Call recording: कॉल रेकॉर्डिंग कोणी करत असेल, तर या ट्रिक्स वापरून येते ओळखता..

Call recording: अलीकडच्या काळात कोण काय करेल, हे काही सांगता येत नाही. खूप जवळचा व्यक्ती देखील कधी कधी तुमचा विश्वासघात करतो. हा प्रकार तुमच्या बाबतीत देखील घडला असेल. साहजिकच यामुळे कोणावर विश्वास न ठेवलेला बरं. खास करून तुमच्या प्रायव्हसी बाबत तर तुम्ही अधिक काळजी घेणे आवश्यक असते. आता कॉल रेकॉर्डिंगवर बंदी आली असली, तरी अनेक जण मुद्दाम कॉल रेकॉर्डिंग करून वायरल करतात. कधी कधी आपण रागात अनेकांच्या बाबतीत आपल्या विश्वासू माणसापाशी बोलतो. मात्र तो त्या व्यक्तीला आपलं संभाषण रेकॉर्डिंग करून ऐकवू शकतो. आणि म्हणून फोनवर बोलताना तुम्ही आपला कॉल रेकॉर्ड तर होत नाही ना? याचा विचार करणे फार आवश्यक आहे.

आज आम्ही तुम्हाला कॉल रेकॉर्डिंग संदर्भात सविस्तर माहिती सांगणार आहोत. तसं पाहायला गेलं, तर कॉल रेकॉर्डिंगवर आता बंदी आलेली आहे. अनेक मोबाईल कंपन्यांनी आपल्या फोनमधून कॉल रेकॉर्डिंग हा पर्याय डिलीट केला आहे. मात्र काही फोन मधून कॉल रेकॉर्डिंग अजूनही होताना पाहायला मिळतं. गुगलने (Google) कॉल रेकॉर्डिंग ॲप्सवर बंदी घातलेली आहे. मात्र तरी देखील अनेकजण कॉल रेकॉर्डिंग करताना पाहायला मिळतात. तुम्हाला देखील कॉल रेकॉर्डिंग पासून सुटका हवी असेल, तर हे शक्य आहे. आता तुम्ही तुमचा कॉल सुरू असताना कॉल रेकॉर्डिंग होत आहे की नाही, हे ओळखू शकता. जाणून घेऊया हा संदर्भात सविस्तर.

गुगलची कॉल रेकॉर्डिंग ॲप्सवर बंदी

लोकांची प्रायव्हसी जपण्यासाठी गुगलने (Google) कॉल रेकॉर्डिंग होणाऱ्या ॲप्सवर आपल्याकडून बंदी घातली आहे. ग्राहकांचा सन्मान आणि त्यांच्या प्रायव्हसीची जोपासना करणं ही आपली जबाबदारी असल्याचं त्यांनी म्हटले आहे. यापूर्वी गुगल डायलर जे वापरत होते, त्यांना कॉल रेकॉर्डींग हा पर्याय मिळत होता. मात्र गुगलने आता हे ॲप किंवा पर्याय काढून टाकला आहे. गुगलने हा निर्णय घेतल्यानंतर, अनेक मोबाईल कंपन्यांनी देखील आपल्या फोन मधून कॉल रेकॉर्डिंग हा ऑप्शन काढून टाकला. मात्र अजूनही काही मोबाईलमध्ये किंवा काही ॲपच्या माध्यमातून कॉल रेकॉर्डिंग सहज करता येते. परंतु काही ट्रिक वापरून तुम्हाला तुमचा कॉल रेकॉर्डिंग होत आहे का हे ओळखता येते. जाणून घेऊया सविस्तर.

जेव्हा तुम्ही एखाद्याशी फोनवर बोलत असता, आणि समोरचा व्यक्ती कॉल रेकॉर्ड करत असतो. तेव्हा तुम्हाला काही संकेत देखील मिळत असतात. मात्र अनेकदा आपण याकडे दुर्लक्ष करतो. आणि पुढील धोक्याला समारे जातो. समोरच्याशी फोनवर बोलताना तुम्ही नेहमी त्याचा आवाज नेहमीपेक्षा वेगळा तर येत नाही ना? याकडे सातत्याने लक्ष देणे आवश्यक असतं. जर त्याचा आवाज नेहमीपेक्षा वेगळा येत असेल, तर समजून जावा तो कॉल रेकॉर्डिंग करत आहे.

तुम्ही फोनवर बोलत असताना, जर तुमच्या फोन मधून बीपचा किंवा बिप सारखा एखादा आवाज येत असेल, तर समजावून जावा, समोरची व्यक्ती आपला कॉल रेकॉर्डिंग करत आहे. आपण आपल्या स्क्रीनवर काहीतरी टच होत असेल, म्हणून याकडे दुर्लक्ष करतो. मात्र आपला फोन समोरचा व्यक्ती रेकॉर्डिंग करत आहे, याचे संकेत देखील देत असतो. जर तुम्हाला कधी फोनवर बोलताना अशा प्रकारचा आवाज आला, तर तुम्ही लगेच फोन कट करणे आवश्यक आहे. एखादा महत्त्वाचा कॉल असेल, तर तुम्ही व्हाट्सअप कॉल करणे हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो.

याशिवाय जर तुम्ही एकादशी फोनवर बोलत असाल, आणि सतत काहीतरी टकटक असा आवाज येत असेल, तरी देखील समोरचा व्यक्ती तुमचा कॉल रेकॉर्डिंग करत आहे, असं समजावे. समोरचा व्यक्ती कॉल रेकॉर्डिंग करत असेल, तर काही मोबाईल फोनमध्ये ऑडिओ रेकॉर्डिंग चालू झाल्यानंत समोरच्या व्यक्तीला ऑडिओ मेसेज देखील येतो. तुमचा कॉल रेकॉर्डिंग करायला सुरुवात केली आहे, या संदर्भात तुम्हाला ऑडिओ मेसेजद्वारे अपडेट केलं जातं. अशा प्रकारे तुम्ही समोरचा व्यक्ती कॉल रेकॉर्डिंग करत आहे की नाही, हे ओळखू शकता.

हे देखील वाचा Ration Card: नवीन रेशन कार्डसाठी असा करा online, ऑफलाईन अर्ज; दहा दिवसांत रेशन कार्ड मिळेल घरपोच..

Relationship Tips: पार्टनर आपल्यावर खरं प्रेम करतो की नाही हे कसं ओळखाल? वाचा सविस्तर..

Sleep Chart: वयानुसार झोप किती तास घेणं आवश्यक आहे? झोप न लागण्याची काय कारणे आहेत? वाचा सविस्तर..

Post Office Recruitment: भारतीय पोस्ट ऑफिसमध्ये ९८ हजार ८३ पदांची ऐतिहासीक भरती; असा करा अर्ज..

Indurikar Maharaj: इंदुरीकर महाराजांनी संपूर्ण गावालाच गंडवलं; न्याय मागण्यासाठी सर्व गावकऱ्यांनी पोलीस स्टेशनमध्ये फोडला हंबरडा..

Health Tips: डेंग्यूचा डास फक्त याच लोकांना चावतो; डेंगू पासून दुर राहायचं असेल तर करा हे काम..

Relationship tips: या तीन सवयी couple पती-पत्नीचे आयुष्य करतात उध्वस्त..

Jio Plans: Jio च्या या रिचार्ज प्लॅनमध्ये आता ग्राहकांना पाहता येणार मोफत Netflix, Amazon Prime, Disney + Hotstar

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.