Male fertility Facts: या वयानंतर पुरुषांचे स्पर्म येते संपुष्टात; जाणून घ्या मुल जन्माला घालण्याचे पुरुषांचे योग्य वय..

0

Male fertility Facts: पुरुष आणि स्त्रियांचं मूल जन्माला घालण्याचे योग्य वय असतं. (Male childbearing age) कदाचित तुमच्यापैकी अनेकांना हे माहिती असेल. मात्र अजूनही, आपल्याकडे अशा विषयांविषयी सविस्तरपणे बोललं जात नाही. खरंतर लैंगिक विषय हा प्रत्येकाच्या आयुष्यासंबंधी खूप महत्त्वाचा विषय आहे. मात्र आपल्याकडे याच विषयाकडे दुर्लक्ष केलं जातं. आणि मग अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. स्त्रियांचे मूल जन्माला घालण्याचं योग्य वय कदाचित तुम्हाला माहिती असेल, मात्र पुरुषांचे नक्कीच नसेल. आज आपण पुरुषांच्या मूल जन्माला घालण्याचा योग्य वयाविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत.

स्त्री (women) असो की पुरुष (men) वाढत्या वयाबरोबर तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावं लागतं. वाढत्या वयाबरोबर लैंगिक समस्याच्या देखील अनेक समस्या निर्माण होतात. पुरुषांच्या वाढत्या वयांबरोबर त्यांच्या स्पर्मची संख्या आणि गुणवत्ता देखील कमी होत जाते. साहजिकच याचा परिणाम मूल जन्माला घालण्याच्या स्थितीवर होतो. आणि म्हणूनच, अनेक जण सल्ला देतात, योग्य वयात लग्न आणि योग्य वयात मुलं होणं फार आवश्यक आहे. आता जर तुम्हाला पुरुषांचं मूल जन्माला घालण्याचा योग्य वय माहिती नसेल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे.

वडील होण्याचं योग्य वय?

एका संशोधनानुसार वडील होण्याचे म्हणजेच, मूल जन्माला घालण्याचे योग्य हे वीस वर्षांपासून तीस वर्षांपर्यंत योग्य असल्याचे समोर आले आहे. मात्र पुरुषांचं मूल जन्माला घालण्याचं योग्य हे वीस पासून तीस वर्षापर्यंत असले, तरी पन्नास व्या वर्षांपर्यंत देखील पुरुषांना मूल होऊ शकतं. असं देखील या संशोधनातून समोर आलं आहे. मात्र पुरुषांच्या शुक्राणूंची संख्या तीस वर्षानंतर हळूहळू कमी होत जाते. यामुळे पन्नासव्या वर्षी प्रत्येक जण मूल जन्माला घालेलच असं नाही.

जैविक घड्याळ

या विषयाच्या तज्ञांनी केलेल्या संशोधनानुसार, पुरुषांमधील स्पर्मचे उत्पादन हे कधीच थांबत नाही. मात्र पुरुषांच्या वाढत्या वयाबरोबर स्पर्ममधील डीएनएचे नुकसान होण्याची शक्यता खूप मोठ्या प्रमाणात वाढते. ज्यामुळे पुरुषांच्या प्रजनन क्षमतेवर त्याचा परिणाम होतो. एका संशोधनातून समोर आलेल्या माहितीनुसार, ज्या पुरुषांचे वय 40 वर्षापेक्षा अधिक असतं, अशा पुरुषांनी एखाद्या मुलाला जन्म घातला, तर त्या मुलांमध्ये निरोडेव्हलपमेंटल आजार होऊ शकतात. जे पुरुष आपल्या वयाच्या 40 व्या वर्षानंतर मुलाला जन्म देतात, अशा मुलांमध्ये ऑटिझम स्पेक्ट्रम विकसित होण्यासाठी पाचपट अधिक धोका निर्माण होतो.

केव्हा थांबते स्पर्मची निर्मिती थांबते?

डब्ल्यू एच ओ (WHO) म्हणजेच जागतिक आरोग्य संघटनेने पुरुषांच्या स्पर्मचे काही निकष ठेवले आहेत. ज्यावरून तुमचे स्पर्म निरोगी आहे की नाही हे ठरवलं जातं. यामध्ये स्पर्मची संख्या, आकार त्याचबरोबर हालचाल यांचा समावेश आहे. या संघटनेने प्रसारित केलेल्या अहवालानुसार पुरुषांच्या वयाच्या 35 व्या वर्षी पुरुषांमध्ये स्पर्मचे पॅरामीटर हे खराब व्हायला सुरुवात होते. मात्र पुरुषांच्या स्पर्मचे पॅरामीटर खराब होत असले तरी मुल जन्माला घातलं जाऊ शकतं.

या वयात पुरुष असतात लैंगिक दृष्ट्या सर्वात स्ट्रॉंग

संशोधनानुसार, पुरुषांचे वय 22 ते 25 वर्ष असेल, तर या वयामध्ये पुरुष सर्वात फर्टाइल असतात. अशा पुरुषांना वयाच्या 35 व्या वर्षांमध्ये मूल जन्माला घालण्यास सांगितलं जातं. कारण अशा वयामध्ये पुरुषांची प्रजनन क्षमता बिघडण्याचे दाट शक्यता असते. पुरुषांचे मूल जन्माला घालण्याचे योग्य वय हे 40 व्या वर्षापर्यंत असते. मात्र जर तुम्ही 40 व्या वर्षानंतर मूल जन्माला घालण्याचा विचार करत असाल, तर डॉक्टरांशी संपर्क साधून या विषयी माहिती घेणे फार आवश्यक आहे.

हे देखील वाचाRight Age to Get Pregnant: आई होण्याचे योग्य वय जाणून तुम्हाला देखील बसेल धक्का..

Mahesh Mote News: रिल्स स्टार महेश मोटे याचा कार अपघातात मृत्यू..

IND vs BAN: बाद झाल्यानंतर विराट कोहलीचा राग अनावर, थेट या खेळाडूला दिली आय-माय वरून शिवी; पाहा व्हिडिओ..

FIFA world cup final: अर्जेंटिना जिंकताच तरुणी झाली पूर्णपणे उघडी; पाहा व्हिडिओ..

Hardik Pandya: हार्दिक पांड्याने नाकारली कॅप्टन पदाची ऑफर; कारणही आले समोर..

Gautami Patil: म्हणून होतेय गौतमी पाटीलवर बंदी घालण्याची मागणी; हे दोन व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल ही डान्स नाही तरुणांना करतेय उत्तेजित..

IPL Auction 2023: वीरेंद्र सेहवागचा भाचा मालामाल, या संघाने मोजले तब्बल इतके कोटी; या विभागात आहे विराट कोहलीचाही बाप..

IPL Auction 2023: IPL च्या इतिहासात हे चार विदेशी खेळाडू ठरले सर्वात महागडे; या भारतीय दिग्गजांचा मात्र झाला कचरा..

Chanakya Niti; ..म्हणून पती-पत्नीने चुकूनही एकमेकांसमोर बदलू नयेत कपडे; वाचा आचार्य चाणक्यांनी सांगितलेले कारण..

Relationship Tips: बॉयफ्रेंडची आठवण आल्यावर मुली करतात ह्या घाणेरड्या गोष्टी..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.