healthy lifestyle Tips: हिवाळ्यात हे चार पदार्थ खाण्याचे दुष्परिणाम जाणून सरकेल पायाखालची जमीन..

0

healthy lifestyle Tips: छातीशी आणि हृदयाशी संबंधित कुठलीही समस्या असल्यास, डॉक्टर आपल्याला अनेक चाचण्या करायला लावतात. चाचण्या केल्यानंतर अनेकांना कॉलेस्ट्रॉल वाढल्याची समस्या उद्भवल्याचं जाणवतं. कॉलेस्ट्रॉल ठराविक प्रमाणापेक्षा जास्त वाढले, तर ते आरोग्यासाठी प्रचंड हानीकारक ठरते.अनेकांना कॉलेस्ट्रॉलमुळे हार्ट-अटॅक आणि स्ट्रोकसारखा धोका निर्माण होतो. त्यामुळे शरीरातील या कॉलेस्ट्रॉलवर आपले लक्ष असणे फार गरजेचे आहे. (Winter season health care)

कॉलेस्ट्रॉल हा आपल्या रक्तातीलच एक घटक आहे. याचे दोन प्रकार असतात. एक चांगले कॉलेस्ट्रॉल आणि एक खराब कॉलेस्ट्रॉल. चांगले कॉलेस्ट्रॉल शरीरातल्या अनेक क्रिया सुरळीत ठेवण्यासाठी मदत करते. मात्र त्याचवेळी खराब कॉलेस्ट्रॉल शरीरावर मोठ्याप्रमणावर अपाय करते. आपण जे अन्नपदार्थ खातो, त्यातून कॉलेस्ट्रॉलची निर्मिती होते.

साहजिकच त्यामुळे आपण काय खावे? व काय खाऊ नये, यावर आपले लक्ष असणं फार गरजेचे आहे. हिवाळ्यामध्ये खराब कॉलेस्ट्रॉलचे प्रमाण दुपटीने वाढते. त्यामुळे थंडीच्या दिवसांत कॉलेस्ट्रॉलच्या समस्येपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी आहारात काही पदार्थांना टाटा बाय बाय करणे आवश्यक आहे. थंडीच्या दिवसांत नेमके कुठले पदार्थ तुमच्या शरीराला अपायकारक आहेत? जाणून घेऊया सविस्तर.

कॉलेस्ट्रॉलची लक्षणे

कॉलेस्ट्रॉलबाबत माहिती घेत असताना, आपल्याला कॉलेस्ट्रॉलची नेमकी लक्षणे काय? हे माहिती असणे गरजेचे आहे. कारण ती लक्षणे आढळताच, आपण डॉक्टरांशी संपर्क साधून वेळीच सतर्क होऊ शकतो. कॉलेस्ट्रॉलची ठराविक अशी कुठलीही लक्षणे नाहीत. कॉलेस्ट्रॉल वाढल्यामुळे, शरीरातील रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होतो. परिणामी रक्तप्रवाहावर त्याचा परिणाम होतो. ज्यामुळे चक्कर येणे, छातीत दुखणे यांसारखी प्राथमिक लक्षणे तुम्हाला आढळू शकतात.

हे पदार्थ टाळा 

योग्य आहार आपले शरीर निरोगी ठेवण्यात मदत करते. त्यामुळे आहारावर कायम आपले लक्ष असले पाहिजे. तसेच ऋतू आणि हवामान‍ानुसार आहार‍ांमध्ये काही महत्वाचे बदल करणे जरुरी असतात. हिवाळ्यामध्ये कॉलेस्ट्रॉल दुपटीने वाढते. अशावेळी काही पदार्थांचे सेवन करणे आपण थांबवले पाहिजे. अन्यथा कॉलेस्ट्रॉल संबंधित गंभीर आजारांचा सामना करण्याची वेळ आपल्यावर येऊ शकते. नेमके कुठले पदार्थ आपण हिवाळ्यात टाळले पाहिजे? वाचा सविस्तर

हिवाळ्यामध्ये सर्वत्र गारवा असल्यामुळे अनेकजण शरीर गरम ठेवण्यास मांसाहाराल‍ा प्राधान्य देतात. हिवाळ्याच्या दिवसांमध्ये मांसाहार करण्याचे प्रमाण वाढलेले आपल्याला बघायला मिळते. मात्र या दरम्यान प्रमाणापेक्षा अधिक मांसाहार करणे तुमच्या अंगलट येऊ शकते. थंडीच्या दिवसांत रेड मीट तुम्ही पूर्णपणे टाळले पाहिजे. रेड मीटमध्ये कॉलेस्ट्रॉल आणि सॅच्युरेटेड फॅटचे प्रमाण अधिक असते. याला पर्याय म्हणून तुम्ही ओमेगा-३ फॅटी ऍसीड असलेले चिकन आणि मच्छी खाऊ शकता.

