Acharya Chanakya: पत्नीमध्ये हे चार गुण असतील तर यश तुमच्या पायाशी घालते लोटांगण..

0

Acharya Chanakya: आचार्य चाणक्य (aacharya Chanakya) यांनी आपल्या नीतीशास्त्रामध्ये अनेक विषयांवर भाष्य केलं आहे. आचार्य चाणक्य यांनी नाते संबंधावर देखील लिहून ठेवलं आहे. एक उत्कृष्ट पत्नीमध्ये कोणते गुण असायला हवेत, याविषयी देखील चाणक्य यांनी सविस्तर माहिती सांगितलेली आहे. कूटनीती, अर्थशास्त्र, नातेसंबंध अशा अनेक विषयांवर चाणक्य नीति हा ग्रंथ आचार्य चाणक्य यांनी लिहून ठेवला आहे. आजही अनेकजण या ग्रंथाचा अवलंब करून आपले आयुष्य यशस्वीरित्या जगतात.

आचार्य चाणक्य यांनी आपल्या नीतीशास्त्रामध्ये पती आणि पत्नी या दोघांचेही गुण आणि दोष सांगितले आहेत. पुरुषांमध्ये कोणते गुण असतील, तर आदर्श पती म्हणून तो समोर येतो याविषयी देखील त्यांनी सविस्तर सांगितले आहे. तसेच पत्नीमध्ये कोणते चार गुण असतील, तर पती भाग्यवान समजले जातात. याविषयी देखील त्यांनी सविस्तर माहिती सांगितलेले आहे. आज आपण पत्नीमध्ये कोणते चार गुण असतील, तर पती भाग्यवान समजले जातात? याविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत.

आचार्य चाणक्य यांनी आपल्या नीतीशास्त्रामध्ये जी स्त्री सुशिक्षित असते, शिकलेली असते, सुसंस्कृत असते, ज्या महिलेला धार्मिक पुस्तकं वाचायची आवड असते, धार्मिक विषयांचे ज्ञान असते, अशी महिला पुरुषांसाठी खूप भाग्यवान असते. अशा महिलांना योग्य अयोग्य यातला फरक उत्तमरित्या समजला जातो. साहजिकच अशा महिला पुरुषांच्या आयुष्यात आल्यानंतर, पुरुषांना यश पटकन मिळतं. असं आचार्य चाणक्य सांगतात. अशा महिला आपल्या मुलांवर चांगले संस्कार करण्यात प्रमुख भूमिका बजावतात. अर्थात पिता म्हणून, त्या तुमची जबाबदारीही पार पाडते.

आचार्य चाणक्य यांच्यामध्ये असे पुरुष भाग्यवान असतात, ज्याच्या आयुष्यात बचत करणाऱ्या स्त्रिया असतात. जो मनुष्य पैशाची बचत करतो, अशा मनुष्याला भविष्यात इतरांच्या तुलनेत कमी संकटे येतात. मनुष्याची पत्नी जर बचत करणारी असेल, तर त्याच्यापेक्षा भाग्यवान मनुष्य या पृथ्वीतलावर दुसरा नाही. असं आचार्य चाणक्य सांगतात. महिलांना पैसे खर्च करण्याची सर्वात जास्त आवड असते. मात्र पैसा बचत करणाऱ्या महिला पुरुषांच्या आयुष्यात नवीन ऊर्जा घेऊन येतात.

आचार्य चाणक्य सांगतात, ज्या मनुष्याची पत्नी प्रेमळ आणि नम्र असेल, असे मनुष्य भाग्यवान असतात. जी महिला आपल्या नातेवाईकांसोबत प्रेमाने आणि नम्रपणाने वागते, त्या महिलेसोबत पुरुषाचे कधीही वादविवाद होत नाहीत. असं आचार्य चाणक्य सांगतात. महिला ह्या खूप भांडकुदया असतात. किरकोळ गोष्टीवरून वाद घालण्याची महिलांना सवय असते. मात्र ज्या महिला नम्र आणि प्रेमळ असतात. अशा महिलांसोबत कोणाचेही वाद विवाद होत नाहीत. अशा महिला पुरुषांच्या आयुष्यात खूप महत्त्वाचा रोल अदा करतात, असं आचार्य चाणक्य सांगतात.

आचार्य चाणक्य सांगतात, पुरुषांच्या आयुष्यामध्ये जर संयमी महिला असतील, तर असे पुरुष खूप भाग्यवान समजले जातात. पत्नी संयमी असेल तर पुरुषांना संकटाचा सामना करण्यासाठी अधिक बळ मिळतं. कितीही मोठं संकट आलं, तरी पत्नी आपल्या पतीला धैर्याने सामना करण्याचा सल्ला देखील देते. याउलट अनेक महिला आपल्या पतीवर संकटे आल्यानंतर बाजूला सरतात. मात्र संयमी महिला पुरुषांच्या आयुष्यात आल्यानंतर, यश तुमच्या पायाजवळ लोटांगण घालते.

हे देखील वाचाFree Silai Machine Yojana: नवीन वर्षात केंद्र सरकार महिलांना देतंय मोफत शिलाई मशीन; असा करा अर्ज..

Chanakya Niti: पुरुषांच्या या तीन सवयींवर जीव ओवाळून टाकतात महिला..

MSRTC Recruitment 2023: दहावी पास उमेदवारांसाठी एसटी महामंडळात निघाली मोठी भरती; जाणून घ्या सर्व डिटेल्स..

MPSC Recruitment 2023: MPSC मार्फत या पदांसाठी हजाराहून अधिक जागांची मेगा भरती..

Sajid Khan: साजिद खानचे काळे कारनामे उघड, प्रसिद्ध अभिनेत्रीच्या पँटमध्ये हात घालून करायचा..; पहा व्हिडिओ 

Wearing Bra While Sleeping: तुम्हीही ब्रा घालून झोपता? असाल तर त्वरीत थांबवा अन्यथा..

PM Kusum Yojana: आता मागेल त्याला दिला जाणार सौर पंप; जाणून घ्या सौर पंप मिळवण्याची संपूर्ण प्रक्रिया..

Relationship Tips: संबंध करताना या 5 गोष्टींतून कळते तुमचा पार्टनर मनापासून साथ देतोय का..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.