Azgar Video: अजगराला पकडायला गेला, क्षणात उडी मारून अजगराने पकडलं डोकं, मदतीला लोक धावले पण..; पाहा व्हिडिओ..

0

Azgar Video: सोशल मीडियावर (social media) प्राण्यासंदर्भातले (animals) नवनवीन व्हिडिओ (New video) नेहमी व्हायरल (Viral) होत असतात. प्राण्यांच्या लाईफस्टाईल (lifestyle) विषयी जाणून घ्यायला प्रत्येकाला आवडत असतं. एवढेच नाही, तर अनेकांना प्राणी आवडतात देखील. मात्र प्राणी हे प्राणी असतात. कधी त्यांच्या मनात काय येईल, याचा काही नेम नाही. खास करून सिंह (lion) मगर (crocodile) वाघ +tiger) साप (snake) अजगर (python) यासारखे प्राणी नेहमी धोकादायक समजले जातात. कधी-कधी या प्राण्यांसोबत अनेकजण खेळताना तुम्ही पाहिले असेल. असाच एक व्हिडिओ (Video) सध्या सोशल मीडियावर (social media) व्हायरल झाला असून अजगराशी खेळणं तरुणाला चांगलंच महागात पडलं आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओत एक तरुण (young man) अजगराशी मस्ती करताना पाहायला मिळत आहे. घराच्या अंगणामध्ये कुठून तरी अजगराचा प्रवेश एका लाकडाच्या पेटीजवळ झाल्याचे दिसत आहे. हा तरुण पेटीजवळ असणाऱ्या अजगराला डिवचताना दिसत आहे. घराच्या अंगणामध्ये एक महिला आपल्या लहान लेकराला कडेवर घेऊन फिरवत असल्याचे देखील पाहायला मिळत आहे. सोबतच एक कुत्रा देखील चकरा मारताना पाहायला मिळत आहे.

घराच्या अंगणामध्ये अजगर असल्यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. मात्र तरुणाने ज्या बेजबाबदारपणाने अजगराला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे, हे खूप दुर्दैवी आहे. अशा प्रकारच्या बेजबाबदारपणामुळे जीव देखील जाऊ शकतो. हेच या व्हिडिओत पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत, एक तरुण अजगराला डिवचत असताना अचानक भली मोठी उडी घेत अजगराने तरुणाच्या डोक्यावर हल्ला केला.

अजगराने तरुणाच्या डोक्यावर केलेला हल्ला इतका तीव्र आणि आक्रमक होता की, काही कळायच्या आत अजगराने तरुणाला डोकं आपल्या जबड्यात घट्ट पकडलं. तरुणाला शर्तीचे प्रयत्न करून देखील आपलं डोकं अजगराच्या तावडीतून सोडवता येत नसल्याचं व्हिडिओत पाहायला मिळत आहे. या अंगणामध्ये उपस्थित असणारी महिला जोर-जोरात ओरडल्यानंतर, या तरुणाच्या मदतीला अनेकजण आले.‌ अजगराने आपल्या जबड्यात या तरुणाचं पकडलेला डोकं सोडवण्यासाठी तब्बल चारजण शर्यतीचे प्रयत्न करत होते. मात्र तरी देखील अजगर आपली शिकार सोडायला तयार नसल्याचं या व्हिडिओत दिसत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ पाहताना अनेकांच्या काळजाचं पाणी-पाणी होत असल्याचे दिसत आहे. चौघांनी प्रयत्न करून देखील अजगराने तरुणावर केलेला हल्ला हाणून पाडण्यात यश येत नसल्याचं पाहायला मिळत आहे. एका तरुणाने अजगरावर आघात करण्यासाठी लोखंडी वस्तू आणल्याचे देखील सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत पाहायला मिळत आहे. एवढेच नाही, तर तरुणाने लोखंडी वस्तूने अजगरावर आघात देखील केला. मात्र तरी देखील अजगर आपली शिकार सोडायला तयार नसल्याचं दिसत आहे.

हा व्हिडिओ पाहून सोशल मीडियावर अनेक संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. विनाकारण एखाद्या प्राण्याला त्रास दिला, तर तो तुमच्यावर पलटवार करणार हे अटळ आहे. एवढ्या मोठ्या हिंस्र प्राण्यासोबत एवढी बेजबाबदार वर्तणूक करणं योग्य नसल्याचा सुर सोशल मीडियावर उमटला आहे. अजगराच्या तावडीतून या तरुणाला सोडवण्यात या चौघांना यश आलं की नाही? हे मात्र या व्हिडिओत स्पष्ट झालं नाही. परंतू हा व्हिडिओ पाहताना, अनेकांच्या काळजाचं पाणी-पाणी मात्र नक्की होत आहे.

हे देखील वाचा Sania Mirza Shoaib Malik: सानिया-शोएब घटस्फोटात खळबळजनक ट्विस्ट; पाहा काय म्हणाला शोएब मलिक..

Sanju Samson Ranji Trophy: संजू सॅमसनची पुन्हा वादळी खेळी, केवळ अकरा चेंडूत कुटल्या 58 धावा; पाहा व्हिडिओ..

Sanju Samson: आयर्लंड क्रिकेट बोर्डाकडून ऑफर आल्यानंतर अखेर संजूनेही घेतलाच निर्णय; म्हणाला मला..

Anushka Sharma pregnant: विराट कोहली दुसऱ्यांदा होणार पिता; इतक्या महिन्याची गरोदर आहे अनुष्का..

Chanakya Niti: कुटुंबातल्या एकाला जरी ही सवय लागली, तरी घर बरबाद झालंच म्हणून समजा..

Extramarital affair: लग्नानंतर पत्नी इतर पुरुषांकडे आकर्षित होण्याची ही आहेत चार कारणे; चौथं कारण खूपच धोकादायक..

Ishan Kishan girlfriend: कोण आहे ईशान किशनची गर्लफ्रेंड आदिती हुंडिया? फिल्मी स्टाईल ओळख अन् लव्ह स्टोरीला सुरुवात..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.