PMGKAY: मोफत रेशनच्या नियमात सरकारने केला मोठा बदल; आता रेशन मिळणार इतके..

0

PMGKAY: रेशन कार्ड (Ration Card) हे गरिबांचं पोट भरण्याचचं मोठं साधन आहे. वर्षानुवर्ष देशातील गरीब जनता रेशन कार्डच्या माध्यमातून अनेक सरकारी योजनांचा (government yojana) लाभ घेते. मात्र आता रेशन कार्डधारकांसाठी केंद्र सरकारकडून (central government) मोठी अपडेट देण्यात आले आहे. कोरोनाच्या काळात 2020 मध्ये केंद्र सरकारने पंतप्रधान गरीब कल्याण योजनेच्या (PMGKAY) माध्यमातून देशातील गरजू आणि गरीब जनतेला मानसी पाच किलो धान्य देण्यात येत होतं. मात्र आता या नियमांमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. (PMGKAY Scheme Extended)

पंतप्रधान गरीब कल्याण योजना (pradhanmantri Garib Kalyan Anya Yojana) ही सप्टेंबर 2022 पर्यंत राबविण्यात येणार होती, मात्र सप्टेंबरमध्ये ही योजना अतिरिक्त तीन महिने वाढवण्यात आली. त्यानंतर पंतप्रधान गरीब कल्याण योजना 31 डिसेंबर 2022 पर्यंत राबवण्याचा निर्णय केंद्र सरकारकडून घेतला. मात्र आता या योजनेत मोठा बदल झाला आहे. केंद्र सरकारकडून पंतप्रधान गरीब कल्याण ही योजना आता एका वर्षासाठी वाढवण्यात आली असून या योजनेचा कालावधी 31 डिसेंबर 2023 करण्यात आला आहे. (PMGKAY Scheme Extended 2023)

केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे देशातील गरीब जनतेला आता उपासमारीची वेळ येणार नसल्याचे चित्र आहे. देशातील गरीब जनतेसाठी केंद्र सरकारने ही नवीन वर्षाची भेट दिली असून, राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत आता केंद्र सरकार 80 कोटी जनतेला मोफत धान्य देण्याचा निर्णय मंत्रिमंडळात घेण्यात आला आला आहे. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे केंद्र सरकारच्या तिजोरीवर तब्बल 2 लाख कोटीचा बोजा पडणार आहे.

किती गहू आणि तांदूळ मिळणार

केंद्र सरकारच्या योजनेअंतर्गत आता दर महिन्याला मानसी पाच किलो धान्य दिले जाणार आहे. यामध्ये दोन किलो तांदूळ आणि 3 किलो गहू असं स्वरूप असणार आहे. त्याचबरोबर अंत्योदय योजनेअंतर्गत प्रत्येक कुटुंबाला दर महिन्याला 35 किलो धान्य देखील मिळते. मात्र हे धान्य तीन रुपये किलो प्रमाणे तांदूळ आणि दोन रुपये किलो गहू अशा पद्धतीने धान्याचे वाटप केले जाते. पंतप्रधान करीत कल्याण योजनेअंतर्गत मिळणाऱ्या धान्य खरेदीसाठी जनतेला एकही रुपया खर्च येणार नाही.

रेशन कार्ड बंधनकारक

केंद्र सरकारने पंतप्रधान गरीब कल्याण योजनेची मुदत एक वर्षाकरिता वाढवली असली, तरी या योजनेत बदल करण्यात आला आहे. ज्या लोकांकडे रेशन कार्ड असेल अशाच लोकांना आता या योजनेच्या माध्यमातून मोफत रेशन मिळणार आहे. पंतप्रधान गरीब कल्याण योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर तुमच्याकडे आता रेशन कार्ड असणे बंधनकारक असल्याचे म्हटलं गेलं आहे. याबरोबरच बोगस रेशन कार्डधारकांवर देखील कारवाई केली जाणार आहे. सरकारने आता या संदर्भात पावले उचलली असून, अशा रेशनकार्ड धारकांवर कठोर कारवाई देखील करण्यात येणार आहे.

हे देखील वाचा Ration Card: रेशन घेतल्याचा SMS तुम्हाला येतो का? SMS द्वारे कळतंय दरमहा किती रेशन घेतले, जाणून घ्या लगेच..

IND vs BAN: बाद झाल्यानंतर विराट कोहलीचा राग अनावर, थेट या खेळाडूला दिली आय-माय वरून शिवी; पाहा व्हिडिओ..

Hardik Pandya: हार्दिक पांड्याने नाकारली कॅप्टन पदाची ऑफर; कारणही आले समोर..

FIFA world cup final: अर्जेंटिना जिंकताच तरुणी झाली पूर्णपणे उघडी; पाहा व्हिडिओ..

Kiara Advani: पायावर पाय टाकताना कियारा अडवाणीचं सगळंच दिसलं; पाहा व्हिडिओ..

CR Recruitment 2022: दहावी पास उमेदवारांसाठी सेंट्रल रेल्वेत हजारो पदांची मेगा भरती; असा करा ऑनलाईन अर्ज..

IPL 2023: आयपीएल 2023 मध्ये धोनीच देणार आहे बेन स्टोक्सकडे कर्णधारपद; सीईओ काशी विश्वनाथ यांनी केले स्पष्ट

Male fertility Facts: या वयानंतर पुरुषांचे स्पर्म येते संपुष्टात; जाणून घ्या मुल जन्माला घालण्याचे पुरुषांचे योग्य वय..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.