Yamaha RX100: बुलेटला टक्कर देण्यासाठी Yamaha RX100 झाली सज्ज; जाणून घ्या किंमत लूक आणि फिचर्स..

0

Yamaha RX100: ९० च्या दशकात Yamaha RX100 या मोटारसायकलने अक्षरशः धुमाकूळ घातला होता. या टू-व्हीलरची तरुणाईमध्ये प्रचंड क्रेझ होती. मात्र काही वर्षानंतर, या बाईकची निर्मिती थांबवण्यात आली. आणि या बाईक प्रेमींची खूप मोठी निराशा झाली. परंतु आता पुन्हा एकदा मार्केट गाजवण्यासाठी ही बाईक सज्ज झाली आहे. जर तुम्ही देखील या बाईचे चाहते असाल, तर कंपनीने तुमच्यासाठी खुशखबरी आणली आहे. देशातील यामाहाचे चेअरमन इशिन चिहाना यांनी या बाईक संदर्भात मोठी अपडेट दिली आहे.

Yamaha कंपनी आता Yamaha RX100 ची निर्मिती करणार असून, आपल्या जुन्या बाईकमध्ये अनेक बदल करणार आहे. या बाईकच्या लुकमध्ये कोणताही बदल करणार नसल्याची माहिती यामाहाचे चेअरमन इशिन चिहाना यांनी दिली आहे. कंपनीने यामाहा आर एक्स 100 च्या लुकमध्ये कोणतेही बदल करण्यात येणार नसला तरी, नवीन तंत्रज्ञानासह ही बाईक सज्ज होणार आहे. सोबतच या बाईचे इंजिन देखील अधिक बलशाली करण्यात येणार आहे.

Yamaha RX100 ही बाईक आता नव्या अवतारात येणार आहे. मात्र अनेकांच्या मनात या बाईकच्या आवाजा विषयी प्रश्न आहेत. मात्र केंद्र सरकारने घालून दिलेल्या नियमांनुसारच कंपनी आपल्या बाईकची निर्मिती करणार आहे. BS6 अंतर्गत जो नियम ठरवून दिला आहे. त्याच पद्धतीने कंपनी आपल्या बाईकची निर्मिती करणार आहे. RX100 चे दोन स्ट्रोक इंजिन मात्र कंपनीला वापरता येणार नाही. परंतु RX100 च्या आवाजावर मात्र कोणताच परिणाम होणार नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.

नवीन RX100 च्या इंजिनमध्ये मात्र अनेक बदल केले जाणार आहेत. असं देखील कंपनीकडून स्पष्ट करण्यात आले आहे. यामाहा इंडियाच्या चेअरमन यांनी दिलेल्या माहितीनुसार,आरएक्स 100 ही बाईक तिच्या लूकसाठी डिझाईन त्याचबरोबर आवाज हे सर्व या बाईक प्रेमीच्या आजही लक्षात आहे. साहजिकच यामुळे आम्ही हे सर्व फिचर्स या बाईकमध्ये तसेच ठेवत आहोत. मात्र बुलेटला टक्कर देण्यासाठी इंजिनमध्ये बदल करण्यात येणार आहे.

यामाहा कंपनीने आपल्या गाड्यांच्या निर्मितीमध्ये 125cc दीडशे त्याचबरोबर 250cc चे इंजिन देखील कंपनीने आपल्या दुचाकींना वापरण्यात आलं आहे. यामधील कोणतेही इंजिन कंपनी आपल्या आगामी Yamaha RX100 या टू व्हीलरसाठी वापरणार आहे. मीडियाने केलेल्या दाव्यानुसार, कंपनी आपल्या आगामी Yamaha RX100 या बाईसाठी 125 किंवा 150cc चे इंजिन वापरणार आहे. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कट्टर प्रतिस्पर्धी रॉयल इन्फिल्डला टक्कर देण्यासाठी देखील यामाहा २५०cc इंजिन देखील वापरण्याची शक्यता आहे.

एवढेच नाही, तर ३५०cc बाईक देखील बाजारात उतरवण्याची शक्यता वर्तवली गेली आहे. त्यामुळे मार्केटमध्ये यामाहा काय रूप घेऊन येते, हे पाहणं आता या गाडी प्रेमींसाठी मोठं औत्सुक्याचे ठरणार आहे. मार्केटमध्ये रॉयल इन्फिल्ड उतरल्यानंतर या गाडीचा मार्केट कमी झालं, अर्थात आता रॉयल एनफिल्डशी दोन हात करण्यासाठी कंपनी या गाडीची निर्मिती करणर असल्याची माहिती आहे. 2026 पर्यंत ही गाडी ग्राहकांच्या भेटीला येऊ शकते.

हे देखील वाचा IND vs BAN: बाद झाल्यानंतर विराट कोहलीचा राग अनावर, थेट या खेळाडूला दिली आय-माय वरून शिवी; पाहा व्हिडिओ..

Vishnupriya Engagement: विष्णुप्रियाने या तरूणासोबत गुपचूप उरकला साखरपुडा; पाहा व्हिडिओ..

PMGKAY: मोफत रेशनच्या नियमात सरकारने केला मोठा बदल; आता रेशन मिळणार इतके..

Mahesh Mote News: रिल्स स्टार महेश मोटे याचा कार अपघातात मृत्यू..

Kiara Advani: पायावर पाय टाकताना कियारा अडवाणीचं सगळंच दिसलं; पाहा व्हिडिओ..

CR Recruitment 2022: दहावी पास उमेदवारांसाठी सेंट्रल रेल्वेत हजारो पदांची मेगा भरती; असा करा ऑनलाईन अर्ज..

IPL 2023: आयपीएल 2023 मध्ये धोनीच देणार आहे बेन स्टोक्सकडे कर्णधारपद; सीईओ काशी विश्वनाथ यांनी केले स्पष्ट

Male fertility Facts: या वयानंतर पुरुषांचे स्पर्म येते संपुष्टात; जाणून घ्या मुल जन्माला घालण्याचे पुरुषांचे योग्य वय..

Hardik Pandya: हार्दिक पांड्याने नाकारली कॅप्टन पदाची ऑफर; कारणही आले समोर..

Gautami Patil: म्हणून होतेय गौतमी पाटीलवर बंदी घालण्याची मागणी; हे दोन व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल ही डान्स नाही तरुणांना करतेय उत्तेजित..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.