Health Tips: सालीसकट बदाम खाण्याचे दुष्परिणाम जाणून सरकेल पायाखालची जमीन; दिवसातून इतके बदाम खाणे योग्य..

0

Health Tips: निरोगी आरोग्य ही खूप मोठी संपत्ती आहे, हे प्रत्येकजण मान्य करेल. अलीकडे धावपळीच्या या युगामध्ये अनेकांना आरोग्या संबंधी अनेक समस्यांना सामोरे जावं लागतं. निरोगी आरोग्य ठेवण्यासाठी तुम्हाला निरोगी आहार करणे फार आवश्यक असतं. चांगल्या आरोग्यासाठी नेहमी शिजवलेले पदार्थ खावेत, असं सांगितलं जातं. तेलकट पदार्थांपासून दोन हात लांब राहाल्यास, तुम्हाला चांगले आरोग्य मिळते. हे आता जवळपास प्रत्येकाला माहित झालं आहे.

चांगले आरोग्य ठेवण्यासाठी अनेकजण ड्रायफूटचा आहारात समावेश करतात. आहारामध्ये सुक्या मेव्याच्या समावेशाने तुम्ही अनेक आहारापासून दूर राहता हे जरी खरं असलं, तरी अनेकांना ड्रायफूट्स खाण्याच्या पद्धती माहीत नसल्याने अनेक समस्या देखील उद्भवू शकतात. अनेकजण आपल्या आहारामध्ये बदामाचा (almonds) समावेश करतात. सकाळी उठल्यानंतर, अनेक जण चार-पाच बदाम नियमितपणे खात असतात. मात्र बदाम खाण्याची योग्य पद्धत कोणती आहे, हे तुम्हाला माहीत आहे का?

बदाम खाण्याची योग्य पद्धत

बदाम हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. बदामामध्ये फायबर (fiber) कॅल्शियम (Calcium) विटामिन ई, (vitamin e) प्रथने (protein) अशी अनेक पोषक घटक आढळतात. शरीरासाठी हे घटक खूप फायदेशीर आहेत. मात्र हेच बदाम जर तुम्ही साली सकट खाल्ले, तर तुम्हाला याचे परिणाम देखील भोगावे लागतात. बदामाच्या सालीमध्ये टॅनीन (Tannin) नावाचा अपयकारक घटक आढळतो. हा घटक बदामामधून मिळणारे पौष्टिक घटक आपल्या शरीरातमध्ये जाण्यासाठी अडथळा निर्माण करतो.

बदाम भिजवून खाण्याचे फायदे

बदाम सालीसकट खाण्याचे दुष्परिणाम तुम्हाला माहीत झाले. मात्र बदाम खाण्याची योग्य पद्धत काय आहे, हे तुम्हाला माहीत आहे का? बदाम खाण्याची योग्य पद्धत ही तुम्ही संध्याकाळच्या वेळेला बदाम पाण्यामध्ये भिजवत ठेवा. रात्री भिजवत ठेवलेले बदाम सकाळी उपाशीपोटी साल काढून खाणे आवश्यक आहे. त्यामुळे भरपूर प्रमाणात तुम्हाला, प्रथिने, कॅल्शियम, विटामिन ई, इत्यादी पोषक घटक अधिक प्रमाणात मिळतात.

रात्री पाण्यामध्ये भिजवत ठेवलेले बदाम जर तुम्ही सकाळी खाल्ले तर ते तुम्हाला खाण्यासाठी देखील मऊ लागतात याशिवाय साल काढणे देखील अधिक सोयीस्कर होतं. जर तुम्ही रात्री कोमट पाण्यामध्ये बदाम भिजवत ठेवले, तर बदामामध्ये असणारे आम्लाचे प्रमाण खूप कमी होते. जर तुमच्या शरीरामध्ये फायटिंग आम्लाचे प्रमाण जास्त झाले, तर तुमच्या शरीरामध्ये कॅल्शियम झिंक तसेच मॅंगनीजची कमतरता जाणवते.

भिजवलेल्या बदामामध्ये (Soak almonds) मोठ्या प्रमाणात मॅग्नेशियम मिळत असल्याने हे डायबेटीस लोकांसाठी देखील खूप उपयुक्त मानले जाते. शरीरामध्ये मॅग्नेशियम मोठ्या प्रमाणात गेल्यामुळे कोलेस्टेरॉलची पातळी कमी होते. आणि यामुळे ‘हार्ट-अटॅकचा’ धोका देखील खूप मोठ्या प्रमाणात कमी होतो. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, दिवसातून किती बदाम खाणे योग्य आहे? तर आपण याविषयी देखील सविस्तर जाणून घेणार आहोत.

सालीसकट बदाम खाण्याचे दुष्परिणाम आपण जाणून घेतले. रात्री कोमट पाण्यात भिजवायला ठेवलेले बदाम सकाळी उपाशीपोटी खाल्ल्याने काय फायदे होतात, हे देखील आपण जाणून घेतलं. मात्र दिवसातून किती बदाम खाणे आपल्या शरीरासाठी फायदेशीर आहे, हे देखील जाणून घेऊ. दिवसातून तुम्ही पाच ते आठ बदाम खाणे योग्य असल्याचे संशोधनातून समोर आलं आहे. दररोज जर तुम्ही पाच-सहा बदामांचं सेवन केलं, तर तुमच्यासाठी हे खूप उपयुक्त मानलं जातं अधिक बदामांचा सेवन जर तुम्ही करायला सुरुवात केली, तर तुमचं वजन वाढू शकतं. सोबतच शरीरामध्ये उष्णता देखील वाढते. (How many almonds to eat a day)

हे देखील वाचा Lionel Messi: मेस्सीचं पुणे कनेक्शन आहे खूपच खास; मेस्सीचे आजी-आजोबा पुण्यात करत होते हा व्यवसाय..

FIFA world cup final: अर्जेंटिना जिंकताच तरुणी झाली पूर्णपणे उघडी; पाहा व्हिडिओ..

Rohit Sharma and Rahul Dravid: कर्णधार पदानंतर रोहित शर्माची T-20 संघातूनही हकालपट्टी; राहुल द्रविडही T-20 मधून आऊट..

Bride dance with boyfriend: आपल्या लग्नात बॉयफ्रेंडला नाचताना पाहून नवरीचा सुटला ताबा; कडकडून मिठी, हंबरडा अन्..

Relationship Tips: बॉयफ्रेंडची आठवण आल्यावर मुली करतात ह्या घाणेरड्या गोष्टी..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.