IND vs SL: मोठा निर्णय! ऋषभ पंत, केएल राहुलला टी-20 संघातून डच्चू; इशान किशन संजू सॅमसनला पूर्व वेळ संधी..
IND vs SL: आगामी t20 विश्वचषकाच्या (T20 World Cup) तयारीसाठी भारतीय क्रिकेट संघात (Indian cricket team) मोठे बदल केले जाणार आहेत. आगामी टी-ट्वेंटी विश्वचषक डोळ्यासमोर ठेवून बीसीसीआयने (BCCI) आतापासूनच जोरदार तयारी सुरू केली आहे. यापुढे सीनियर आणि ज्युनियर असा भेदभाव केला जाणार नसून, मेरिटवर खेळाडूंना अंतिम 11 मध्ये संधी मिळणार असल्याचे जाहीर करण्यात आलं आहे. कसोटी क्रिकेटला आपल्या तालावर नाचवणाऱ्या ऋषभ पंतला (Rishabh pant) टी-ट्वेण्टीमध्ये धक्का देत BCCI ने मोठा निर्णय घेतला आहे.
आगामी टी-ट्वेंटी क्रिकेटसाठी हार्दिक पांड्याची कर्णधार म्हणून निवड करण्यात येणार आहे. अद्याप त्याची अधिकृत निवड झाली नसली तरी त्याची निवड निश्चित मानली जात आहे. पांड्याच्या नेतृत्वाखाली भारताला आगामी t20 विश्वचषक खेळायचा आहे. यासाठी आतापासूनच तयारी सुरू केली असून, केएल राहुल KL Rahul रोहित शर्मा Rohit Sharma ऋषभ पंत (Rishabh pant) यासारख्या तगड्या खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवला जाणार आहे. पुढील महिन्यांत होणाऱ्या श्रीलंके विरुद्धच्या टी-ट्वेंटी मालिकेत देखील या तिघांना वगळले जाणार आहे.
सात वर्षांमध्ये केवळ 24 आंतरराष्ट्रीय सामने खेळणाऱ्या संजू सॅमसनला आता भारतीय क्रिकेट बोर्ड पूर्णवेळ संधी देणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळाली आहे. सोबतच गुणवत्ता असून, देखील आपल्या अप्रोचमुळे संकटात सापडलेल्या केएल राहुलला देखील टी-ट्वेंटी क्रिकेट मधून बाहेरचा रस्ता दाखवला जाणार असून, त्याच्या जागी इशान किशनची निवड केली जाणार असल्याची माहिती देखील समोर आली आहे.
म्हणून घेतला जाणार निर्णय
सगळ्यात कठीण फॉर्मेट समजल्या जाणाऱ्या कसोटीमध्ये (test cricket) ऋषभ पंतने अनेक अविस्मरणीय इनिंग खेळल्या आहेत. अनेक महान खेळाडूंना जे जमलं नाही, ते ऋषभ पंतने गेल्या दोन वर्षांमध्ये करून दाखवलं आहे. अनेक अशक्यप्राय आव्हानांचा सामना करताना त्याने भारताला इंग्लंड, साउथ आफ्रिका, आणि ऑस्ट्रेलियामध्ये एकहाती विजय मिळवून दिले. मात्र टी-ट्वेंटी फॉरमॅटमध्ये ऋषभ पंतची कामगिरी फारच निराशा जनक राहिली आहे. त्याने ६६ सामन्यांत केवळ २२ च्या सरासरीने केवळ ९८७ धावा केल्या आहेत.
गेल्या काही महिन्यांपासून केल राहुलवर देखील सातत्याने टीका होत आहे. गुणवत्ता असून देखील केएल राहुल आपला निगेटिव्ह माईंड सेट (negative mind set) घेऊन मैदानात उतरतो. 2014 पासून त्याला आपल्या गुणवत्तेला साजेसा खेळ करता आला नाही. महत्त्वाच्या सामन्यात नेहमी नांग्या टाकत असल्याने आता त्याच्यावर देखील मोठ्या निर्णय घेण्याची वेळ आली आहे. राहुलला टी-ट्वेंटी संघातून बाहेरचा रस्ता दाखवला जाणार असून, आता यापुढे खेळाडूंना मेरिटवर संघात स्थान दिले जाणार असल्याचे बीसीसीआय कडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
दुसरीकडे जबरदस्त फॉर्ममध्ये असणाऱ्या इशान किशन (Ishan Kishan) आणि संजू सॅमसनला (Sanju Samson) आता सामन्याच्या तुलनेत मोठी संधी दिली जाणार असून, या दोघांकडे आगामी t20 विश्वचषकाचे दावेदार म्हणून पाहिले जात आहे. श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या तीन टी-ट्वेंटी आणि 3 एकदिवसीय सामन्याच्या मालिकेसाठी चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली जुनीच निवड समिती संघ निवडणार आहे. आगामी श्रीलंकेविरुद्धच्या तीन टी ट्वेन्टी मालिकेसाठी निवडल्या जाणाऱ्या संघातून राहुल आणि ऋषभ पंतला अधिकृतरित्या वगळलं जाणार आहे.
हे देखील वाचाYamaha RX100: बुलेटला टक्कर देण्यासाठी Yamaha RX100 झाली सज्ज; जाणून घ्या किंमत लूक आणि फिचर्स..
PMGKAY: मोफत रेशनच्या नियमात सरकारने केला मोठा बदल; आता रेशन मिळणार इतके..
Hardik Pandya: हार्दिक पांड्याने नाकारली कॅप्टन पदाची ऑफर; कारणही आले समोर..
Kiara Advani: पायावर पाय टाकताना कियारा अडवाणीचं सगळंच दिसलं; पाहा व्हिडिओ..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम