्याला मेसेज आल्याचे त्याच्या निदर्शनास आले. त्याने तो मेसेज ओपन करून पाहिला. जास्त काही नाही परंतु, Hii अशा पद्धतीचा तो मेसेज होता.                                    हेही वाचा: Relationship Tips: मुलांच्या या सहा गोष्टींवर मुली टाकतात जीव ओवाळून; मुलींच्या हृदयात राहायचं असेल तर करा हे काम..

परंतु मुलीचा मेसेज म्हटलं की तरूण वयातला मुलगा थोडा उतावळा होणे साहजिकच आहे. त्याने तिच्या मेसेजला प्रतिउत्तर (Reply) दिले. तो तिला म्हणाला हाय, मी तुम्हाला ओळखले नाही. परंतु समोरची फेसबुक तरुणी हिंदी भाषेत बोलत होती. ती त्याला म्हणाली मला तू फार आवडतोस. तू खूप सुंदर दिसतोस. आपण भेटायचे का? वगैरे वगैरे. योगेश मात्र फार बोलला नाही. परंतु त्या तरुणीचे योगेशला मेसेज येतच होते. आता त्याला देखील तिच्यामध्ये थोडा रस येऊ लागला. म्हणजे आपल्या लाईक करणारी ही मुलगी नक्की आहे तरी कोण? असे त्याच्याही मनात प्रश्न उपस्थित झाले.

त्या तरुणीने योगेशचा व्हॉट्सॲप क्रमांक त्याच्याकडून घेतला. नंतर व्हॉट्सअपवरच दोघे बोलत होते. दुसऱ्या दिवशी रात्री त्याला तिचा मेसेज आला. मी तुला व्हिडिओ कॉल करते. मला तुला पाहायचे आहे, असे त्याला तरुणी म्हणाली. ज्यावेळी मग व्हिडिओ कॉल आला, त्यावेळी समोरील तरुणी ‘न’ग्न अवस्थेत होती. तो व्हिडिओ कॉल योगेशने ५ सेकंदामध्ये बंद केला. योगेशला देखील यावेळी शंका आली. त्याने तिचा नंतरचा व्हिडिओ कॉलला प्रतिउत्तर दिले नाही. त्या दिवशी त्याने तिला व्हॉट्सॲपवर ब्लॉक केले.

परंतु दुसऱ्या दिवशी त्याला दुसऱ्या व्हॉट्सॲप नंबर वरून एक व्हिडिओ आला. अगोदरच्या दिवशी त्याला आलेल्या व्हिडिओ कॉलचा स्क्रीन रेकॉर्डींगचा ५ सेकंदाचा व्हिडिओ आणि त्याला पुढे त्यांनी एडिटिंग करून जोडलेला १५ सेकंदांचा अश्लील व्हिडिओ पहायला मिळाला. या व्हिडिओत योगेशचा चेहरा लावलेल्या व्यक्ती आपल्या इंद्रियांसोबत विचित्र चाळे करत असल्याचं पाहायला मिळत होतं. मात्र हा पुढील १५ सेकंदाचा व्हिडिओ हा बनावट होता. परंतु ते फक्त त्याला माहिती होते. इतरांना ते सर्व अश्लील चाळे योगेशने केले आहे, असेच वाटेल; असा तो व्हिडिओ होता. तो व्हिडिओ पाहून योगेशची काय अवस्था झाली असेल, याची कल्पना तर तुम्हाला आलीच असेल. एक गोष्ट लक्षात ठेवा जर तुम्ही एखाद्याला व्हिडिओ कॉल केला, असेल तर समोरील व्यक्ती त्याचा व्हिडिओ रेकॉर्ड करू शकते.                                       हेही वाचा: Viagra side effects: व्हायग्रा पुरुषांच्या लैंगिकतेवर असं करते काम  अतिसेवन झाल्यास होतात,हे गंभीर दुष्परिणाम..

त्यानंतर त्याला आता हा व्हिडिओ डिलीट करण्यासाठी पैशाची मागणी होऊ लागली. जवळपास १० हजार रुपये योगेशला पाठवण्यास सांगितले. जर पैसे दिले नाहीत तर हा व्हिडिओ तुझ्या मित्रांना पाठवण्यात येईल असे सांगितले. तसेच आम्ही सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल करू अशी देखील धमकी देण्यात आली. १० हजार रुपये देणं योगेशला शक्य होते. परंतु आपली परिस्थिती एवढी बिकट आहे, याची त्याला जाणीव होतीच. परंतु असा प्रकार सांगायचा तरी कोणाला? हे इतरांना सांगितले की लोक आपल्यालाच पाण्यात बघायला चालू करतील.

