IPL Auction 2023: वीरेंद्र सेहवागचा भाचा मालामाल, या संघाने मोजले तब्बल इतके कोटी; या विभागात आहे विराट कोहलीचाही बाप..

0

आयपीएल 2023 चा मिनी लिलाव (IPL mini auction) काल कोचीमध्ये (kochi) पार पडला. एकूण 80 खेळाडूंची खरेदी तब्बल 167 कोटींमध्ये करण्यात आली. पुढील वर्षी होणाऱ्या आयपीएल सिझन 16 मध्ये अनेक दिग्गज खेळाडू वेगवेगळ्या संघाकडून खेळताना पाहायला मिळणार आहेत. सोबतच या हंगामात अनेक खेळाडू आयपीएलमध्ये पहिल्यांदाच पाहायला मिळणार आहेत. यामध्ये वीरेंद्र सेहवागचा भाच्याचा (virender Sehwag Nephew) देखील सहभाग आहे.

वीरेंद्र सेहवागचा भाचा मयंक डागर virender (Sehwag Nephew Mayank dagar) याने आयपीएल 2023 च्या मिनी लिलावामध्ये आपलं नाव नोंदवले होतं. यामध्ये वीस लाख बेस प्राइज निश्चित केली होती. मयंक डागर हा ऑलराऊंडर क्रिकेटर असून, घरेलू क्रिकेटमध्ये त्याने दमदार प्रदर्शन केलं आहे.

या प्रदर्शनाच्या जोरावरच त्याला सनरायझर्स हैदराबाद संघाने खरेदी केलं. आयपीएल 2023 च्या मिनी लिलावामध्ये अनेक संघांनी अष्टपैलू खेळाडूंना विशेष प्राधान्य दिल्याचे पाहायला मिळालं. यामध्ये ऑलराऊंडर खेळाडू सॅम करणला ( sam Karan) आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक बोली लागली. (Sam Karan is the most expensive player in IPL history)

मयंक डागर (Mayank dagar) याचे वडील देखील स्पर्धात्मक क्रिकेट खेळले आहेत. विशेष म्हणजे, मयंक डागर या खेळाडूला खरेदी करण्यासाठी राजस्थान रॉयल्स (rajsthan royals) आणि सनरायझर्स हैदराबाद (sunrisers Hyderabad) या दोन्हीं संघांमध्ये चढाओढ लागल्याचं दिसून आलं. मात्र अखेर सनरायझर्स हैदराबाद या संघाने बाजी मारत मयंक डागर याला तब्बल दीड कोटीहून अधिक रक्कम देऊन खरेदी केलं. 20 लाख बेस बेस्ट प्राईस असणाऱ्या मयंकला सनरायझर्सने तब्बल एक कोटी ऐंशी लाख रुपयांमध्ये खरेदी केलं.

कोण आहे मयंक डागर

मयंक डागर हा भारतीय क्रिकेट संघाचा माजी विस्फोटक सलामीवीर वीरेंद्र सेहवागचा भाचा आहे. मयंक डागर हा यापूर्वी देखील आयपीएलचा भाग राहिला आहे, मात्र तो एकही सामना खेळला नाही. यापूर्वी तो पंजाब किंग संघाचा सदस्य होता. पंजाब कडून त्याला अंतिम 11 मध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही.

विशेष म्हणजे, सेहवाग कोच असताना देखील त्याला पंजाब संघाकडून आयपीएलमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली नाही. मयंक डागर याने प्रथमक्षेणी क्रिकेटमध्ये आतापर्यंत 29 कसोटी सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 87 विकेट घेतल्या आहेत. रणजी क्रिकेट स्पर्धेत नुकत्याच त्याने सातव्या क्रमांकावर येऊन 92 धावांची शानदार खेळी केली होती.

भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीच्या फिटनेसचे अनेक दिवाने आहेत. जगातील सर्वोत्तम खेळाडूंमध्ये विराट कोहली फिटनेसमध्ये पहिल्या एक दोनात स्थान फटकावू शकतो. मात्र मयंक डागर याचा फिटनेस विराट कोहली पेक्षा देखील उत्तम आहे. 2018 मध्ये झालेल्या आयपीएल दरम्यान यो-यो टेस्टमध्ये कोहलीला देखील त्याने मागे टाकले होते. मयंक डागरचा स्कोअर 19 आला होता, तर कोहलीचा स्कोअर 19.3 आला होता

हे देखील वाचाIPL Auction 2023: IPL च्या इतिहासात हे चार विदेशी खेळाडू ठरले सर्वात महागडे; या भारतीय दिग्गजांचा मात्र झाला कचरा..

healthy lifestyle Tips: हिवाळ्यात हे चार पदार्थ खाण्याचे दुष्परिणाम जाणून सरकेल पायाखालची जमीन..

Chanakya Niti; ..म्हणून पती-पत्नीने चुकूनही एकमेकांसमोर बदलू नयेत कपडे; वाचा आचार्य चाणक्यांनी सांगितलेले कारण..

Relationship Tips: बॉयफ्रेंडची आठवण आल्यावर मुली करतात ह्या घाणेरड्या गोष्टी..

FIFA world cup final: अर्जेंटिना जिंकताच तरुणी झाली पूर्णपणे उघडी; पाहा व्हिडिओ..

healthy lifestyle Tips: हिवाळ्यात हे चार पदार्थ खाण्याचे दुष्परिणाम जाणून सरकेल पायाखालची जमीन..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.