ICC World Cup 2023: ICC चा BCCI ला नारळ; ‘या’ कारणामुळे भारतात होणाऱ्या वर्ल्डकपचे यजमानपद घेतले काढून..

0

ICC World Cup 2023: पुढील वर्षी म्हणजेच, २०२३ मध्ये होणाऱ्या 50 षटकांच्या विश्वचषक यजमानपदावरून BCCI आता संकटात सापडली असून, ICC ने या संदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 2023 मध्ये होणाऱ्या पन्नास षटकाच्या विश्वचषकाचे यजमानपद भारत साकारणार होता. मात्र आता याबाबत म्हत्वाची माहिती समोर आली असून, भारताचे यजमानपद संकटात सापडले आहे. आयसीसीने या संदर्भात आता कठोर पावले उचलली असून, २०२३ मध्ये होणारा विश्वचषक भारतात होणार नसल्याची दाट शक्यता असल्याने, भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या आनंदावर विरजण पडणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

भारत आणि पाकिस्तान (India Pakistan) यांच्यामधील वाद हा नव्याने सांगण्याची आवश्यकता नाही. भारत आणि पाकिस्तान यांच्यामधील संबंधाचे थेट परिणाम खेळावर देखील दिसून येतात. गेल्या अनेक वर्षांपासून भारत पाकिस्तानमध्ये, तर पाकिस्तान भारतात क्रिकेट खेळण्यासाठी आलेला नाही. याला या दोन्हीं देशांचे असणारे संबंध कारणीभूत आहेत. 2023मध्ये अशिया कपचे (asia cup host) यजमानपत हे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडे आहे. (PCB) साहजिकच यामुळे पाकिस्तान आपल्या देशात आशिया कपचे आयोजन करणार आहे.

भारत पाकिस्तानमध्ये आशिया कप खेळण्यासाठी जाणार नसल्याचं यापूर्वीच भारताकडून सांगण्यात आलं आहे. भारत जर अशिया कप खेळण्यासाठी पाकिस्तान मध्ये येत नसेल, तर आम्ही देखील भारतामधे वर्ल्ड कप खेळण्यासाठी येणार नसल्याचं पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे चेअरमन रमिझ राजा (Ramiz Raja) यांनी स्पष्ट केले आहे. या प्रकरणामुळे आता नवा वाद निर्माण झाला असून, आता या संदर्भात आयसीसीने (ICC) देखील दखल घेतली आहे.

2023 मध्ये होणाऱ्या आशिया कप (Asia Cup) स्पर्धेमध्ये पाकिस्तानमध्ये जर भारत खेळायला आला नाही, तर आम्ही देखील 50 षटकाच्या विश्वचषकामध्ये भारतात खेळण्यासाठी येणार नसल्याची धमकी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे चेअरमन रमीझ राजा यांनी वेळो-वेळी दिली आहे. एवढेच नाही, तर आयसीसी पक्षपात करत असल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे. आयसीसी नेहमी बीसीसीआयच्या उपयोगाचा निर्णय घेत असल्याचा आरोप रमिझ राजा यांनी केला असल्याने, आता आयसीसीने याविषयी गांभीर्याने विचार सुरू केला आहे.

पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) आणि भारतीय नियामक मंडळ (BCCI) या दोघांमध्ये विश्वचषक 2023 पूर्वी काही तोडगा निघाला नाही, तर आयसीसी भारतामध्ये 2023 ला होणारा विश्वचषक इतर ठिकाणी हलवणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळाली आहे. 2023 मध्ये होणारा विश्वचषक भारतामध्ये होऊ द्यायचा की नाही, याबाबत आयसीसी आशिया चषक स्पर्धा पार पाडल्यानंतर, निर्णय घेणार असल्याची माहिती आहे. अर्थात आशिया चषक जर पाकिस्तानमध्ये झाला, तर भारत या स्पर्धेत भाग घेणार नाही. जर भारताने या स्पर्धेत भाग घेतला नाही, तर आयसीसी भारताकडून 2023 विश्वचषकाचे यजमानपद हिसकावून घेणार असल्याची माहिती आहे.

