Chanakya Niti: हे ‘चार’ गुण तुमच्याकडे असतील तर समाज करतो मुजरा..

0

Chanakya Niti: प्रत्येकाचे आयुष्य (life) जगण्याची एक नियमावली असते. प्रत्येकाचे गुणवैशिष्ट्य हे वेगळे आहे. परंतु समाजात आपल्यालाही विशेष मान, आदर असावा, असं प्रत्येकाला वाटत असतं. असं असलं, तरी प्रत्येक माणसाचं कर्म आणि गुण हे त्याची ओळख असते. आचार्य चाणक्य (aacharya Chanakya) सांगतात, माणसाकडे जर तीन गुण असतील, तर त्यांना समाजात खूप आदर मिळतो. एवढेच नाही, तर अनेक लोक त्यांना मुजरा देखील करण्याचं काम करतात. कोणते आहेत ते विशेष गुण? आज आपण याचविषयी जाणून घेणार आहोत.

आचार्य चाणक्य यांनी तीन हजार वर्षांपूर्वी आपली चाणक्य नीती (Chanakya niti) लिहून ठेवली आहे. आचार्य चाणक्य यांनी नातेसंबंध, नितीशास्त्र, राजकारण, अशा असंख्य विषयांवर भाष्य केले आहे. अनेकजण आजही आचार्य चाणक्य यांची नीती अमलात आणून, आपलं आयुष्य जगतात. नीतीशास्त्र या ग्रंथाच्या माध्यमातून त्यांनी समाजाला उत्कृष्ट आयुष्य जगण्याचा खूप मोठा नियम शिकवला. समाजाच्या दृष्टीने उत्कृष्ट पुरुष म्हणून, नावलौकिक मिळवायचा असेल, तर आचार्य चाणक्य यांनी पुरुषांच्या तीन गुणांचे वर्णन आपल्या ग्रंथात केले आहे.

आचार्य चाणक्य सांगतात, जर समाजवर आदर्श आणि उत्कृष्ट व्यक्ती म्हणून तुमचा प्रभाव पाडायचा असेल, तर प्रत्येक नात्याविषयी तुम्ही गंभीर असणं महत्त्वाचं आहे. ज्या पुरुषांमध्ये हा गुण असेल, त्याला समाजामध्ये विशिष्ट सन्मान मिळतो. लोक त्याच्याकडे आदराने पाहतात. तुम्ही कोणत्याही नात्याचा सन्मान करत असाल, तर असे पुरुष अनेकांना आवडतात. जी लोकं कोणत्याही नात्यात भेदभाव करत नाहीत, सर्वांना आदराची वागणूक देतात, अशा पुरुषांचं बोलणं समाजात खूप काळजीपूर्वक ऐकलं जातं. अशा लोकांचे विचार देखील समाज आपल्या दैनंदिन जीवनामध्ये अंमलात आणतो. असं आचार्य चाणक्य सांगतात.

आचार्य चाणक्य सांगतात, ज्या पुरुषांमध्ये मदत करण्याची तत्परता असेल, अशी माणसं सगळ्यांना आवडत असतात. माणसाच्या अडचणीची किंमत केली तर,माणसन तुम्हाला कायम लक्षात ठेवतात. आणि म्हणून, लोकांच्या अडचणींची किंमत करता येणाऱ्यांना समाजात खूप महत्त्वाचं स्थान मिळतं. अनेकजण त्यांच्याकडे आदराने पाहतात. असं आचार्य चाणक्य सांगतात. इतरांना मदत करणारी माणसे आपल्या प्रामाणिकपणाविषयी कधीही तडजोड करत नसल्याचं आचार्य चाणक्य सांगतात.

आचार्य चाणक्य यांच्यामते, प्रतिकूल परिस्थितीमध्ये देखील लोक आपला संयम गमावत नाहीत, त्या माणसांना देखील समाजात विशेष दर्जा दिला जातो. संकटे, प्रतिकूल परिस्थितीशी सामना करताना नेहमी पुरुष आपला संयम गमावतात. अर्थात संयम गमावल्यामुळे, अशा अनेक गोष्टी त्यांच्या हातून घडतात. त्याचा परिणाम समाजावर देखील होतो. अशी माणसं लोकांना आवडत नाहीत.

जर तुमच्याकडे संयम असेल, तर तुमच्याकडील हा गुण अनेकजण अंमलात आणतात. माणसाच्या प्रतिष्ठेची खरी कसोटी ही संकट आल्यानंतर लागते. जर तुम्ही प्रतिकूल परिस्थितीमध्ये देखील स्वतःच्या मनावर नियंत्रण ठेवू शकला, तर तुम्ही समाजामध्ये अनेकांचा आदर्श बनता. लोक तुमचे अनुकरण करायला सुरुवात करतात. असं आचार्य चाणक्य सांगतात.

आचार्य चाणक्य सांगतात, मनुष्यामध्ये दयावन हा गुण असेल, तर मनुष्याचे समाजात असंख्य चाहते निर्माण होतात. अशा मनुष्यांना लोकं फॉलो करायला सुरुवात करतात. जीवन जगत असताना समाजामध्ये तुम्हाला अशा अनेक गोष्टींना सामोरे जावं लागू शकतं. जिथे तुम्हाला वाईट प्रवृत्तीची लोक देखील भेटली जातात. अशा वेळी तुम्ही एखाद्या माणसाला त्याची चूक लक्षात आलीच तर, तुम्ही दयावान असणे देखील आवश्यक असल्याचं आचार्य चाणक्य सांगतात.

हे देखील वाचाICC World Cup 2023: ICC चा BCCI ला नारळ; या कारणामुळे भारतात होणाऱ्या वर्ल्डकपचे यजमानपद घेतले काढून..

Virat Kohli: पुजाराने तीन वर्षानंतर शतक झळकावले, तरीही चर्चा विराटच्या सेलिब्रेशनची; काय केले विराटने, पाहा व्हिडिओ..

Celebrity Sex Life: या कलाकारांनी सांगितल्या त्यांच्या आवडत्या सेक्स पोझिशन; आलियाची क्लासिक मिशनरी तर करिनाची आहे..

Chanakya Niti: कुटुंबातल्या एकाला जरी ही सवय लागली, तरी घर बरबाद झालंच म्हणून समजा..

Tik tok Star Santosh Munde: संतोष मुंडेचा मृत्यू नाही घात? धक्कादायक कारण आले समोर..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.