Gautami Patil: म्हणून होतेय गौतमी पाटीलवर बंदी घालण्याची मागणी; हे दोन व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल ही डान्स नाही तरुणांना करतेय उत्तेजित..

0

Gautami Patil: आपली किळसवाणी अदा आणि अश्लीलतेच दर्शन घडवत गेल्या काही महिन्यांत कमालीची चर्चेत आलेली गौतमी पाटील आता अडचणीत आली आहे. लावणी आणि डान्सच्या नावाखाली गौतमी पाटील आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून तरुणांना उत्तेजित करत असल्याचं अनेकांनी म्हटलं असून, गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमावर बंदी घालण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. महाराष्ट्र राज्य राष्ट्र विकास सेनेसह अनेकांनी गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. मात्र गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमावर नक्की घालण्याचं नेमकं कारण काय? जाणून घेऊया सविस्तर.

आपल्या अदा आणि अश्लील हातवारे केल्यानेच गौतमी पाटील (Gautami Patil lavani) अल्पावधीतच लोकप्रिय झाली. आपल्या कार्यक्रमामधून तिने अनेक तरुणांना भुरळ घातली. मात्र लावणी (lavni) कलाकार आपल्या अदांनी प्रेक्षकांना ज्याप्रमाणे घायाळ करतात, हे गौतमी पाटीलच्या बाबतीत पाहायला मिळत नाही. गौतमी पाटील अश्लीलतेच दर्शन घडवत, विचित्र हातवारे करून लोकांना भुरळ घालतात. एक प्रकारे उत्तेजीत करतात, हे तिचे व्हिडिओ पाहून समजते. तिच्या घाणेरड्या कृतीमुळे हजारो तरुण तिचा कार्यक्रम बघण्यासाठी जात असल्याचे देखील दिसत.

फक्त कार्यक्रमावरच बंदी नाही तर गौतमी पाटील हिच्यावर मनुष्यवादाचा गुन्हा देखील दाखल करण्यात यावा, अशी देखील मागणी होत आहे. महाराष्ट्र राज्य राष्ट्र विकास सेनेचे युवक प्रदेश अध्यक्ष प्रशांत लक्ष्मण सदामते यांनी देखील सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे बंदी घालण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे. मिरज तालुक्यामध्ये बेडग या ठिकाणी गौतमी पाटीलच्या कार्यक्रमांमध्ये दत्तात्रेय ओमासे (dattatray omase) या तरुणाचा मृत्यू झाला होता. या मृत्यूला गौतमी पाटील हीच जबाबदार असल्याने तिच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील करण्यात आली.

आपण अश्लील हातवारे केल्याचं गौतमी पाटीलने देखील मान्य केले होतं. तीन महिन्यापूर्वी तिने राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली पाटील ठोंबरे यांची भेट घेऊन, या संदर्भात माफी देखील मागितली होती. यापुढे मी फक्त महाराष्ट्राची संस्कृती जोपासणाऱ्या लावणीचाच कार्यक्रम घेईल, मी कुठेही अश्लीलतेचं दर्शन घडवणार नसल्याचं तिने म्हंटल होतं. मात्र तिच्या अनेक कार्यक्रमात अश्लीलता वेळोवेळी दिसून आली आहे.

लावणी (lavani) या लोककलेला काळींमा फासणारे कृत्य गौतमी पाटील वारंवार करत आहे. तिचे अश्लील हावभाव, हातवारे हेच संपूर्ण कार्यक्रमात पाहायला मिळते. साहजिकच यामुळे तिचे हे व्हिडिओ सोशल मीडियाच्या माध्यमातून घराघरात पोहोचतात. हे व्हिडिओ माता-भगिनी, लहान मुलं, वयोवृद्ध मंडळी देखील पाहतात. यामुळे त्यांच्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. आणि म्हणून प्रशांत सदामते यांनी गौतमी पाटील यांच्या कार्यक्रमाला कायमस्वरूपी बंदी घालावी अशी मागणी केली आहे.

यापूर्वी देखील तिच्यावर अनेक लावणी कलावंत त्याचबरोबर कला प्रेमींनी बंदी घालण्याची मागणी केली होती. गौतमी पाटील लोककलेला छेद देत असल्याचं, या लोकांनी म्हटलं होतं. तिच्या कार्यक्रमांमध्ये ती कुठेही आपला डान्स करत नाही. ती केवळ आणि केवळ अश्लीलतेचं दर्शन घडवते. एक प्रकारे तरुणांना ती उत्तेजित करण्याचे काम करत असल्याचे देखील बोललं गेलं. गौतमी पाटील हिचे सोशल मीडियावर काही व्हिडिओ व्हायरल झाले आहेत, त्यामध्ये ती खूपच अश्लीलतेच दर्शन घडवत असल्याचं दिसतं.

हे देखील वाचाIPL Auction 2023: वीरेंद्र सेहवागचा भाचा मालामाल, या संघाने मोजले तब्बल इतके कोटी; या विभागात आहे विराट कोहलीचाही बाप..

IPL Auction 2023: IPL च्या इतिहासात हे चार विदेशी खेळाडू ठरले सर्वात महागडे; या भारतीय दिग्गजांचा मात्र झाला कचरा..

Chanakya Niti; ..म्हणून पती-पत्नीने चुकूनही एकमेकांसमोर बदलू नयेत कपडे; वाचा आचार्य चाणक्यांनी सांगितलेले कारण..

FIFA world cup final: अर्जेंटिना जिंकताच तरुणी झाली पूर्णपणे उघडी; पाहा व्हिडिओ..

Relationship Tips: बॉयफ्रेंडची आठवण आल्यावर मुली करतात ह्या घाणेरड्या गोष्टी..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.