Indurikar Maharaj: इंदुरीकर महाराजांनी संपूर्ण गावालाच गंडवलं; न्याय मागण्यासाठी सर्व गावकऱ्यांनी पोलीस स्टेशनमध्ये फोडला हंबरडा..

Indurikar Maharaj: प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असतात. आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून महिलांवर आक्षेपार्ह विधान केल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा देखील झाला होता. महिलांना पायाच्या चप्पलेची उपमा दिल्याने, इंदुरीकर महाराज (indurikar Maharaj) चांगलेच अडचणीत सापडले होते. असं असलं तरी, आजही इंदुरीकर महाराजांच्या कीर्तनाला लाखो लोकांची गर्दी जमते. एकीकडे हे देखील वास्तव पाहायला मिळतं. अनेक वादग्रस्त विधानानंतरही इंदुरीकर महाराजांची लोकप्रियता कमी झाली नाही, साहजिकच यामुळे अनेक गावकरी त्यांना कीर्तनासाठी बोलावतात.

प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी महिलांविषयी केलेल्या अनेक वादग्रस्त विधानामुळे ते अनेकदा वादात देखील सापडले आहेत. मात्र आता इंदुरीकर महाराज यांनी संपूर्ण गावालाच गंडवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. इंदुरीकर महाराज यांच्या कृत्यामुळे संपूर्ण गावाने न्याय मागण्यासाठी पोलीस स्टेशन गाठलं आणि हंबरडा फोडला. ही घटना बीड (Beed) मधील ‘कळसंबर’ गावात घडली असून, या गावातील अक्षरशः संपूर्ण गावकऱ्यांनीच पोलिस स्टेशन गाठलं. आणि गुन्हा दाखल करा म्हणून संताप व्यक्त केला. या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतलं असून, इंदुरीकर महाराज यांनी देखील याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

बीड (beed) मधील कळसंबर गावामध्ये इंदुरीकर महाराजांच्या कीर्तनाचे आयोजन केलं होतं. इंदुरीकर महाराजांच्या कीर्तनाची तारीख मिळवण्यासाठी काही महिने अगोदर बुकिंग देखील करावं लागतं. या सगळ्याचे मॅनेजमेंट करून अखेर गावकऱ्यांनी इंदुरीकर महाराजांची तारीख मिळवली. काही महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर अखेर 19 ऑगस्टची तारीख मिळाली. इंदुरीकर महाराजांचे कीर्तन 19 तारखेला म्हणजेच काल असल्याने, गावकऱ्यांनी सर्व तयारी केली. गावातील भजनी मंडळी, त्याचबरोबर जेवणाचे देखील मोठे नियोजन गावकऱ्यांनी केले. या कीर्तनाच्या आयोजनासाठी मोठ्या प्रमाणात खर्च देखील झाला. मात्र ऐनवेळी इंदुरीकर महाराज यांनी गावकऱ्यांना टांगेवर टाकलं.

19 ऑगस्टला इंदुरीकर महाराजांचे कीर्तन होणार म्हणून, संपूर्ण गावात जल्लोषाचे वातावरण निर्माण झालं. या कीर्तनाची जाहिरात देखील मोठ्या प्रमाणात करण्यात आली. कीर्तनासाठी भला मोठा मंडप देखील साकारण्यात आला. गावकऱ्यांनी एकमेकांना विनवणी करून दीड लाख रुपये वर्गणी देखील जमा केली. कीर्तनाची वेळ देखील जवळ आली, मंडप सजला होता. मंडपात संपूर्ण गावकरी इंदुरीकर महाराज यांची वाट बघत होते. मात्र तेवढ्यात इंदुरीकर महाराज यांचा निरोप आला, आपण येऊ शकत नाही. हा निरोप ऐकताच कळसंबर गावावर आभाळ कोसळलं. या घटनेमुळे अनेकांच्या संतापाचा पारा चढला, आणि अख्या गावाने पोलीस स्टेशन गाठलं.

