Guruji Viral Video: पोरांनी अक्षता तोंडावर मारल्याने भडजींनी लग्नच थांबवलं; पुढे काय झालं पाहा व्हिडिओ..

0

Guruji Viral Video: लग्न (marriage) हा फक्त वधू आणि वरासाठीच आनंदाचा दिवस नसतो, तर नवरा नवरी बरोबरच लग्नाला आलेला प्रत्येकासाठी हा महत्त्वाचा आणि आनंदाचा दिवस असतो. चिमुकल्यांपासून वयोवृद्धांपर्यंत प्रत्येकजण लग्नामध्ये दंग झालेला असतो. लग्नामध्ये प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने आनंद साजरा करत असतात. खासकरून नवरी, नवरदेवाचे (husband wife) कुरवले लग्नामध्ये आनंदीत असतात. आणि मस्ती देखील करताना दिसतात. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, मंगलाष्टिका (Mangalashtika) सुरू असताना, स्टेजवरून पोरांनी भडजींच्या तोंडावर अक्षता फेकून मारल्याने गोंधळ उडाला. (Social media Viral video)

सोशल मीडियावर अनेक फनी व्हिडिओ व्हायरल (funny video viral) करण्याचा जणू काही ट्रेंड (Trend) सुरू आहे. सध्या लग्नाचा सिझन सुरू असून, (marriage session) लग्नातले अनेक नवरी नवरीचे डान्स करतानाचे, त्याचबरोबर लग्नामधले इतरही फनी व्हिडिओ सोशल मीडियावर ट्रेडिंगला असल्याचं पाहायला मिळतं. आता असाच एक लग्नातला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, या व्हिडिओत लग्न लावणाऱ्या भडजींनीच चक्क लग्न थांबवण्याची धमकी दिली.

भडजी लग्नाच्या मंगलाष्टिका म्हणत असताना, बाजूने पोरं भडजींच्या तोंडावर अक्षता फेकून मारत होते. हा प्रकार वारंवार होत असल्याने भडजींची देखील सहनशक्ती संपली. शुभमंगल सावधान म्हटल्यानंतर, पोरं भडजींच्या तोंडावर अक्षता फेकून मारण्याचे काही थांबवत नसल्याने, भडजींना राग अनावर झाला, आणि अचानक भडजी माइक मध्येच म्हणाले, लग्न सुरू ठेवायचे की थांबवायचे? भडजींचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून, अनेकांनी या व्हिडिओची मजा घेतली आहे.

https://m.facebook.com/domkawla/videos/667885041485847/

सोशल मीडियावर भटजींचा मंगलाष्टिका म्हणतानाचा, आणि त्याचवेळी अक्षता येऊन गालावर लागतानाचा व्हिडिओ तुफान वायरल झाला आहे. पोरांनी केलेल्या कृत्याला रिप्लाय देताना भटजींनी एकच वाक्य म्हटलं, मात्र हे वाक्य या व्हिडिओची मजा द्विगुणित करणारं ठरलं. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओत स्टेजवर असणारी मंडळी जोरजोरात हसत असल्याचं दिसत आहे. एवढच नाही, तर नवऱ्या मुलाला देखील या घटनेमुळे स्वतःचे हसू आवरता आले नाही.

हे देखील वाचा Azgar Video: अजगराला पकडायला गेला, क्षणात उडी मारून अजगराने पकडलं डोकं, मदतीला लोक धावले पण..; पाहा व्हिडिओ..

यावर क्लिक करा आणि पाहा व्हिडिओ

Sania Mirza Shoaib Malik: सानिया-शोएब घटस्फोटात खळबळजनक ट्विस्ट; पाहा काय म्हणाला शोएब मलिक..

Sanju Samson Ranji Trophy: संजू सॅमसनची पुन्हा वादळी खेळी, केवळ अकरा चेंडूत कुटल्या 58 धावा; पाहा व्हिडिओ..

Anushka Sharma pregnant: विराट कोहली दुसऱ्यांदा होणार पिता; इतक्या महिन्याची गरोदर आहे अनुष्का..

Second Hand Bike: 2019 मधील hero spender Plus मिळतेय २० हजारांत; जाणून घ्या सर्व डिटेल्स..

Mahindra Bolero Neo Plus: बोलेरो अवतरली नव्या अवतारात ९ सीटर, लाजवाब लूकसह बनली सगळ्यांचा बॉस..

Extramarital affair: लग्नानंतर पत्नी इतर पुरुषांकडे आकर्षित होण्याची ही आहेत चार कारणे; चौथं कारण खूपच धोकादायक..

Ishan Kishan girlfriend: कोण आहे ईशान किशनची गर्लफ्रेंड आदिती हुंडिया? फिल्मी स्टाईल ओळख अन् लव्ह स्टोरीला सुरुवात..

Chanakya Niti: कुटुंबातल्या एकाला जरी ही सवय लागली, तरी घर बरबाद झालंच म्हणून समजा..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.