Electric Bike: स्मार्टफोनच्या पैशात मिळतेय ही तगडी इलेक्ट्रिक बाईक; जाणून घ्या डिटेल्स..

0

Electric Bike: पेट्रोलच्या (petrol price) दराने शंभरी ओलांडली असल्यामुळे आता इंधनावर टू-व्हीलर चालवणे अनेकांना परवडत नाही. महागाई बरोबरच इंधन देखील वाढलं असल्याने (fuel price) आता अनेकजण सार्वजनिक वाहनांचा वापर करतात. स्वतःची गाडी असून, देखील आता अनेकांना सार्वजनिक वाहनांचा वापर करण्याची वेळ आली आहे. या सगळ्या संकटातून बाहेर पडण्यासाठी अनेकजण इलेक्ट्रिक वाहनांचा (electric vehicles) देखील वापर करताना पाहायला मिळतात. तुम्ही देखील इलेक्ट्रिक टू-व्हीलर (electric two wheeler) खरेदी करायचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.

इंधनाचे वाढते दर लक्षात घेऊन, अनेक बड्या कंपन्यांनी आपला मोर्चा इलेक्ट्रिक वाहन निर्मितीकडे वळवला आहे. ग्राहकांची मागणी आणि इंधन दरवाढ यामुळे मार्केटमध्ये अनेक मोठमोठ्या कंपन्यांच्या इलेक्ट्रिक गाड्या बाजारात विक्रीसाठी उपलब्ध झाल्या आहेत. Revolt RV400 ही इलेक्ट्रिक बाईक देखील बाजारात उपलब्ध झाली असून, ही इलेक्ट्रिक बाइक तुम्ही केवळ वीस हजारांत घरी आणू शकता. होय तुम्ही बरोबर वाचलं आहे. काय आहे? या संदर्भातली ऑफर जाणून घेऊया सविस्तर.

बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असलेली Revolt RV400 e-bike या इलेक्ट्रिक बाईकची किंमत 1.25 लाख रुपये आहे. मात्र ही बाइक खरेदी करण्यासाठी तुम्ही केवळ २० हजार भरू शकता. तुम्हाला रिव्हॉल्ट RV400 या इलेक्ट्रिक गाडीच्या खरेदीवर फायनान्स प्लॅन उपलब्ध आहेत. ज्यामध्ये तुम्ही केवळ 20 हजार भरायचे आहेत. २० हजार रक्कम भरून तुम्ही ही तगडी इलेक्ट्रिक बाईक घरी आणि शकता.

बाकी रक्कम तुम्ही कर्ज घ्याचे आहेत. एकूण 1 लाख 15 हजार रुपये तुम्हाला कर्ज घ्यावे लागणार आहे. यासाठी कॅल्क्युलेटरनुसार तुम्हाला कर्जाचे व्याज हे 9% असणार आहे. सोबतच हे कर्ज तुम्हाला 3 वर्षांच्या मुदतीकरिता घेतले जाणार आहे. कर्ज मंजूर झाल्यानंतर तुम्हाला प्रत्येक महिन्याला 3,673 रुपयांचा EMI भरावा लागणार आहे. म्हणजेच ३ वर्षात तुम्ही 132,228 रुपये अदा करणार आहात. म्हणजेच तीन वर्षांमध्ये तुम्हाला केवळ 16,725 अतिरिक्त रक्कम द्यावी लागणार आहे. आता आपण या इलेक्ट्रिक गाडीचे वैशिष्ट्ये आणि फिचर्स जाणून घेऊ.

Revolt RV400 वैशिष्ट्ये आणि फिचर्स

रिव्हॉल्ट RV400 या इलेक्ट्रिक बाईकला 3KW मिड ड्राइव्ह अशी मोटर प्रदान करण्यात आली आहे. 72V, 3.24KWh लिथियम त्याचबरोबर आयन बॅटरीसह जोडण्यात आली आहे. ही इलेक्ट्रिक गाडी ताशी 85 किलोमिटरचा प्रवास पूर्ण करते. त्याचबरोबर ही इलेक्ट्रिक बाईक एकदा चार्ज केल्यानंतर तब्बल 156 किलोमीटर प्रवास करते. तसेच ही बाईक फुल्ल चार्जिंग होण्यासाठी केवळ 4 तासाचा कालावधी लागतो.

रिव्हॉल्ट RV400 या इलेक्ट्रिक बाईकच्या संपूर्ण बाइट डायग्नोस्टिक बॅटरीची स्थिती ही राइड स्टॅटिस्टिक्स तसेच रिव्हॉल्ट स्विच स्टेशनलाग देखील सपोर्ट करते. बाइकला इको, नॉर्मल आणि स्पोर्ट असे 3 राइडिंग मोड मिळतात. RV400 या इलेक्ट्रिक बाइकमध्ये तुम्हाला रिमोट स्मार्ट सपोर्ट दिला जातो. सोबतच रिअल टाइम जिओ फेन्सिंग त्याचबरोबर ओटीए अपडेटसह ही बाईक मिळते.

हे देखील वाचाHardik Pandya: अखेर हार्दिक पांड्याची व्हाईट बॉल क्रिकेटच्या कर्णधारपदी अधिकृत निवड; जारी झाला व्हिडिओ..

Hardik Pandya: हार्दिक पांड्याने नाकारली कॅप्टन पदाची ऑफर; कारणही आले समोर..

Sushant Singh Rajput: सुशांत सिंगच्या शरीरावर होत्या विचित्र खुणा, सुशांतची हत्या होऊनही डॉक्टरांनी मला..; पोस्टमार्टम करणाऱ्याने सांगितले त्या रात्री काय घडलं..

Ration Card: रेशनकार्ड मिळणार आता एका आठवड्यात; जाणून घ्या सर्व डिटेल्स अर्जासहित..

IND vs SL: मोठा निर्णय! ऋषभ पंत, केएल राहुलला टी-20 संघातून डच्चू; इशान किशन संजू सॅमसनला पूर्व वेळ संधी..

FIFA world cup final: अर्जेंटिना जिंकताच तरुणी झाली पूर्णपणे उघडी; पाहा व्हिडिओ..

Yamaha RX100: बुलेटला टक्कर देण्यासाठी Yamaha RX100 झाली सज्ज; जाणून घ्या किंमत लूक आणि फिचर्स..

PMGKAY: मोफत रेशनच्या नियमात सरकारने केला मोठा बदल; आता रेशन मिळणार इतके..

CR Recruitment 2022: दहावी पास उमेदवारांसाठी सेंट्रल रेल्वेत हजारो पदांची मेगा भरती; असा करा ऑनलाईन अर्ज..

Kiara Advani: पायावर पाय टाकताना कियारा अडवाणीचं सगळंच दिसलं; पाहा व्हिडिओ

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.