Breakup: ब्रेकअपनंतर मुली उचलतात ही पाच धक्कादायक पावले; तुमच्या भविष्यासाठी जाणून घेणे आवश्यक..

Breakup: नातं विश्वासावर टिकून असतं. नात्यात विश्वास नसेल, तर कोणतंही नातं फार काळ टिकू शकत नाही, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. प्रत्येकाला आपल्या आयुष्यात मुलगा किंवा मुलगी असावी असं वाटत असतं. यात गैर देखील काही नाही. तुम्ही पहिल्यांदा एकमेकांच्या प्रेमात पडला असाल, तर हा अनुभव खूप अविस्मरणीय असतो. प्रेमात पडल्यानंतर त्याला संपूर्ण जग सुंदर दिसू लागतं. प्रेम ही भावना आहे, प्रेम कधीही शब्दात व्यक्त करता येत नाही, असं तुम्ही अनेकदा वाचलं असेल. मात्र याच प्रेमात जर संशय यायला सुरुवात झाली, तर त्याचं रूपांतर ब्रेकअपमध्ये होतं. आणि मग सुरुवातीला सुंदर वाटू लागणारे जग, अचानक किळसवाणं वाटू लागतं. (What Girls Do After Breakup)

कुठल्याही नात्यापासून दूर जाणं हे कोणालाही सोपं नसतं. ब्रेकअपनंतर अनेकांचे आयुष्य उध्वस्त झाल्याच्या बातम्या तुम्ही अनेकदा ऐकल्या वाचल्या देखील असतील. नात्यातून बाहेर पडणे, हे काही लाईट चालू बंद होणाऱ्या बटनासारखं नसतं. ब्रेकअप नंतर सावरण्यासाठी अनेकांना काही वर्षे लागतात. तर काहीजण यातून सावरत देखील नाहीत. ब्रेकअप झाल्यानंतर, अनेक जण स्वतःला सावरण्यासाठी काही गोष्टींमध्ये गुंतवून घेतात. मुलींना देखील ब्रेकपमधून बाहेर पडल्यानंतर स्वतःला सावरण्यासाठी अनेक गोष्टीत गुंतवून घ्यावं लागतं. ब्रेकअप नंतर मुली काय करतात? आज आपण याविषयी जाणून घेणार आहोत.

सोशल मीडियावर ब्लॉक करतात.

ब्रेकपनंतर अनेक मुली आपल्या एक्स प्रियकराचा चेहरा पुन्हा पाहता येऊ नये, यासाठी सोशल मीडियाच्या सर्व अकाउंटवर ब्लॉक करतात. एवढेच नाही, तर आपल्या कॉन्टॅक्ट नंबर मधून देखील बॉयफ्रेंडचा नंबर ब्लॉक लिस्टमध्ये टाकतात. प्रियकराला त्रास देण्यासाठी काही मुली मुद्दाम आपल्या मित्रांसोबतचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट देखील करतात. या पाठीमागे त्यांचा आपण या नात्यातून मुक्त झाल्यापासून खूप आनंदी आहोत, हे दाखवण्याचा प्रयत्न असतो. हे दोन्हीं घटक मुलींमध्ये ब्रेक-अप झाल्यानंतर पाहायला मिळतात.

एक्सचे अफेअर्स शोधतात.

ब्रेकअप झाल्यानंतर बहुतेक मुली आपल्या एक्स बॉयफ्रेंडचे नवीन कुठे अफेअर सुरू आहे की नाही, याबाबत जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. ब्रेकअप झाल्यानंतर अनेकांना असं वाटतं, मुलींनी आता मुव्हऑन केलं आहे. मात्र मुली देखील ब्रेकअप नंतर आपल्या एक्स बॉयफ्रेंड विषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. एवढेच नाही, तर अनेक मुली आपण देखील आता रिलेशनशिपमध्ये असून, पूर्वीपेक्षा खूप आनंदित आहोत, हे दाखवण्याचा प्रयत्न देखील करतात.

