IPL Auction 2023: IPL च्या इतिहासात हे चार विदेशी खेळाडू ठरले सर्वात महागडे; या भारतीय दिग्गजांचा मात्र झाला कचरा..

0

IPL Auction 2023: जगभरात सगळ्यात नावाजलेली आणि लोकप्रिय क्रिकेट लिग म्हणून इंडियन प्रीमियर लीगकडे (Indian premier league) पाहिलं जातं. भारतीय तसेच अनेक दिग्गज विदेशी खेळाडूंची देखील आयपीएलमध्ये (IPL) खेळण्याची इच्छा लपून राहिलेली नाही. अनेक देशांचे खेळाडू आयपीएल खेळण्यासाठी देशांतर्गत होणाऱ्या मालिकांमधून देखील माघार घेत असल्याचं अनेक वेळा पाहायला मिळालं आहे. पुढील वर्षी होणाऱ्या सोळाव्या हंगामाकरिता (IPL season 16) कोचीमध्ये (Kochi) पार पडलेल्या आयपीएल 2023 (IPL 2023 Auction) च्या मिनी लिलावामध्ये अनेक विदेशी खेळाडू मलामाल झाले, तर भारतीय खेळाडू कचऱ्यात जमा झाले.

2023 मध्ये होणाऱ्या सोळाव्या हंगामाकरिता पार पडलेल्या मिनी लीलावामध्ये आयपीएलच्या इतिहासामध्ये सर्वात जास्त बोली लागलेली पाहायला मिळाली. हा लिलाव मिनी असणार होता, मात्र अनेक दिग्गज खेळाडू लिलावाच्या यादीत असल्याने हा लिलाव महागडा ठरणार हे आधीच स्पष्ट झालेलं होतं. आयपीएलमध्ये सर्वात महाग ठरलेले चार खेळाडू हे विदेशी असल्याने आयपीएल लिलावाची जोरदार चर्चा रंगली आहे. दुसरीकडे भारतीय दिग्गज खेळाडूंना मात्र लाखांत बोली लागल्याने, हा लिलाव आणखीन चर्चेत आला. या लिलावात सर्वाधिक बोली लागलेले आणि सर्वाधिक कमी बोली लागलेल्या खेळाडूंविषयी जाणून घेऊया सविस्तर.

2023मध्ये होणाऱ्या सोळाव्या हंगामाकरिता कोचीमध्ये पार पडलेल्या आयपीएलच्या मिनी लिलावामध्ये चार परदेशी खेळाडूंसाठी तब्बल 60 कोटीहून अधिक रक्कम मोजण्यात आली. या चार खेळाडूंना आपल्या ताफ्यात घेण्यासाठी अनेक संघमालकांचा लिलावामध्ये घाम झाल्याचे पाहायला मिळालं. या चार खेळाडूंना आपल्या ताफ्यात घेण्यासाठी अनेक संघमालकांमध्ये रस्सीखेच झाल्याचे दिसून आलं. मात्र अखेर पंजाब किंग्स, मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग, लखनऊ सुपर जायंट्स या संघांनी बाजी मारली.

आयपीएलच्या इतिहासामध्ये विराट कोहली आणि केएल राहुल यांना 17-17 कोटी रुपये देण्यात आले होते. ही रक्कम आयपीएलच्या इतिहासामध्ये सर्वात मोठी रक्कम होती. तर आता या किंमतीचा रेकॉर्ड मोडत सॅम करण (Sam Karan) हा आयपीएलच्या इतिहासातला सर्वात महागडा खेळाडू ठरला. इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू सॅम करण (England cricket team all rounder player Sam Karan) या डावखुऱ्या खेळाडूला आपल्या ताब्यात घेण्यासाठी पंजाब किंग्स (Punjab kings) या संघाने तब्बल 18 कोटी 50 लाख इतकी रक्कम मोजली. सॅम करणने आपली बेस प्राईस केवळ दोन कोटी रुपये ठेवली होती.