या भीतीने योगेशने तसेच ताणतणावामध्ये २ दिवस घालवले. परंतु ती तरुणी त्याची पाठ सोडायला काही तयार नव्हती. त्याला मेसेज येणं चालूच होते. त्याला दोन दिवसांनी एक फोन आला. तू जर तासाभरात पैसे पाठवले नाहीत तर तुझा व्हिडिओ व्हायरल केला जाणार आहे. त्यानंतर देखील योगेशने पैसे पाठवले नाहीत. परंतु समोरून स्क्रीनशॉट पाठवण्यात आले. ज्यामध्ये योगेशचा व्हिडिओ त्याच्या ४ ते ५ फेसबुक मित्रांना पाठवण्यात आला होता. योगेशने लगेच मित्रांना पाठवलेला व्हिडिओ डिलीट करण्याची मागणी केली. आपण आपणास पैसे पाठवत असल्याचे त्याने सांगितले.

त्यानंतर योगेशने १० हजार रुपये त्यांच्या खात्यावर पाठवले. परंतु हे संकट काही पाठ सोडायला तयार नव्हते. दुसऱ्या दिवशी अजून १० हजार रुपयांची त्यांनी मागणी केली. त्यानंतरही योगेशला पैसे पाठवण्यास भाग पाडण्यात आले. मात्र हे पैसे त्याने त्याच्या मित्राकडून उसने घेतले होते. हा प्रकार अजूनही थांबला नाही, तुमचा व्हिडिओ आम्ही एका ठिकाणी पोस्ट केला आहे, तो डिलीट करण्यासाठी अजून १० हजार रुपये पाठवण्याची मागणी करण्यात आली. असे करत करत योगेशला जवळपास १ लाख रुपयांना गंडा घालण्यात आला. परंतु तरीदेखील हे थांबले नाही. आता योगेशला ते सहन झाले नाही. योगेश मोठमोठ्याने रडू लागला. त्यावेळी तिथे त्याचा अजून एक मित्र होता.

योगेश का रडतोय? असे विचारून त्याने त्याला काय झाले असे विचारले. परंतु योगेशने उडवा उडवीची उत्तरे दिली. परंतु मित्राला ते काही खरे वाटले नाही. त्याने योगेला त्याच्या बाबतीत घडलेला प्रकार सांगायला भाग पाडले. त्यानंतर दोघांनी योगेच्या फेसबुक अकाऊंटवरून त्या तरुणीला ब्लॉक केले. त्यानंतर योगेशचे फेसबुक अकाऊंट प्रायव्हेट केले. फेसबुक खाते प्रायव्हेट केले, कारण जेणेकरून फक्त योगेशच्या फेसबुक मित्रांना योगेशचे खाते बघता येईल. त्याचे मित्र कोण आहेत, त्याने पोस्ट केलेले फोटो फक्त त्याच्या फेसबुक मित्रांना पाहता येतील.

त्यानंतर त्यांनी सबंधित प्रकारची तक्रार देखील सायबर क्राईम केली आहे. मित्रांनो, असा प्रकार तुमच्या बाबतीत, तुमच्या कुटुंबातील कुणाच्या बाबतीत घडायला नको असेल तर, कृपया सावध रहा. चुकीच्या लोकांना थारा देऊ नका, आपण देखील कुठेतरी चुकत असतो, म्हणूनच असे प्रकार घडत असतात. शक्यतो आपली सोशल मिडिया अकाउंट्स (खाती) प्रायव्हेट असणे उत्तमच आहे. जेणेकरून आपल्या पोस्ट, आपले फोटो फक्त आपल्या मित्रांना, ज्यांना तुम्ही फॉलो करायला अनुमती दिली असे किंवा ज्यांची तुम्ही फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारली किंवा पाठवली असे लोकच तुमच्या पोस्ट, फोटो पाहू शकतील.

हेही वाचा: Name Astrology: या तीन नावाच्या मुलींची आयुष्यात यशस्वी होण्यासाठी काहीही करण्याची असते तयारी..

Breakup: ब्रेकअपनंतर मुली उचलतात ही पाच धक्कादायक पावले; तुमच्या भविष्यासाठी जाणून घेणे आवश्यक.. 

Astrological sign: मुलींसाठी या राशीचे लोकं असतात खूपच रॉयल; प्रत्येक गोष्ट ठेवतात हृदयात जपून..

Post Office Recruitment: भारतीय पोस्ट ऑफिसमध्ये ९८ हजार ८३ पदांची ऐतिहासीक भरती; असा करा अर्ज.. 

Call recording: कॉल रेकॉर्डिंग कोणी करत असेल, तर या ट्रिक्स वापरून येते ओळखता..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.