Tik tok Star Santosh Munde: संतोष मुंडेचा मृत्यू नाही घात? धक्कादायक कारण आले समोर..

0

Tik tok Star Santosh Munde: टिक टॉक इंस्टाग्राम या सोशल मीडियामुळे अनेकांना आपली कला सादर करण्याची संधी मिळाली. गाव खेड्यातली साधी साधी माणसं देखील या ॲपच्या माध्यमातून महाराष्ट्रातील घराघरात पोहचली. आपल्या घराजवळील लोकांना देखील कधी न आवडणाऱ्या या माणसांचे असंख्य चाहते बनले. अशाच एका तरुणाने सोशल मीडियावर आपली ओळख निर्माण केली. संतोष मुंडे असं या तरुणाचं नाव. मात्र आता हा तरुण यापुढे आपल्याला सोशल मीडियावर दिसणार नाही.

टिक टॉक स्टारच्या माध्यमातून आपली ओळख निर्माण करणाऱ्या संतोष मुंडेचा दोन दिवसांपूर्वी विजेचा शॉक लावून, दुर्दैवी मृत्यू झाला. संतोष मुंडे हा बीड Beed) जिल्ह्यातील धारूर (dharur) तालुक्यातील भोगलवाडी (bhogalwadi) या गावाचा रहिवाशी होता. संतोष मुंडे बरोबर त्याचा मित्र बाबुराव मुंडे (baburao munde) याचा देखील मृत्यू झाला. आता या दुर्दैवी घटनेने नवीन वळण घेतला असून, या दोघांचा मृत्यू नसून, घातपात झाला असल्याची गावकऱ्यांमध्ये चर्चा सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे.

संतोष आणि बाबुराव हे दोन तरुण विद्युत डीपी मधील फ्युज बदलण्यासाठी गेले असताना, अचानक विद्युत पुरवठा सुरू झाला. डीपी मधील फ्युज बदलत असतानाच विद्युत पुरवठा सुरू झाल्यामुळे दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची बातमी समोर आली होती. मात्र लाईट गेल्यानंतर, फ्युज बदलण्यासाठी कोणीही हाताचा वापर करत नाही‌. लाईट असो किंवा नसो, फ्युज बदलताना व्यवस्थित येत्या काळजी घेतली जाते. एकाच वेळी दोघेही फ्युज कसे बदलतील? हा एक प्रश्न उपस्थित केला जात आहे.

संतोष आणि बाबुराव मुंडे या दोन तरुणांचा फ्यूज बदलताना झालेला मृत्यू यात शंका घ्यायला वाव असून, हा घातपात असल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. 13 डिसेंबरला संध्याकाळी या दोघांचा विजेचा शॉक लावून मृत्यू झाला. या दोघांचा मृत्यू झाला त्यावेळी नक्कीच विजेचा सप्लाय बंद होता का? याची देखील माहिती घेतली जाणार असून, या दोन्हीं घटनेची चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती आहे. पोलिस या घटनेचा अधिक तपास करत आहे.

कोण होता संतोष मुंडे?

संतोष मुंडे हा तरुण बीड मधील धारूर तालुक्यातील भोगलवाडी गावातला आहे. टिक टॉकच्या माध्यमातून त्याला नवीन ओळख मिळाली होती. संतोषचे सोशल मीडियावर लाखांत फॉलोवर्स आहेत. ग्रामीण भाषेला त्याने आपली ताकद बनवत, सोशल मीडियावर खूप कमी काळात यश मिळवलं होतं. आपलं काम करत सोशल मीडियावर मनोरंजनाचे फनी व्हिडिओ तो पोस्ट करायचा. संतोष मुंडेने आपल्या इंस्टाग्रामवर शेवटचा व्हिडिओ 13 ऑक्टोबरला पोस्ट केला होता. या व्हिडिओत त्याने ‘माना अनजान हो’ या गाण्यावर परफॉर्मन्स केला होता.

हे देखील वाचा Guruji Viral Video: पोरांनी अक्षता तोंडावर मारल्याने भडजींनी लग्नच थांबवलं; पुढे काय झालं पाहा व्हिडिओ..

Sania Mirza Shoaib Malik: सानिया-शोएब घटस्फोटात खळबळजनक ट्विस्ट; पाहा काय म्हणाला शोएब मलिक..

Anushka Sharma pregnant: विराट कोहली दुसऱ्यांदा होणार पिता; इतक्या महिन्याची गरोदर आहे अनुष्का..

Extramarital affair: लग्नानंतर पत्नी इतर पुरुषांकडे आकर्षित होण्याची ही आहेत चार कारणे; चौथं कारण खूपच धोकादायक..

Chanakya Niti: कुटुंबातल्या एकाला जरी ही सवय लागली, तरी घर बरबाद झालंच म्हणून समजा..

Ishan Kishan girlfriend: कोण आहे ईशान किशनची गर्लफ्रेंड आदिती हुंडिया? फिल्मी स्टाईल ओळख अन् लव्ह स्टोरीला सुरुवात..

Indian Railway Jobs: दहावी पास उमेदवारांसाठी रेल्वेमध्ये 2 हजार 521 जागांची मेगा भरती; असा करा ऑनलाईन अर्ज..

Indian Post Bharti 2022: भारतीय डाक विभागात दहावी पास उमेदवारांसाठी विविध पदांची भरती; लगेच करा अर्ज..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.