हिव‍ळ्यात वातावरण थंड असल्य‍ामुळे गरमा-गरमा तळलेले पदार्थ आपल्याला कायमच आकर्षित करत असतात. यामध्ये समोसा-कचोरी, गरम भजी यांचे प्रम‍ाण सर्वाधिक असते. याशिवाय आपण जेवणात सुद्धा काही गरम तळलेल्या पदार्थांचा समावेश यादरम्यान करत असतो. मात्र थंडीमध्ये तळलेले पदार्थ तुमच्या शरीरातील कॉलेस्ट्रॉल वाढवण्याच्या प्रक्रियेला प्रचंड गती देते. ज्याचा थेट परिणाम तुमच्या हृदयावर व एकंदरीत शरीरावर दिसून येऊ शकतो. त्यामुळे थंडीमध्ये जर तुम्ही समोसा-कचोरी यांसारख्या पदार्थ‍ांवर ताव मारत मजा घेत असाल, तर हे लागलीच थांबवा. कारण या पदार्थांमधील तेल आणि मीठ कॉलेस्ट्रॉल वाढवण्यास सह‍ाय्य करते.

हिव‍ाळ्यामध्ये आपण बघतो, की फास्ट फुडचे सुद्धा एक वेगळे आकर्षण असते. शहरांमध्ये थंडीच्या दिवसांत तर फास्ट फुडच्या गाड्यांवर तरुण‍ांची प्रचंड गर्दी बघायला मिळते. मात्र हे फास्ट फुड तरुणांसाठी प्रचंड धोकादायक ठरु शकतात. फास्ट फुडच्या अतिसेवनामुळे शरीरातील कॉलेस्ट्रॉल तर वाढतेच, याशिवाय रक्तातील साखर आणि लठ्ठपणा सुद्धा वाढतो. चीज, बर्गर, पिझ्झा या पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात फॅटचे प्रमाण असते. जे शरीरावर परिणाम करते. त्यामुळे थंडीमध्ये फास्ट फुडचे सेवन करतांना दक्षता बाळगणे. गरजेचे आहे.

हिवाळ्यामध्ये गोड खाण्याचे प्रमाण सुद्धा खुप वाढते. हिवाळ्यात चहा आणि कॉफी जास्त घेतले जातात. यामधून साखर आपल्या शरीरात जात असते. याशिवाय लोक आईस्क्रीम, पेस्ट्री, मीठाई सारख्या पदार्थांना सुद्धा प्राधान्य देतात. मात्र गोड पदार्थांच्या अतिसेवनामुळे तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. साखरेमुळे तुमचे कॉलेस्ट्रॉलचे प्रम‍ाण वाढू लागते. याशिवाय गोड पदार्थांमध्ये सॅच्युरेटेड मीटचे प्रमाण सुद्धा पुष्कळ असते, जे की शरीरातील कॉलेस्ट्रॉल वाढवण्यात महत्वाची भूमिका बजावते.

हे देखील वाचाChanakya Niti; ..म्हणून पती-पत्नीने चुकूनही एकमेकांसमोर बदलू नयेत कपडे; वाचा आचार्य चाणक्यांनी सांगितलेले कारण..

Rohit Sharma and Rahul Dravid: कर्णधार पदानंतर रोहित शर्माची T-20 संघातूनही हकालपट्टी; राहुल द्रविडही T-20 मधून आऊट..

Bride dance with boyfriend: आपल्या लग्नात बॉयफ्रेंडला नाचताना पाहून नवरीचा सुटला ताबा; कडकडून मिठी, हंबरडा अन्..

Health Tips: सालीसकट बदाम खाण्याचे दुष्परिणाम जाणून सरकेल पायाखालची जमीन; दिवसातून इतके बदाम खाणे योग्य..

FIFA world cup final: अर्जेंटिना जिंकताच तरुणी झाली पूर्णपणे उघडी; पाहा व्हिडिओ..

Relationship Tips: बॉयफ्रेंडची आठवण आल्यावर मुली करतात ह्या घाणेरड्या गोष्टी..

Physical Relationship Tips: ..म्हणून सकाळी उठल्यावर पुरुषाच्या त्या अवयवाला येते ताठरता? जाणून बसेल धक्का..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.