Mahesh Mote News: रिल्स स्टार महेश मोटे याचा कार अपघातात मृत्यू..

0

Mahesh Mote News: सोशल मीडियावर लाखो फॉलोवर्स असणारा तरुणांच्या गळ्यातील ताईत असं म्हटलं तरी चालेल असे व्यक्तिमत्व महेश मोटे याचा कार अपघातात (Mahesh Mote Car Accident) मृत्यू झाल्याची घटना सोशल मीडियावर चांगलीच वायरल होत आहे. स्वतः महेश मोटे याच्या इंस्टाग्राम अकाउंट वरून याबाबत पोस्ट करण्यात आले आहे. तसेच महेश मोटे यांच्या इंस्टाग्राम स्टोरी मध्ये महेश मोटे यांचा केरळा बॉर्डरवर मृत्यू (Mahesh Mote Death) झाल्याची बातमी (Mahesh Mote News) स्टोरी मधून देण्यात आली आहे.

 

महेश मोटे(Mahesh Mote) हा पंढरपूर तालुक्यातील एका बाबुळगाव नावाच्या गावातील आहे. टिक टॉक या प्लॅटफॉर्मवर महेश हा व्हिडिओ पोस्ट करायचा. महेशच्या गावरान, सहज आणि साध्या भाषाशैलीमुळे महेशने टिक टॉक वर खूपच फॉलोवर्स मिळवले होते. अल्पावधीतच महेशचे (Mahesh Mote Instagram Reels) व्हिडिओ लोकांच्या पसंतीस येऊ लागले. त्यात महेश गावाकडील संस्कृती, गावातील माणसं, गावाकडचं राहणीमान यावर बोलत असायचा. तसेच तो बरेच प्रेरणादायी व्हिडिओ देखील शेअर करत असायचा. त्यामुळे महेशच्या व्हिडिओला देखील लोकांची खूपच पसंती मिळू लागली.

 

परंतु 2020 मध्ये टिक टॉक या ॲपवर बंदी आली. त्यातच नव्याने इंस्टाग्रामने रिल्स हे फीचर लॉन्च केले होते. लोकांच्या पसंतीचे पडू लागले होते. मग महेश ने देखील रिल्सवरती व्हिडिओ टाकण्यास सुरुवात केली. अल्पावधीतच महेश मोटेचे व्हिडिओज लोकांच्या पसंतीस येऊ लागले. आजतागायत महेश मोटेचे इंस्टाग्रामवर 1 लाख 52 हजार फॉलॉवर्स असल्याचे पाहायला मिळतात. महेशच्या फॉलॉवर्स लिस्ट मध्ये अनेक तरुण, तरुणी यासह ज्येष्ठ नागरिक देखील पाहायला मिळतात. तो रोजच्या जीवनाचा कसा आनंद घ्यायचा यावर लोकांना प्रेरणा देत असतो. (Mahesh Mote News)

 

महेश मोटेला भावपूर्ण श्रद्धांजली देणारी पोस्ट (Mahesh Mote Death) आणि इंस्टाग्राम स्टोरी सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. त्याच्या पोस्टवर देखील त्याचे चाहते चांगलेच भावुक झालेले पाहायला मिळत आहेत. महेश मोटेच्या पोस्टवर त्याचे चाहते कमेंट करून व्यक्त होताना पाहायला मिळत आहेत. (Mahesh Mote News)

 