सॅम करण नंतर या मिनी लिलावामध्ये सर्वाधिक महाग ठरणाऱ्या खेळाडूच्या यादीत कॅमरून ग्रीन (Cameron Green) या ऑस्ट्रेलिया खेळाडूचा समावेश झाला. कॅमरून ग्रीनला नीता अंबानी (Neeta Ambani) यांनी आपल्या मुंबई इंडियन (Mumbai Indians) संघाकरता तब्बल 17 कोटी 50 लाख रुपये देऊन खरेदी केले. कॅमेरून ग्रीन ऑल राऊंड खेळाडू असून, तो 140 प्लस वेगाने गोलंदाजीही करू शकतो. शिवाय तो सलामीपासून फिनिशरची देखील भूमिका बजावू शकतो. आणि म्हणूनच त्याला खरेदी केल्याचं मुंबई इंडियनच्या संघ मालकाने स्पष्ट केले.

सॅम करण, कॅमेरून ग्रीन या दोघांव्यतिरिक्त पुढील वर्षी होणाऱ्या आयपीएल स्पर्धेसाठी पार पडलेल्या 2023च्या मिनी लिलावामध्ये तिसरा सर्वात महागडा खेळाडू ठरला तो इंग्लंडचा दिग्गज ऑल राऊंडर बेन स्टोक्स. (Ben Stokes) बेन स्टोक्सला चेन्नई सुपर किंग संघाने (Chennai super kings) आपल्या ताब्यात घेतले.

अनेक लिलावामध्ये चेन्नई सुपर किंगने कोणत्याही खेळाडूंना इतकी मोठी रक्कम मोजून विकत घेतलं नसल्याचं पाहायला मिळाला आहे. मात्र या वेळेस झालेल्या मिनी लिलावामध्ये चेन्नईने देखील बेन स्टोक्ससाठी बक्कळ पैसा मोजला. बेन स्टोक्सला खरेदी करण्यासाठी चेन्नई सुपर किंग संघाने तब्बल 16 कोटी 25 लाख रुपये मोजले.

पुढील वर्षी होणाऱ्या आयपीएलच्या सोळाव्या हंगामाकरता पार पडलेल्या मिनी लिलावामध्ये सर्वात महागडा चौथा विदेशी खेळाडू ठरला तो वेस्टइंडीज संघाचा डावखुरा फलंदाज निकोलस पुरन. (Nicholas Pooran) प्रचंड प्रतिभावान खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. मात्र अद्याप आयपीएलमध्ये त्याला आपली फारशी चमक दाखवत आली नाही. तरी देखील या मिनी लिलावामध्ये त्याला लखनऊ सुपर जायंट्स संघाने तब्बल 16 कोटी रुपये देऊन खरेदी केले.

एकीकडे या मिनी लिलावामध्ये विदेशी खेळाडू मलामाल झाले असले तरी, दुसरीकडे मात्र भारतीय संघाचे अनेक दिग्गज खेळाडू मात्र लोखंडाच्या भावात विकले गेले आहेत. यामध्ये अजिंक्य रहाणे, ईशांत शर्मा,मोहम्मद अझरुद्दीन, अनमोलप्रीत सिंग, मंदीप सिंग, जयदेव उनाडकट, मयांक मार्कंडेय हे खेळाडू लाखात विकले गेले आहेत.

हे देखील वाचा Aditya Thackeray: रिया चक्रवर्तीने आदित्य ठाकरेंना 44 फोन केले? वस्तुस्थिति जाणून तुम्हीही या लोकांना घालाल शिव्या..

FIFA world cup final: अर्जेंटिना जिंकताच तरुणी झाली पूर्णपणे उघडी; पाहा व्हिडिओ..

Chanakya Niti; ..म्हणून पती-पत्नीने चुकूनही एकमेकांसमोर बदलू नयेत कपडे; वाचा आचार्य चाणक्यांनी सांगितलेले कारण..

Relationship Tips: बॉयफ्रेंडची आठवण आल्यावर मुली करतात ह्या घाणेरड्या गोष्टी..

KL Rahul Athiya Shetty Wedding: अथिया शेट्टी नव्हे, या तरूणी सोबत होणार राहुलच लग्न; जाणून घ्या तारीख आणि ठिकाण..

Rohit Sharma and Rahul Dravid: कर्णधार पदानंतर रोहित शर्माची T-20 संघातूनही हकालपट्टी; राहुल द्रविडही T-20 मधून आऊट..

Physical Relationship Tips: ..म्हणून सकाळी उठल्यावर पुरुषाच्या त्या अवयवाला येते ताठरता? जाणून बसेल धक्का..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.