एकोणीस तारखेच्या कीर्तनाची संपूर्ण तयारी झाली असताना देखील अचानक इंदुरीकर महाराज यांनी कीर्तन करण्यास यायला नकार दिल्याने, संपूर्ण गाव त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यासाठी बीड मधील ‘नेकनूर’ या पोलिस ठाण्यात पोहचलं. इंदुरीकर महाराजांनी आपण येऊ शकत नसल्याचं कळवलं. का येऊ शकत नाही? याचं देखील त्यांनी कारण सांगितलं. आपल्याला डॉक्टरांनी विश्राम करण्याचा सल्ला दिला असल्याचं, कारण त्यांनी पुढे केलं. गावकरी म्हणाले, आम्ही त्यांना दवाखान्यात घेऊन जातो, मात्र त्यांनी येण्यास नकार दिला. असंही गावकऱ्यांनी सांगितले. गावकऱ्यांनी आपली फसवणूक झाली असून, इंदुरीकर महाराज यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करा, असं म्हणत गावकऱ्यांनी पोलीस स्टेशनमध्ये तुंबळ गर्दी केली.

कुठल्या ना कुठल्या कारणांनी सतत चर्चेत असणारे इंदुरीकर महाराज तारीख घेऊनही न आल्याने या एका नव्याच कारणांमुळे चांगलेच चर्चेत आले आहेत. कीर्तनाची तारीख घेऊनही कीर्तन करण्यास हजर न राहिल्याने, आता समाजातील सर्व स्तरातून इंदुरीकर महाराज यांच्यावर निशाणा साधला जात आहे. इंदुरीकर महाराज यांना कमालीची लोकप्रियता मिळाली असल्यामुळे ते या लोकप्रियतेचा गैरफायदा घेत आहेत, मात्र त्यांनी असं करणं बरोबर नसल्याच्या प्रतिक्रिया समाजातून येत असल्याचं पाहायला मिळत आहे.

यापूर्वीही कार्यक्रम केले रद्द

काही दिवसांपूर्वी इंदुरीकर महाराजांची तब्येत बरोबर नसल्याच्या बातम्या आल्या होत्या. कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी 23 ते 30 मे पर्यंतचे सर्व नियोजित कीर्तनाचे कार्यक्रम रद्द केले होते. आपली इच्छा असून, देखील आपण तब्येतीमुळे कीर्तन करू शकत नसल्याचं त्यांनी म्हटलं होतं. तब्येत व्यवस्थित नसल्याने डॉक्टरांनी विश्रांती करण्याचा सल्ला दिला आहे. असंही त्यांनी म्हंटले होते. योग्य उपचार घेतल्यानंतर, आपण पुन्हा आपल्या सेवेमध्ये येऊ. आणि नियोजित कीर्तनाचे कार्यक्रम करू. असं देखील ते म्हणाले होते. आता पुन्हा तब्येतीचं कारण त्यांच्याकडून सांगण्यात आलं असल्याने अनेकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

हे देखील वाचा Sleep Chart: वयानुसार झोप किती तास घेणं आवश्यक आहे? झोप न लागण्याची काय कारणे आहेत? वाचा सविस्तर..

Ration Card Update: रेशनकार्डमध्ये नवीन सदस्याचे नाव समाविष्ट करायचंय? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया सोप्या भाषेत..

Post Office Recruitment: भारतीय पोस्ट ऑफिसमध्ये ९८ हजार ८३ पदांची ऐतिहासीक भरती; असा करा अर्ज..

Government Scheme: या शेतकऱ्यांना सरकारकडून दिले जातेय ५० हजारांचे अनुदान; जाणून घ्या सर्व डिटेल्स..

Geological Survey of India Recruitment: दहावी पास उमेदवारांना सरकारी नोकरी करण्याची सुवर्णसंधी; जाणून घ्या डिटेल्स..

Relationship Tips: पार्टनर आपल्यावर खरं प्रेम करतो की नाही हे कसं ओळखाल? वाचा सविस्तर..

Health Tips: केळाचं नियमित सेवन केल्याने शरीरावर होतात हे पाच महत्वपूर्ण बदल; जाणून घ्या केळी खाण्याचे फायदे तोटे..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.