MPSC Recruitment 2023: MPSC मार्फत या पदांसाठी हजाराहून अधिक जागांची मेगा भरती..

0

MPSC Recruitment 2023: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) माध्यमातून नोकरीला (nokari) लागणे अनेकांचं स्वप्न असतं. अनेक जण यासाठी वर्षं वर्ष मेहनत देखील घेत असतात. मात्र पुरेशा संधी उपलब्ध नसल्याने, अनेकांना आपल्या स्वप्नांवर विरजण घालावे लागते. मोठ-मोठी संधी निर्माण होत नसल्या तरी देखील तुम्हाला ज्या संधी निर्माण झालेल्या आहेत, त्यासाठी प्रयत्न करणे देखील आवश्यक असतं. जर तुम्ही एमपीएससीची तयारी करत असाल, तर त्याच्यासाठी ही बातमी खूप महत्वाची आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत अनेक पदांसाठी तब्बल १ हजार ३७ जागांची मेगा भरती निघाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी अर्ज करण्याची मुदत 11 जानेवारी 2023 निश्चित करण्यात आली आहे. ही परीक्षा महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा असणार आहे. (Maharashtra Group-C Services Joint Prelims Examination) आपण या परीक्षा अंतर्गत कोणकोणत्या विभागात किती जागा भरण्यात येणार आहे. त्याच बरोबर या भरतीसाठी उमेदवारांची पात्रता काय ठेवण्यात आलेली आहे? हे देखील सविस्तर जाणून घेऊ.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षेची शैक्षणिक पात्रता काय ठेवण्यात आली आहे? उद्योग निरीक्षक गट-क या पदासाठी उमेदवाराची शैक्षणिक पात्रता ही सांविधिक विद्यापीठ अभियांत्रिकी, त्याचबरोबर स्थापत्य अभियांत्रिकी या विषयाच्या विज्ञान शाखेतील सांविधिक विद्यापीठाची पदवी असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर उमेदवारांना मराठी भाषेचे ज्ञान देखील असणे आवश्यक आहे. उद्योग निरीक्षक गट-क या पदासाठी एकूण सहा रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

दुय्यम निरीक्षक गट-क : या पदासाठी एकूण नऊ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या पदासाठी शैक्षणिक पात्रतेचा विचार करायचा झाल्यास उमेदवाराने कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी संपादन केलेली असणे आवश्यक आहे. मराठी भाषेचे ज्ञान देखील उमेदवारांना असणे आवश्यक आहे.

कर सहाय्यक गट-क: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या कर सहाय्यक गट-क या पदासाठी एकूण 481 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी उमेदवारांची शैक्षणिक पात्रता जाणून घ्यायची झाल्यास, कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी उमेदवारांकडे असणे आवश्यक आहे. सोबतच मराठी टंकलेखनाचा वेग 30 शब्द प्रतिमिनिट याप्रमाणे असणे देखील आवश्यक आहे. सोबतच इंग्रजीतून टायपिंग देखील आवश्यक आहे. इंग्रजीचा टायपिंग वेग हा किमान एका मिनिटात 40 शब्द याप्रमाणे असणे आवश्यक आहे. सोबतच मराठी भाषेचे ज्ञान देखील उमेदवारांना असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा आणि परीक्षा फी

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षेच्या जागांसाठी उमेदवारांच्या वयोमर्यादा विचार करायचा झाल्यास, सरकारी नियमानुसार वयोमर्यादेची अट उमेदवारांना असणार आहे. यामध्ये मागासवर्गीय त्याचबरोबर एससी/ एसटी उमेदवारांसाठी पाच वर्षाची अतिरिक्त सूट दिली जाणार आहे. ओबीसी या प्रवर्गातील उमेदवारांना तीन वर्ष अतिरिक्त सूट मिळणार आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत करण्यात येणाऱ्या महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षेच्या जागांसाठी उमेदवारांना काही अर्ज फी भरावी लागणार आहे. यामध्ये कॅटेगिरीच्या विद्यार्थ्यांना 544 रुपये अर्ज शुल्क आकारण्यात येणार आहे. त्याचबरोबर दिव्यांग उमेदवारांना 344 रुपये अर्ज शुल्क आकारलं जाणार आहे. तर माजी सैनिक यांना 44 रुपये अर्ज शुल्क आकारले जाणार आहे. आता आपण उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज कसा करायचा? त्याच बरोबर निवड करण्यात येणाऱ्या उमेदवारांना वेतन किती असणार? जाणून घेऊया सविस्तर.

वेतन/ ऑनलाईन अर्ज

निवड करण्यात येणाऱ्या उमेदवारांच्या वेतनाविषयी जाणून घ्यायचे झाल्यास, उमेदवारांना 19 हजार 900 पासून एक लाख 12 हजार चारशे रुपयांपर्यंत दरमहा वेतन मिळणार आहे. उमेदवारांच्या नोकरीच्या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असणार आहे. आता आपण उमेदवारांना ऑनलाईन अर्ज कसा करायचा हे जाणून घेऊ.

या परीक्षेसाठी उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम तुमच्या मोबाईल मधील क्रोमवर जाऊन www.mpsc.gov.in असं सर्च करणे आवश्यक आहे. यानंतर तुमच्यासमोर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अधिकृत वेबसाईट ओपन होईल. नंतर तुम्ही खाली स्क्रोल केल्यानंतर सविस्तर ऑनलाईन अर्ज करू शकता. डायरेक्ट अर्ज करण्यासाठी यावर क्लिक करा.

हे देखील वाचा ​​IOCL Recruitment 2022-23: या उमेदवारांसाठी इंडियन ऑइलमध्ये दीड हजारांहून अधिक पदांची मेगा भरती..

PM Kusum Yojana: आता मागेल त्याला दिला जाणार सौर पंप; जाणून घ्या सौर पंप मिळवण्याची संपूर्ण प्रक्रिया..

CR Recruitment 2022: दहावी पास उमेदवारांसाठी सेंट्रल रेल्वेत हजारो पदांची मेगा भरती; असा करा ऑनलाईन अर्ज..

PMGKAY: मोफत रेशनच्या नियमात सरकारने केला मोठा बदल; आता रेशन मिळणार इतके..

Sajid Khan: साजिद खानचे काळे कारनामे उघड, प्रसिद्ध अभिनेत्रीच्या पँटमध्ये हात घालून करायचा..; पहा व्हिडिओ 

Breast Personality: स्तनाचा आकार सांगतो महिलांच्या व्यक्तिमत्त्वाविषयी सर्व काही; अशा आकाराच्या स्त्रिया पतीसाठी ठरतात वरदान..

Wearing Bra While Sleeping: तुम्हीही ब्रा घालून झोपता? असाल तर त्वरीत थांबवा अन्यथा..

Electric Bike: स्मार्टफोनच्या पैशात मिळतेय ही तगडी इलेक्ट्रिक बाईक; जाणून घ्या डिटेल्स..

Ration Card: रेशनकार्ड मिळणार आता एका आठवड्यात; जाणून घ्या सर्व डिटेल्स अर्जासहित..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.