CR Recruitment 2022: दहावी पास उमेदवारांसाठी सेंट्रल रेल्वेत हजारो पदांची मेगा भरती; असा करा ऑनलाईन अर्ज..

0

CR Recruitment 2022: जर तुम्ही दहावी पास (10th pass) असाल आणि नोकरीच्या शोधात असाल, तर तुमच्यासाठी ही खूप महत्त्वाची बातमी आहे. दहावी पास उमेदवारांसाठी आता सेंट्रल रेल्वे विभागात (central railway department) सरकारी नोकरी (government job) करण्याची सुवर्णसंधी आहे. रेल्वे विभागात (railway department) तब्बल दोन हजाराहून अधिक रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. अपरेंटिस या पदासाठी ही भरती केली जाणार असून, या संदर्भातली अधिसूचना देखील जारी करण्यात आली आहे.

महागाई (inflation) आणि बेरोजगारीच्या (unemployment) या दुनियेत प्रत्येकाकडे इन्कमचा काहीतरी सोर्स असणं फार आवश्यक झालं आहे. उच्च शिक्षण घेऊन देखील नोकरीच्या संधी उपलब्ध होत नसल्याने, आता प्रत्येक जण दहावी बारावीनंतरच कुठेतरी चार पैशाची नोकरी शोधताना दिसून येतो. जर तुम्ही देखील या प्रकारात मोडत असाल, आणि नोकरीच्या शोधात असाल, तर तुमचा शोध या ठिकाणी पूर्ण होणार आहे. सेंट्रल रेल्वे विभागामध्ये 2422 रिक्त पदांच्या भरती निघाली आहे. यासाठी शैक्षणिक पात्रता, उमेदवारांचे वय, ऑनलाइन अर्ज कसा करायचा जाणून घेऊया सविस्तर.

शैक्षणिक पात्रता

भारतीय रेल्वे विभागात निघालेल्या 2422 रिक्त जागांसाठी उमेदवाराच्या शैक्षणिक पात्रतेचा विचार करायचा झाल्यास, उमेदवाराचे शिक्षण दहावी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. कोणत्याही मान्यता प्राप्त शिक्षण मंडळातून 50 टक्के गुणांसह दहावी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. सोबतच बारावीचे उमेदवार देखील या भरती प्रक्रियासाठी अर्ज करू शकणार आहेत. याबरोबरच उमेदवाराकडे संबंधित व्यापारमधील राष्ट्रीय व्यापार प्रमाणपत्र असणे देखील बंधनकारक असणार आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

वयोमर्यादा आणि अर्ज शुल्क

भारतीय रेल्वे विभागात ‘अपरेंटिस’ या पदासाठी भरण्यात येणाऱ्या जागांसाठी उमेदवारांना 15 जानेवारी 2023 पर्यंत अर्ज करता येणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांच्या वयोमर्यादाचा विचार करायचा झाल्यास, उमेदवारांचे वय हे 15 ते 24 दरम्यान असणे आवश्यक आहे. एससी/एसटी/ओबीसी उमेदवारांना सरकारी नियमानुसार वयोमर्यादेमध्ये सूट दिली जाणार आहे. एसटी/एससी आणि pwd उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा अर्ज शुल्क आकारला जाणार नाही. इतर कॅटेगरीच्या उमेदवारांना शंभर रुपये अर्ज शुल्क आकारले जाणार आहे.

असा करा ऑनलाईन अर्ज

भारतीय रेल्वे विभागात केल्या जाणाऱ्या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करायचा आहे. यासाठी उमेदवारांना सर्वप्रथम आपल्या मोबाईल मधील क्रोमवर जाऊन https://rrccr.com/ असं सर्च करायचं आहे. यानंतर रेल्वे विभागाची अधिकृत वेबसाईट तुमच्यासमोर ओपन झालेली असेल. या नंतर तुम्हाला ‘enter’ या पर्यायावर क्लिक करायचं आहे. ‘railway Recruitment’ या पर्यायावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्ही नोंदणी करून फी भरायची आहे. फी भरल्यानंतर तुम्ही अर्ज करू शकता.

हे देखील वाचा Hardik Pandya: हार्दिक पांड्याने नाकारली कॅप्टन पदाची ऑफर; कारणही आले समोर..

IPL 2023: आयपीएल 2023 मध्ये धोनीच देणार आहे बेन स्टोक्सकडे कर्णधारपद; सीईओ काशी विश्वनाथ यांनी केले स्पष्ट..

Male fertility Facts: या वयानंतर पुरुषांचे स्पर्म येते संपुष्टात; जाणून घ्या मुल जन्माला घालण्याचे पुरुषांचे योग्य वय..

IND vs BAN: बाद झाल्यानंतर विराट कोहलीचा राग अनावर, थेट या खेळाडूला दिली आय-माय वरून शिवी; पाहा व्हिडिओ..

Gautami Patil: म्हणून होतेय गौतमी पाटीलवर बंदी घालण्याची मागणी; हे दोन व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल ही डान्स नाही तरुणांना करतेय उत्तेजित..

IPL Auction 2023: वीरेंद्र सेहवागचा भाचा मालामाल, या संघाने मोजले तब्बल इतके कोटी; या विभागात आहे विराट कोहलीचाही बाप..

Relationship Tips: बॉयफ्रेंडची आठवण आल्यावर मुली करतात ह्या घाणेरड्या गोष्टी..

FIFA world cup final: अर्जेंटिना जिंकताच तरुणी झाली पूर्णपणे उघडी; पाहा व्हिडिओ..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.