नव्या रिलेशनशिपमध्ये येण्याचा प्रयत्न

ब्रेकप नंतर अनेक जण नैराश्यामध्ये देखील गेल्याचं आपण पाहतो. आपल्याला आपल्या जवळचे मित्र यातून बाहेर काढण्यास मदत करतात. ब्रेकअप झाल्यानंतर आपल्या जवळचे मित्र सातत्याने आपल्याला समजावण्याचा प्रयत्न करतात. ब्रेकअप झालेली व्यक्ती देखील स्वतःला ब्रेकअपच्या धक्क्यातून बाहेर काढण्यासाठी मित्रांमध्ये वेळ घालवणे पसंत करते. ब्रेकअप झालेल्या मुलींना नेहमी असं वाटतं, यातून बाहेर पडायचं असेल, तर आता आपण नवीन रिलेशनशिपमध्ये येणे आवश्यक आहे. साहजिकच यामुळे त्या नवीन पार्टनरच्या शोधात देखील असतात. आपण नवीन रिलेशनशिपमध्ये आलो, तर जुन्या बॉयफ्रेंडला आपण विसरू, असा त्यांचा समज असतो. आणि त्या दृष्टीने त्या पावले देखील टाकत असल्याचं एका सर्वेतून समोर आलं आहे.

आनंदी आहे हे दाखवण्याचा प्रयत्न

ब्रेकअप झाल्यानंतर, अनेक मुली स्वतःला सावरण्यासाठी नेहमी आनंदी राहण्याचा प्रयत्न करतात. मित्रांसोबत बाहेर फिरायला देखील जातात. आपल्या आयुष्यात अनेक मित्र आहेत. त्यांच्याबरोबर आता मी खूप खुश आहे, हे आपल्या प्रियकराला दाखवण्याचा प्रयत्न देखील करतात. जेणेकरून मी आनंदी आहे, हे पाहून तो दुःखी होईल. या अतिरिक्त मित्रांसोबत असल्यानंतर, त्यांना ब्रेकअपच्या धक्क्यातून बाहेर पडण्याला अधिक वेळ देखील मिळतो. मित्रांसोबत असल्यानंतर, जुन्या गोष्टींची आठवण येत नाही.

नविन रिलेशनशिपमध्ये डोक्याचा वापर

मुलींचं जर पहिल्यांदा ब्रेकअप झालं असेल, तर नंतर रिलेशनशिपमध्ये येताना मुली कधीही मनापासून रिलेशनशिपमध्ये येत नसल्याचे एका सर्वेत समोर आलं आहे. नवीन रिलेशनशिपमध्ये जाताना मुली नेहमी मनापेक्षा डोक्याचा जास्त वापर करतात. सोबतच नव्या बॉयफ्रेंडवर प्रेम करताना, मुली नेहमी एक अंतर ठेवतात. जेणेकरून भविष्यात ब्रेकअप झालं, तरी देखील त्याचा भविष्यात जास्त त्रास होऊ नये.

हे देखील वाचा Call recording: कॉल रेकॉर्डिंग कोणी करत असेल, तर या ट्रिक्स वापरून येते ओळखता..

Relationship Tips: पार्टनर आपल्यावर खरं प्रेम करतो की नाही हे कसं ओळखाल? वाचा सविस्तर..

Relationship tips: या तीन सवयी couple पती-पत्नीचे आयुष्य करतात उध्वस्त..

Marriage tips: लग्नाच्या पहील्या रात्री टाळा या चार चुका, अन्यथा जोडीदाराच्या कायमचं उतराल मनातून..

Ration Card: नवीन रेशन कार्डसाठी असा करा online, ऑफलाईन अर्ज; दहा दिवसांत रेशन कार्ड मिळेल घरपोच..

Proprietary Rights: हे सात पुरावे तुमच्याकडे असतील तरच तुम्ही जमिनीचे मालक असता..

Bank Account: आता अकाउंटमध्ये पैसे नसतील तरीही काढता येणार दहा हजार कॅश; वाचा सविस्तर..

Post Office Recruitment: भारतीय पोस्ट ऑफिसमध्ये ९८ हजार ८३ पदांची ऐतिहासीक भरती; असा करा अर्ज..

अतिक्रमण: जमिनीवरील अतिक्रमण हटवण्याची ही आहे योग्य प्रक्रिया..

Infinix Hot 12: 50 MP कॅमेरा आणि 6000mAh बॅटरी असणारा स्मार्टफोन केवळ साडेनऊ हजारांत; जाणून घ्या सर्व डिटेल्स..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.