Virat Kohli: पुजाराने तीन वर्षानंतर शतक झळकावले, तरीही चर्चा विराटच्या सेलिब्रेशनची; काय केले विराटने, पाहा व्हिडिओ..

0

Virat Kohli: भारत आणि बांगलादेश IND vs BAN 1st test) यांच्यामध्ये सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यांत भारत मजबुत स्थितीत आहे. पहिल्या डावात शतकाने हुलकावणी दिल्यानंतर, चेतेश्वर पुजाराने (Cheteshwar Pujara) दुसऱ्या डावात वादळी खेळी साकारत आपल्या करिअरचे सर्वात जलद शतक झळकावले. Cheteshwar Pujara hundred after three years) तीन वर्षे आणि 52 डावानंतर चेतेश्वर पुजाराने आपलं शतक झळकावत आपल्या शतकांचा खंड मोडीत काढला. मात्र एकीकडे चेतेश्वर पुजाराने साकारलेल्या खेळीपेक्षा जास्त चर्चा पुजराच्या शतकानंतर विराट कोहलीच्या सेलिब्रेशनची (Virat Kohli celebration) झाली.

बांगलादेश विरुद्ध (IND vs BAN) सुरू असलेला पहिला कसोटी सामन्यात भारताने पहिल्या डावात 404 धावांचा डोंगर उभा केला. पहिल्या डावात देखील चेतेश्वर पुजाराने 90 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. पहिल्या डावात चेतेश्वर पुजारा आणि श्रेयस अय्यर या दोघांनी पाचव्या विकेटसाठी तब्बल 149 धावांची भागीदारी केली. या दोघांनंतर पुन्हा एकदा भारताकडून रविचंद्रन अश्विन आणि कुलदीप यादव या दोघांनी 92 धावां जोडल्या.

भारताच्या फलंदाजांनी चांगली कामगिरी केल्यानंतर, गोलंदाजांनी देखील आपली भूमिका यशस्वीरित्या पार पाडली. भारतीय गोलंदाजांनी बांगलादेश संघाचा पहिला डाव केवळ 150 धावात गारद केला. कुलदीप यादव आणि मोहम्मद सिराज (kuldeep Yadav Mohammed Siraj) या भारतीय गोलंदाजांनी (Indian bowler) बांगलादेश संघाच्या फलंदाजाचे कंबररड मोडून काढलं. चायनामेन कुलदीप यादव ने 16 षटकार ४० धावा देत बांगलादेश संघाचे तब्बल चार फलंदाज तंबूत पाठवले. तर दुसरीकडे मोहम्मद सिराजने केवळ वीस धावांत बांगलादेश संघाचे महत्त्वाचे तीन फलंदाज बाद करत भारताला पहिल्या डावात 254 धावांची आघाडी मिळवून दिली.

केएल राहुल पुन्हा एकदा अपयशी ठरल्यानंतर, शुभमन गिल आणि चेतेश्वर पुजारांनी भारताचा दुसरा डाव सावरत दोघांनीही दमदार शतके ठोकली. चेतेश्वर पुजाराचे शतक पूर्ण होताच, भारताने आपला दुसरा डाव दोन बाद 258 धावांवर घोषित केला. बांगलादेश संघाला विजयासाठी 513 धावांचे आव्हान दिल्यानंतर, काल तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा बांगलादेश संघाने बिन बाद 42 धावा केल्या होत्या. अजूनही बांगलादेश संघाला विजयासाठी 471धावांची आवश्यकता आहे.

एकीकडे भारतीय टेस्ट क्रिकेट संघाचा उपकर्णधार चेतेश्वर पुजाराने तीन वर्षे आणि 52 डावानंतर झळकावलेल्या शतकाची जितकी चर्चा झाली नाही, त्याच्याहून अधिक चर्चा पुजाराने शतक केल्यानंतर, विराट कोहलीने केलेल्या सेलिब्रेशनची झाली. पुजाराचे शतक पूर्ण होताच विराट कोहलीने दोन्हीं हात उंचावत आपला आनंद व्यक्त केला. विराट कोहली हा नेहमीच आपल्या सहकाऱ्यांनी केलेल्या उत्कृष्ट खेळाला दात देत त्याच्या आनंदात सामील होताना आपण नेहमी पाहत आलो आहोत.

आज पुन्हा एकदा विराट कोहलीने आपला सहकारी चेतेश्वर पुजाराने शतक झळकावताच जोरदार सेलिब्रेशन केलं. ईशान किशनने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात द्विशतक झळकावल्यानंतर, मैदानात विराट कोहलीने भांगडा केला होता. त्याची देखील जोरदार चर्चा झाली होती. आज पुन्हा एकदा विराटने पुजाराच्या शतकांनंतर केलेला जल्लोष चर्चेचा विषय बनला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये विराट कोहलीवर स्वतः साठी खेळत असल्याचा आरोप झाला होता. मात्र विराटने आपण एक उत्कृष्ट टीममेंट असल्याचं वेळोवेळी दाखवून दिले आहे.

हे देखील वाचाCelebrity Sex Life: या कलाकारांनी सांगितल्या त्यांच्या आवडत्या सेक्स पोझिशन; आलियाची क्लासिक मिशनरी तर करिनाची आहे..

Tik tok Star Santosh Munde: संतोष मुंडेचा मृत्यू नाही घात? धक्कादायक कारण आले समोर..

Sania Mirza Shoaib Malik: सानिया-शोएब घटस्फोटात खळबळजनक ट्विस्ट; पाहा काय म्हणाला शोएब मलिक..

Anushka Sharma pregnant: विराट कोहली दुसऱ्यांदा होणार पिता; इतक्या महिन्याची गरोदर आहे अनुष्का..

Ishan Kishan girlfriend: कोण आहे ईशान किशनची गर्लफ्रेंड आदिती हुंडिया? फिल्मी स्टाईल ओळख अन् लव्ह स्टोरीला सुरुवात..

Sanju Samson: आयर्लंड क्रिकेट बोर्डाकडून ऑफर आल्यानंतर अखेर संजूनेही घेतलाच निर्णय; म्हणाला मला..

Extra Marital Affairs: या सहा कारणांमुळे महिला ठेवतात विवाहबाह्य संबंध; चौथं कारण आहे खूपच भयंकर..

Chanakya Niti: कुटुंबातल्या एकाला जरी ही सवय लागली, तरी घर बरबाद झालंच म्हणून समजा..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.