Bride dance with boyfriend: आपल्या लग्नात बॉयफ्रेंडला नाचताना पाहून नवरीचा सुटला ताबा; कडकडून मिठी, हंबरडा अन्..

0

Bride dance with boyfriend: सद्या लग्नाचा (marriage season) सिझन सुरू आहे. सोशल मीडियाच्या (social media) जमान्यात लग्नात होणाऱ्या बारीक सारीक घटना देखील आता कॅमेऱ्यात कैद होताना पाहायला मिळत आहेत. लग्नापूर्वी गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड असणं ही आता सामान्य बाब झाली आहे. अनेकांना आपलं देखील लग्न आपल्याला आवडणाऱ्या व्यक्तिबरबरच व्हावं, असं वाटत असतं. मात्र प्रत्यक्षात असं होत नाही. अनेकांना तडजोड करून, घरच्यांच्या म्हणण्यानुसारच लग्न करावं लागतं. जवळपास सर्व सामान्य कुटुंबात हीच परिस्थिती पाहायला मिळते.

बॉयफ्रेंड किंवा गर्लफ्रेंड (boyfriend girlfriend) भर मंडपामध्ये आरडाओरडा करत दाखल झाल्याच्या बातम्या तुम्ही यापूर्वी देखील वाचल्या असतील. मात्र यापेक्षाही भयंकर घटना एका लग्नामध्ये घडली असून, या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. बॉयफ्रेंड किंवा गर्लफ्रेंडच्या लग्नात जाऊन डान्स करणे कदाचित ही गोष्ट तुम्हाला नॉर्मल वाटू शकते. आजकाल हे अनेक ठिकाणी घडले देखील आहे. मात्र गर्लफ्रेंडच्या लग्नात नाचत-नाचत थेट असं काही घडलं, जे पाहून तुमच्याही डोळ्यांना विश्वास बसणार नाही.

नवरा-नवरी आणि नवरीचा बॉयफ्रेंड मंडपामध्ये उपस्थित असताना अचानक “गोविंदा आणि राणी मुखर्जी यांचं तुझको ना दुल्हन बनाऊंगी” हे गाणं सुरू होतं. हे गाणं सुरू झाल्यानंतर, नवरीचा बॉयफ्रेंड डान्स करायला सुरुवात करतो. नवरीच्या बॉयफ्रेंडने डान्स करायला सुरुवात केल्यानंतर, नवरी देखील त्याला तितक्यात उत्साहाने प्रतिसाद देत असल्याचं सोशल मीडियावर वायरल झालेल्या व्हिडिओत पाहायला मिळत आहे.

गोविंदा आणि राणी मुखर्जी यांचं ”तुझको ना दुल्हन बनाऊंगी” या गाण्यावर नवरी आणि तिचा बॉयफ्रेंड डान्स करत असताना अचानक नवरीचा स्वतःवरचा ताबा सुटतो. आणि नवरी थेट आपल्या बॉयफ्रेंडला मिठी मारत मोठ-मोठ्याने हंबरडा फोडते. आपल्या बॉयफ्रेंडला मिठी मारत नवरी जोरजोरात हंबरडा फोडत असताना, तो देखील तिला कडकडून मिठी मारत रडू लागतो. हा सर्व प्रकार घडत असताना नवरा देखील जवळच उभा असतो.

अचानक हा प्रकार घडल्यानंतर, नवऱ्या मुलाला नक्की काय करावे? हे समजत नसल्याचं या व्हिडिओत स्पष्ट पाहायला मिळत आहे. आसपास उपस्थित असणारी अनेक लोकं मोठमोठ्याने हसताना देखील सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत पाहायला मिळत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ पाहताना अनेकांना हसू आवरत नसल्याचं स्पष्ट होत आहे.

महिला सोडवायला गेली पण..

नवरी आणि तिचा बॉयफ्रेंड दोघांनी एकमेकांना मिठी मारून जोरजोरात हंबरडा फोडल्यानंतर, एक महिला या ठिकाणी दाखल होते. या दोघांना सोडवण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र हे दोघेही ऐकायला तयार नाहीत. या दोघांनी इतकी कडकडून मिठी मारली आहे, की ही महिला आपली सर्व ताकद पणाला लावून देखील या दोघांना वेगळं करू शकली नसल्याचं, या व्हिडिओ स्पष्ट दिसत आहे.

सोशल मीडियावर जोरदार चर्चा

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ, जॅकी यादव नावाच्या एका युजरने ट्विट करून शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करताना त्याने या व्हिडिओला कॅप्शन देताना म्हंटल आहे, मित्रांनो मला फक्त तुम्हाला एवढेच विचारायचं आहे, मंडपात उपस्थित असणारा नवरा सध्या जिवंत आहे, की कुठे निघून गेला आहे? त्याने शेअर केलेल्या व्हिडिओ खाली कमेंट करताना अनेक नेटकऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त केली आहेत. अनेकांनी या व्हिडिओ खाली कमेंट करताना मजा घेत, प्रेम हे जगातल्या सगळ्या शक्तीपेक्षा महान असल्याचं म्हटलं आहे.

हे देखील वाचाFIFA world cup final: अर्जेंटिना जिंकताच तरुणी झाली पूर्णपणे उघडी; पाहा व्हिडिओ..

Chanakya Niti: हे चार गुण तुमच्याकडे असतील तर समाज करतो मुजरा..

Relationship Tips: बॉयफ्रेंडची आठवण आल्यावर मुली करतात ह्या घाणेरड्या गोष्टी..

Second Hand Bike: 2019 मधील hero spender Plus मिळतेय २० हजारांत; जाणून घ्या सर्व डिटेल्स..

Relationship: जोडीदाराकडून या 5 अपेक्षा कधीच ठेवू नका, अन्यथा नक्कीच होईल घटस्फोट..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.