Hardik Pandya: हार्दिक पांड्याने नाकारली कॅप्टन पदाची ऑफर; कारणही आले समोर..

0

Hardik Pandya: लगातार दोन टी-ट्वेन्टी वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) झालेल्या निराशाजनक कामगिरीनंतर, भारतीय टी-ट्वेंटी संघात बदल करण्यातच्या दृष्टीने बीसीसीआयने (BCCI) महत्त्वाची पावले टाकली आहेत. आगामी t20 विश्वचषकाच्या तयारीसाठी बीसीसीआय नवीन कर्णधार (new captain in T20 cricket) आणि नवीन प्रशिक्षकाची नेमणूक करणार आहे. एवढेच नाही, तर टी-ट्वेंटी संघातून रोहित शर्मासह (Rohit Sharma) अनेक सिनियर खेळाडूंना (senior player) वगळलं देखील जाणार असल्याची माहिती आहे.

टी-ट्वेंटी संघाच्या कर्णधारपदी हार्दिक पांड्याची निवड केली जाणार होती (Selection of Hardik Pandya as captain of T20 team) मात्र हार्दिक पांड्याने कर्णधारपद स्वीकारण्यासाठी वेळ मागून घेतला असल्याने एकच खळबळ उडाली आहे. भारतीय क्रिकेट (Indian cricket) मधील अनेक सीनियर खेळाडूंनी टी20 संघाचा कर्णधार केएल राहुल असावा, असं बीसीसीआयला सुचित केलं होतं. मात्र बीसीसीआयने हा प्रस्ताव फेटाळून लावत, हार्दिक पांड्या आगामी टी-ट्वेंटी क्रिकेटसाठी कर्णधार असणार असल्याचं BCCI ने खेळाडूंना देखील सूचित केलं आहे.

आगामी टी20 विश्वचषकाच्या तयारीसाठी रोहित शर्मा व्यतिरिक्त बीसीसी नवीन कर्णधाराच्या शोधात होती. यामध्ये केएल राहुलचं देखील नाव अग्रेसर होतं. मात्र हार्दिक पांड्याचा खेळ आणि खेळाची समज राहूलपेक्षा चांगली असल्याने आगामी टी-ट्वेंटीसाठी हार्दिक पांड्याची कर्णधार म्हणून निवड करण्यासाठी बीसीसीआय अनुकूल आहे. बीसीसीआयने यासंदर्भात हार्दिक पांड्या सोबत देखील चर्चा केली आहे, मात्र हार्दिक पांड्याने सध्या मी यासाठी तयार नाही. विचार करण्यासाठी मला आणखी वेळ हवा आहे. असं सांगितले आहे.

हार्दिक पांड्याने टी-ट्वेंटी संघाचे कर्णधारपद स्वीकारायचे की नाही, यासाठी विचार करण्याकरिता वेळ हवा असल्याचं बीसीसीआयला सांगितले आहे. हार्दिक पांड्याने टी 20 संघाच्या कर्णधार पदाची BCCI कडून आलेली ऑफर एक प्रकारे फेटाळली असल्याचं देखील आता समोर येऊ लागलं आहे. याला कारण देखील दिल जात आहे. रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्याचे संबंध अतिशय चांगले असून, हार्दिक पांड्याच्या यशस्वी करिअरमध्ये रोहित शर्माचा खूप मोठा रोल आहे.

टी-ट्वेंटी संघाच्या कर्णधार पदावरून रोहित शर्माला काढून टाकण्यात येणार असून, त्याच्या जागी हार्दिक पांड्याची निवड करण्यात येणार असल्याच्या बातम्या प्रसारित झाल्या तेव्हा पासूनच रोहित शर्मा आणि हार्दिक पांद्याची या बाबत चर्चा होत होती. असा देखील रिपोर्ट एका मीडियाने प्रसारित केला आहे. आणि म्हणूनच हार्दिक पांड्याने टी ट्वेंटी संघाच्या कर्णधार पदाची बीसीसीआयकडून आलेली ऑफर स्पष्टपणे नाकारली नसली, तरी रोहित शर्मामुळे त्याने BCCI ला वेळ मागून घेतली आहे.

काही नियमाच्या बंधनामुळे आणि हार्दिक पांड्याने यासंदर्भात वेळ मागून घेतल्याने, बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांची कौन्सिल मीटिंग पार पडली यामध्ये निवड करण्यात आली नसल्याचे आता समोर आलं आहे. भारताच्या नवीन टी-ट्वेंटी संघाच्या कर्णधाराची निवड ही नवीन सिलेक्शन कमिटीची नियुक्ती झाल्यानंतरच होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आलं आहे.

एकदिवसीय क्रिकेट मध्येही पांड्याच कर्णधार

टी-ट्वेंटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये देखील आगामी काळासाठी आम्ही हार्दिक पांड्याची निवड करण्यासाठी अनुकूल आहोत. मात्र नवीन निवड समितीच्या चर्चेशिवाय हा निर्णय घेणं योग्य नसल्याचे देखील बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं आहे. 2023 पर्यंत रोहित शर्मा वनडे आणि कसोटी संघाचा कर्णधार असणार आहे.

पुढील वर्षी 2023 मध्ये भारताला एकदिवसीय क्रिकेटचा विश्वचषक रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळायचा आहे. यानंतर रोहित शर्माला देखील कर्णधार पदावरून दूर केले जाणार आहे. अशी देखील माहिती बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांकडून इंसाईड स्पोर्टला देण्यात आली आहे. बीसीसीआयचे काही अधिकारी रोहित शर्मा टी-ट्वेंटी क्रिकेटमध्ये देखील कर्णधार असावा. असं म्हणत आहेत, मात्र निवड समितीच्या सल्ल्यानुसार, हा निर्णय घेण्यात येणार असल्याचं अधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

हे देखील वाचा FIFA world cup final: अर्जेंटिना जिंकताच तरुणी झाली पूर्णपणे उघडी; पाहा व्हिडिओ..

IPL Auction 2023: वीरेंद्र सेहवागचा भाचा मालामाल, या संघाने मोजले तब्बल इतके कोटी; या विभागात आहे विराट कोहलीचाही बाप..

IPL Auction 2023: IPL च्या इतिहासात सर्वात महागडे ठरले हे चार विदेशी खेळाडू; या भारतीय दिग्गजांचा मात्र झाला कचरा..

Gautami Patil: म्हणून होतेय गौतमी पाटीलवर बंदी घालण्याची मागणी; हे दोन व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल ही डान्स नाही तरुणांना करतेय उत्तेजित..

Relationship Tips: बॉयफ्रेंडची आठवण आल्यावर मुली करतात ह्या घाणेरड्या गोष्टी..

Chanakya Niti; ..म्हणून पती-पत्नीने चुकूनही एकमेकांसमोर बदलू नयेत कपडे; वाचा आचार्य चाणक्यांनी सांगितलेले कारण..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.