Amruta fadnavis: मकर संक्रांतीच्या ‘या’ शुभेच्छामुळे अमृता फडणवीस पुन्हा ट्रोल; पाहा व्हिडिओ..

0

Amruta fadnavis: सध्या सगळीकडेच मोठ्या धुमधडाक्यात मकर संक्रांतीचा (Makar Sankranti) उत्सव साजरा केला जात आहे. नविन वर्षातला हा पहिलाच सण असल्यामुळे या सणाला विशेष महत्व आहे. या सणानिमित्त मोठ-मोठे सेलिब्रिटी देखील आकाशात उंच-उंच पतंग उडवताना पाहायला मिळतात. अनेक ठिकाणी सामूहिक पतंग महोत्सवाचे आयोजन देखील करण्यात येते. ज्यामध्ये सेलीब्रिटींना सुद्धा सहभागी करुन घेतलं जातं. मकर संक्रांतीच्या सणानिमित्त अनेक सेलेब्रिटी आपापल्या चाहतांना शुभेच्छा देताना पाहायला मिळतात. अमृता फडणवीस यांनी देखील आपल्या चाहत्यांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र या शुभेच्छामुळे त्या पुन्हा एकदा चांगल्याच ट्रोल झाल्या आहेत.

आपण पाहतो, सेलीब्रिटीसुद्धा आपल्या चाहत्यांना अनोख्या प्रकारे शुभेच्छा देऊन, या उत्साहात भर घालत असतात. मात्र बर्‍याचदा शुभेच्छा देताना झालेल्या छोट्या चुकीमुळे सेलीब्रिटींना देखील ट्रोलर्सला सामोरे जावे लागते. सध्या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta fadnavis) यांना यातून जावे लागत आहे. मकर संक्रांती निमीत्त त्यांनी दिलेल्या शुभेच्छावरुन त्यांना ट्रोल केले जात आहे. मात्र नेमक्या कोणत्या कारणांमुळे त्यांना ट्रोल केलं जातयं, हेच आपण जाणून घेणार आहोत.

अमृता फडणवीस नेहमी चर्चेत असतात. सध्या “मुड बना लिया” या गाण्याने त्या चर्चेत आहेत. “मुड बना लिया” या गाण्याला त्यांनी आवाज दिलाय. याशिवाय या गाण्यावर त्यांनी डान्स सुद्धा केला आहे. या गाण्यामुळे सोशल मीडियावर त्यांना खूप मोठ्या प्रमाणात ट्रोल व्हावं लागलं. मात्र आता त्यांनी मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्यामुळे देखील ट्रोल व्हावं लागत आहेत. मकर संक्रांतीनिमीत्त त्यांनी एक व्हिडिओ सोशल मिडीयावर पोस्ट केलाय. (Social media Viral video) आपल्या चाहत्यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांनी हा व्हिडिओ टाकलाय. मात्र या व्हिडिओत त्यांच्या भाषेचा टोन हा फॉरेन लँग्वेज असल्याने टीकेला सामोरे जावे लागत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत अमृता फडणवीस पतंग उडवतांना दिसत आहेत. त्यांनी यामध्ये निळ्या रंगाचे कपडे परिधान केले आहेत. आकाशात उंच उडत असणार्‍या पतंगाला सांभाळतच त्यांनी आपल्या चाहत्यांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या. ज्यामध्ये “तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला, हॅप्पी मकर सक्रांत” अशा त्या म्हणाल्या. मात्र यात त्यांच्या भाषेचा टोन हा फॉरेन लँग्वेजचा आहे. यामुळे त्या पुन्हा एकदा ट्रोलर्सच्या निशाण्यावर आल्या आहेत.

अमृता फडणवीसांना नेहमी त्यांच्या आवाजावरुन ट्रोल केलं जातं. त्यांचा आवाज बेसुरा असून केवळ देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी असल्यामुळे त्यांना गाणे गाण्याची संधी दिली जात असल्याचा आरोप केला जातो. त्यामुळे त्यांच्या आवाजावरुन नेटकरी कायम त्यांना ट्रोल करत असतात. आवाजाबरोबरच त्यांनी या गाण्यामध्ये डान्स सुद्धा केला आहे.

हे देखील वाचाChanakya Niti: स्त्री-पुरुषांना लग्नापूर्वी या चार गोष्टी माहीत असायलाच हव्या अन्यथा..

Virat Kohli: टी ट्वेण्टी क्रिकेट मधून विराटने जाहीर केली निवृत्ती; कोहलीच्या पोस्टमुळे एकच खळबळ..

Health Benefits of Sex: शारीरिक संबंधामध्ये अंतर पडल्यास या पाच गंभीर समस्या घेतात जन्म; जाणून घ्या महिन्यात किती वेळा सेक्स करणे आहे गरजेचे..

Benefits Of Foreplay: फोरप्लेमुळे दीर्घ काळ सेक्स आणि महिलांना मिळतो भरपूर आनंद; जाणून घ्या लैंगिक संबंधात याचे महत्व..

Acharya Chanakya: पत्नीमध्ये हे चार गुण असतील तर यश तुमच्या पायाशी घालते लोटांगण..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.