ज्या माणसाने आयुष्याचा खडतर प्रवास सुद्धा खूप छान पद्धतीने पार केला. ज्याने सुखात , दुःखात, खडतर प्रवासामध्ये, संघर्षामध्ये सगळ्यांना खूप छान पद्धतीने जगायचं कसं हे शिकवलं. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद कसा पहायचा ते सांगितले. तुमच्या प्रत्येक रील्स मधून तुम्ही प्रत्येक व्यक्तीला मोटिवेट करता. कृपया असे काही टाकू नका आणि खरे असेल तर मृत्यू जरी शेवटचे सत्य असले तरी ते स्वीकारण्यासाठी माणसाला खुप वेळ लागतो. आज बाहेरच जग जितकं धगधगत सत्य दाखवत ते जेंव्हा आपल्या जवळच्या माणसांवर येत तेंव्हा खुप वाईट वाटतं. प्रत्येक गोष्टीवर वेळ हेच औषध आहे. तो मात्र वाईट वेळ लवकर जाऊ देत नाही. मनातील मोकळी जागा खुप काही सांगून जाते आणि ती जागा मित्रा तू तयार केली होतीस प्रत्येकाच्या मनावर, अशी कमेंट एका तरुणीने महेशच्या पोस्टवर केली आहे.

तर दुसऱ्या एका तरुणीने, पोस्ट टाकणाऱ्याच बुद्धीच वैभव खूप भारी आहे. तू जो आहे तो जर अपघात झाला तर तुला मोबाईल कसा सापडला तुला? आणि सापडलाच तर त्याला पासवर्ड असेलच. चल पासवर्ड तुला माहिती असेल कारण तू जवळचा मित्र असशील. मग इतका जवळचा मित्र असून पोस्ट टाकायला त्याला बॅकग्राऊंडला‌ सॅड सॉंग टाकायला चांगला वेळ भेटला की तुला. इतकंच सॅड फील होतय तर तुझ्या अकाउंटला पोस्ट टाक किंवा स्टोरी ठेव ना. आम्हाला वाचुन इतका धक्का बसला की हात थरथरत आहेत. मग तुझी इतकी हिम्मत कशी झाली करायची? उगाच मूर्खपणा करून असलं काही करू नका लोकांना त्रास होतोय. मजाक असेल तर लगेच पोस्ट डिलिट करा. खूप महागात पडेल हे सगळं अशी कमेंट केली आहे.

Mahesh Mote News,

अशी मजाक परत करू नका राव दादा love you Jaan अशी कमेंट एकाने केली आहे. तर दुसऱ्याने बातमी खोटी आहे अस त्याच्या गावातून समजले आहे. त्याचे अकाउंट हॅक झाले आहे, तरी चुकीच्या बातम्या (Mahesh Mote News) पसरवू नये. अशी कमेंट केलेली पाहायला मिळत आहे. त्याचे चाहते वेगवेगळ्या कमेंट करताना पाहायला मिळत आहेत.

मात्र आता त्याचे अकाऊट हॅक वगैरे काही झालं नसल्याची माहिती समोर आली आहे. महेश मोटे या पठ्ठ्याने आपली सोशल मीडियावर चर्चा होण्यासाठी स्वतः आपल्या अकाऊट  वरून भावपूर्ण श्रद्धांजली अशी स्टोरी टाकल्याची माहिती समोर आली आहे. केवळ सोशल मीडियावर सहानुभूती मिळवून फॉलोअर्स वाढवण्यासाठी महेशने हा मूर्खपणा केला असल्याचं समोर आलं आहे. पुढील घडामोडीसाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा आणि फेसबुक पेजला लाईक फॉलो करा.

हेही वाचा: Gautami Patil: म्हणून होतेय गौतमी पाटीलवर बंदी घालण्याची मागणी; हे दोन व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल ही डान्स नाही तरुणांना करतेय उत्तेजित..

Hardik Pandya: हार्दिक पांड्याने नाकारली कॅप्टन पदाची ऑफर; कारणही आले समोर..

मासिक पाळीमुळे पुरुषांचे आयुष्य होतेय उध्वस्त..

या पाच गोष्टींमुळे मुली मुलांकडे होतात आकर्षित..

IPL Auction 2023: वीरेंद्र सेहवागचा भाचा मालामाल, या संघाने मोजले तब्बल इतके कोटी; या विभागात आहे विराट कोहलीचाही बाप..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.