Sleep Chart: वयानुसार झोप किती तास घेणं आवश्यक आहे? झोप न लागण्याची काय कारणे आहेत? वाचा सविस्तर..

0

Sleep Chart:निरोगी आरोग्यापेक्षा (health) सर्वात मोठी गोष्ट या जगात काहीच नाही. जर तुमचे आरोग्य निरोगी असेल, तर जगात तुम्ही सर्वात श्रीमंत असता, असं अनेकदा म्हटलं जातं. संपत्तीच्या बाबतीत, तुम्ही कितीही श्रीमंत असला आणि जर तुमच्याकडे निरोगी आरोग्य नसेल, तर तुम्ही श्रीमंत असून देखील गरीब असता. अनेकांना हे सत्य स्वीकारणे आवश्यक आहे. कॉम्पिटिशन आणि धावपळीच्या या युगात आपला प्राधान्यक्रम चुकला आहे. संपत्तीच्या दृष्टीने श्रीमंत होण्याच्या नादात आपण आरोग्याकडे सबसेल दुर्लक्ष करतो. आणि मग अनेक समस्यांना सामोरे जाण्याची वेळ येते. माणूस जन्मल्यापासून मरेपर्यंत त्याने, आरोग्याची काळजी घेणं आवश्यक असतं.

निरोगी आरोग्य ठेवण्यासाठी पुरेसी झोप खूप आवश्यक असते. झोप ही निरोगी आयुष्याचा महत्त्वाचा घटक मानली जाते. वयानुसार किती तास झोप घेणे आवश्यक आहे, हे देखील ठरवण्यात आलं आहे. वयानुसार तुम्ही किती तास झोप घेणे आवश्यक आहे, याविषयी तुम्हाला माहिती आहे का? जर पुरेशी झोप झाली नाही, तर त्याचा परिणाम आपल्या मानसिकतेवर होतो. दिवसभर डोकेदुखीला देखील आपल्याला सामोरं जावं लागतं. साहजिकच अशा अनेक समस्यांपासून दूर राहण्यासाठी वयानुसार किती तास झोप घेणे आवश्यक आहे? जाणून घेऊया सविस्तर.

वयानुसार इतक्या तासांची झोप आवश्यक

दररोज आठ तास झोप होणं आवश्यक असल्याचं, तुम्ही अनेकदा ऐकलं वाचलं असेल. वयानुसार झोपेचं वर्गीकरण करण्यात आलं आहे. जर तुमचं वय सहा ते नऊ वर्षा दरम्यान असेल, तर तुम्हाला अकरा तासांची झोप आवश्यक आहे. दहा किंवा अकरा तास झोप झाली, तरच तुम्ही निरोगी आरोग्य जगू शकता. याशिवाय जर तुमचे वय बारा ते 16 या दरम्यान असेल, तर तुमची झोप ९ ते १० तास असणे आवश्यक आहे.

जर तुमचे वय 18 ते 64 या दरम्यान असेल, तर तुम्हाला दिवसातून किमान ७ ते ९ तास झोप निरोगी आरोग्यासाठी आवश्यक आहे. आणि जर तुमचे वय ६५ वर्षाहून अधिक असेल, तर आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी ७ ते ८ तास झोप गरजेची आहे. तुम्ही जर वरील नियमांचे पालन केले, तर इन्सोम्नियाच्या त्रासापासून तुमची सुटका होते. अनेकाना झोप न लागण्याचे प्रकार देखील पाहायला मिळतात. हे नेमकं कशामुळे होतात? आपण याविषयी देखील थोडक्यात जाणून घेऊ.

