IPL 2023: आयपीएल 2023 मध्ये धोनीच देणार आहे बेन स्टोक्सकडे कर्णधारपद; सीईओ काशी विश्वनाथ यांनी केले स्पष्ट….

0

IPL 2023: आयपीएल 2023 च्या (IPL auction 2023) लीलावानंतर, चेन्नई सुपर किंग (CSK) हा संघ कागदावर तरी तगडा दिसत आहे. चेन्नई सुपर किंग संघाने (Chennai super kings) इंग्लंडचा दिग्गज ऑल राऊंडर बेन स्टोक्सला आपल्या संघात सामील केल्यानंतर, आता त्याच्याकडे चेन्नई सुपर किंग संघाचा आगामी कर्णधार म्हणून देखील पाहिले जात आहे. चेन्नई सुपर किंग संघाच्या मालकाने देखील आमच्या संघात बेन स्टोक्स (Ben Stokes) सामील झाल्याने महेंद्रसिंग धोनी (Mahendra Singh dhoni) प्रचंड खुश असल्याचे माध्यमाला सांगितलं होतं. यातच आता आणखी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. (CSK ‘got their next captain’ in Ben Stokes at IPL 2023)

आयपीएल 2023 च्या हंगामामध्ये महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) नाही, तर चेन्नई सुपर किंग संघाचा कर्णधार बेन स्टोक्स असणार असल्याची अपडेट आली आहे. गेल्या हंगामात देखील महेंद्रसिंग धोनीने चेन्नई सुपर किंग संघ बांधण्यासाठी आगामी काळात रवींद्र जडेजाला (Ravindra Jadeja) कर्णधार म्हणून तयार करताना दिसून आला. मात्र रवींद्र जडेजा यात खूप कमी पडला. मीडिया रिपोर्टनुसार, महेंद्रसिंग धोनीने आगामी काळासाठी चेन्नई सुपर किंग संघाची आतापासूनच बांधणी सुरू केली आहे.

मीडिया रिपोर्टनुसार महेंद्रसिंग धोनीचा सोळावा हंगाम आयपीएलचा शेवटचा हंगाम असणार आहे. 2023मध्ये होणाऱ्या आयपीएल नंतर महेंद्रसिंग धोनी क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती जाहीर करणार आहे. महेंद्रसिंग धोनी संघासोबत असतानाच आगामी काळासाठी एका नव्या कर्णधाराच्या मार्गदर्शनाखाली टीम उभा करण्याची जबाबदारी महेंद्रसिंग धोनीकडे चेन्नई सुपर किंग संघाच्या मालकाने दिली असल्याची माहिती आहे. आणि म्हणूनच 2023 च्या आयपीएलमध्ये महेंद्रसिंग धोनी आपल्या कर्णधार पदाची धुरा बेन स्टोक्सकडे सोपवणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळाली आहे.

गेल्या वर्षी झालेल्या आयपीएलच्या हंगामामध्ये देखील चेन्नई सुपर किंग संघाने रवींद्र जडेजाला कर्णधार केलं होतं. मात्र रवींद्र जडेजा ही जबाबदारी यशस्वीरीत्या पेलू शकला नाही. आणि पुन्हा एकदा चेन्नई सुपर किंग संघाच्या मालकाने ही जबाबदारी एम एस धोनीच्या खांद्यावर दिली. मात्र एम एस धोनी कर्णधार राहण्यासाठी इच्छुक नसल्याची माहिती समोर आली आहे. अशातच तो आता चेन्नई सुपर किंग संघाचा नवीन कर्णधार निवडणार आहे. ही जबाबदारी चेन्नई सुपर किंगच्या संघाने देखील त्याच्या खांद्यावर सोपवली आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, 2023 मध्ये होणाऱ्या सोळाव्या हंगामाकरिता महेंद्रसिंग धोनी स्वतः आपल्या कर्णधार पदाची जबाबदारी इंग्लंडचा ऑलराऊंडर खेळाडू बेन स्टोक्सकडे सोपवणार आहे. चेन्नई सुपर किंग संघाचे सीईओ (Chennai super kings CEO) काशी विश्वनाथ म्हणाले (Kashi Vishwanath) आम्ही बेन स्टोक्सला खरेदी केल्याने धोनी खूप खुश होता. बेन स्टोक्स एक ऑलराऊंडर असून, आमच्या संघाला एका ऑलराऊंडरची आवश्यकता होती. कॅप्टन म्हणून देखील तो पर्याय आहे. मात्र हा निर्णय धोनी घेणार असल्याचे ते म्हणाले.

2023 मध्ये आयपीएलचा सोळावा हंगाम सुरू झाल्यानंतर, महेंद्रसिंग धोनी स्वतः बेन स्टोक्सकडे कर्णधार पदाची धुरा देणार असल्याची माहिती आता समोर आली आहे. या निर्णयाची चेन्नई सुपर किंग संघाच्या खेळाडूंना देखील माहिती दिली असल्याची माहिती आहे. बेन स्टोक्सला आपल्या ताफ्यात घेण्यासाठी चेन्नई सुपर किंग संघाने तब्बल 16 कोटी 25 लाख रुपये मोजले. महेंद्रसिंग धोनीच्या चाहत्यांसाठी ही वाईट बातमी असली तरी देखील महेंद्रसिंग धोनी हा नेहमी संघाच्या फायद्याचा विचार करत आलेला आहे. आणि म्हणूनच, तो बेन स्टोक्सच्या नेतृत्वात खेळण्यासाठी तयार आहे.

हे देखील वाचाIND vs BAN: बाद झाल्यानंतर विराट कोहलीचा राग अनावर, थेट या खेळाडूला दिली आय-माय वरून शिवी; पाहा व्हिडिओ..

Hardik Pandya: हार्दिक पांड्याने नाकारली कॅप्टन पदाची ऑफर; कारणही आले समोर..

Mahesh Mote News: रिल्स स्टार महेश मोटे याचा कार अपघातात मृत्यू..

FIFA world cup final: अर्जेंटिना जिंकताच तरुणी झाली पूर्णपणे उघडी; पाहा व्हिडिओ..

IPL Auction 2023: वीरेंद्र सेहवागचा भाचा मालामाल, या संघाने मोजले तब्बल इतके कोटी; या विभागात आहे विराट कोहलीचाही बाप..

Gautami Patil: म्हणून होतेय गौतमी पाटीलवर बंदी घालण्याची मागणी; हे दोन व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल ही डान्स नाही तरुणांना करतेय उत्तेजित..

Relationship Tips: बॉयफ्रेंडची आठवण आल्यावर मुली करतात ह्या घाणेरड्या गोष्टी..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.