2016 नंतर एकही आयसीसी स्पर्धा नाही

यापूर्वी 2016 मध्ये भारताला आयसीसी क्रिकेट स्पर्धेचे यजमानपद मिळाला होतं. 2016 साली भारताने t20 विश्वचषकाचे (T20 World Cup) यजमानपद भूषवले होते. जवळपास सात वर्षाचा काळ उलटला, तरी देखील अद्याप भारताला आयसीसी क्रिकेट स्पर्धेचे यजमानपद मिळालेले नाही. (India has yet to host an ICC cricket tournament) पुढच्या वर्षी 50 षटकांच्या विश्वचषकाचे यजमान पद भारताकडे देण्यात आले. मात्र आता पीसीबी आणि बीसीसीआय यांच्यामुळे पुढच्यावर्षी होणाऱ्या विश्वचषकाचे यजमानपद देखील भारताच्या हातून निसटण्याची दाट शक्यता आहे. (India has been given the host post for next year’s 50-over World Cup)

हे देखील महत्वाचं कारण

2016 साली झालेल्या टी ट्वेंटी विश्वचषकाचे यजमानपद भारताने भूषवलं होतं. आयसीसीच्या नियमानुसार जो देश आयसीसी क्रिकेट स्पर्धेचे यजमानपद भूषवतो, त्या देशाला ICC ला कर द्यावा लागतो. 2016 मध्ये देखील कराची समस्या बीसीसीआय सोडवू शकले नव्हते. यामुळे ICC ने आपली कार रक्कम BCCI च्या खात्यातून कापली होती. गेल्या वेळेस तब्बल १९० कोटी कपल होते. यावेळी आयसीसीने आपला कर जवळपास 22 टक्क्यांनी वाढवला आहे.

म्हणजेच यावेळी भारताला तब्बल 900 कोटी रुपये आयसीसीला द्यायचे आहेत. जर असं झालं नाही, तर भारताच्या हातून वर्ल्डकपचे यजमानपद जाणार आहे. भारताने हे पैसे आयसीसीला दिले नाही, तर 900 कोटी रुपये आयसीसी BCCI कडून घेणार आहे. मात्र BCCI ने स्पष्ट सांगितले आहे. सरकारने पैसे दिले नाही, तर तुम्ही विश्वचषक दुसऱ्या देशात खेळवला तरी हरकत नाही. आमच्याकडून ही रक्कम वासून केली जाऊ नये. यामुळे आता जवळपास भारताकडून विश्वचषकाचे यजमानपद जाण्याची दाट शक्यता आहे.

हे देखील वाचा BCCI T20 Plan: रोहितमुळे विराटचा गेला बळी! विराट कोहलीलाही वगळले T20 संघातून; अखेर T-20 कर्णधारपदी हार्दिकच्या नावावर शिक्कामोर्तब..

Virat Kohli: पुजाराने तीन वर्षानंतर शतक झळकावले, तरीही चर्चा विराटच्या सेलिब्रेशनची; काय केले विराटने, पाहा व्हिडिओ..

Celebrity Sex Life: या कलाकारांनी सांगितल्या त्यांच्या आवडत्या सेक्स पोझिशन; आलियाची क्लासिक मिशनरी तर करिनाची आहे..

Tik tok Star Santosh Munde: संतोष मुंडेचा मृत्यू नाही घात? धक्कादायक कारण आले समोर..

Sania Mirza Shoaib Malik: सानिया-शोएब घटस्फोटात खळबळजनक ट्विस्ट; पाहा काय म्हणाला शोएब मलिक..

Extramarital affair: लग्नानंतर पत्नी इतर पुरुषांकडे आकर्षित होण्याची ही आहेत चार कारणे; चौथं कारण खूपच धोकादायक..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.