चहा, कॉफी टाळा

अनेकांना सकाळी उठल्यानंतर एक कप चहा किंवा कॉफी पिण्याची सवय असते. मात्र हे तुमच्या आरोग्यासाठी खूप हानिकारक आहे. रिकामा पोटी चहा पिल्याने तुमच्या शरीराची पचनसंस्था बिघडते. या दोन्ही पेयामध्ये कॅफिन हा घटक मोठ्या प्रमाणात आढळतो. याचा परिणाम तुमच्या झोपेवर होतो. याशिवाय या घटकामुळे रात्री तुम्हाला सातत्याने लघवीला देखील येते. साहजिकच यामुळे तुमची झोपमोड होते. आणि म्हणून चहा किंवा कॉफी पिणं तुम्ही टाळणे आवश्यक आहे. जर तुम्ही चहा शिवाय राहूच शकत नसाल, तर किमान जेवण्यापूर्वी तुम्ही सात ते आठ तास चहा पिला नाही पाहिजे.

रात्री कमी जेवन करा

अनेकांना रात्री भरपूर जेवण करण्याची सवय असते, मात्र तुमच्या निरोगी आरोग्यासाठी हे देखील घातक ठरते. रात्री नेहमी हलका आहार करणे आवश्यक असतं. सोबतच तुम्ही मसाल्याचे आणि जास्त तिखट पदार्थ खाणे देखील टाळणे गरजेचे आहे. तुम्ही दिवसभर खूप खाल्ल तरी देखील एक वेळ चालू शकतं. मात्र रात्री खूप हलका आहार करणं आरोग्यासाठी उपयुक्त आहे. जास्त तिखट आणि तेलकट मसाल्याचे पदार्थ खाल्ल्याने आणि अधिक जेवण केल्याने, तुम्हाला अपचन त्याचबरोबर पित्ताच्या समस्या देखील उद्भवतात. साहजिकच त्यामुळे तुमची झोपमोड होते.

रात्री व्यायाम टाळा 

अनेकांना संध्याकाळी व्यायाम करण्याची सवय असते. मात्र ही व्यायाम करण्याची योग्य पद्धत नाही. तुम्ही व्यायाम हा सकाळीच करणं आवश्यक आहे. जर तुम्हाला सकाळी वेळ नसेल, आणि संध्याकाळी व्यायाम करण्याव्यतिरिक्त काही पर्याय नसेल, तर तुम्ही जेवन करण्याच्या किमान चार ते पाच तास अगोदर व्यायाम करणे आवश्यक आहे. व्यायाम करून तुम्ही एक किंवा दोन तासाने जेवण केलं, तर याचा परिणाम तुमच्या झोपेवर होतो.

हे देखील वाचा Ration Card: नवीन रेशन कार्डसाठी असा करा online, ऑफलाईन अर्ज; दहा दिवसांत रेशन कार्ड मिळेल घरपोच..

Tea Side Effects: उठल्यानंतर सकाळी चहा पित असाल तर सावधान; शरीरावर होतायत हे सात गंभीर परिणाम..

Post Office Recruitment: भारतीय पोस्ट ऑफिसमध्ये ९८ हजार ८३ पदांची ऐतिहासीक भरती; असा करा अर्ज..

Geological Survey of India Recruitment: दहावी पास उमेदवारांना सरकारी नोकरी करण्याची सुवर्णसंधी; जाणून घ्या डिटेल्स..

Proprietary Rights: हे सात पुरावे तुमच्याकडे असतील तरच तुम्ही जमिनीचे मालक असता..

अतिक्रमण: जमिनीवरील अतिक्रमण हटवण्याची ही आहे योग्य प्रक्रिया..

Infinix Hot 12: 50 MP कॅमेरा आणि 6000mAh बॅटरी असणारा स्मार्टफोन केवळ साडेनऊ हजारांत; जाणून घ्या सर्व डिटेल्स..

Health Tips: केळाचं नियमित सेवन केल्याने शरीरावर होतात हे पाच महत्वपूर्ण बदल; जाणून घ्या केळी खाण्याचे फायदे तोटे..

Health Tips: डेंग्यूचा डास फक्त याच लोकांना चावतो; डेंगू पासून दुर राहायचं असेल तर करा हे काम..

Relationship Tips: पार्टनर आपल्यावर खरं प्रेम करतो की नाही हे कसं ओळखाल? वाचा सविस्तर..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.