Ration Card: रेशनकार्ड मिळणार आता एका आठवड्यात; जाणून घ्या सर्व डिटेल्स अर्जासहित..

0

Ration Card: रेशन कार्ड (ration Card) हे सर्वसामान्य आणि गरीबाच्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. रेशन कार्डच्या माध्यमातून सरकारच्या अनेक योजनांचा (government yojana) लाभ घेता येतो. एवढेच नाही, तर रेशन कार्डधारकांना सरकारकडून स्वस्त धान्य देखील वाटप केले जाते. कोरोनाच्या काळामध्ये केंद्र सरकारकडून कुटुंबातील प्रत्येकाला पाच किलो मोफत धान्य वाटप करण्यात आलं. आता ही योजना एका वर्षासाठी आणखी वाढवण्यात आली आहे. मात्र आता या योजनेत बदल करण्यात आला असून, ज्या नागरिकाकडे रेशन कार्ड आहे. अशांना आता या योजनेचा लाभ घेता येणार आहे. (Pantpradhan Garib Kalyan Yojana)

अजूनही देशातल्या गरीब जनतेकडे रेशन कार्ड नसल्याचे निदर्शनास आलं आहे. जर तुमच्याकडे देखील रेशन कार्ड नसेल, आणि तुम्ही रेशन कार्ड काढू इच्छित असाल, तर तुम्हाला आता शासकीय कार्यालयामध्ये चक्रा घालण्याची काहीही आवश्यकता नाही. पूर्वी रेशनकार्ड काढण्यासाठी तुम्हाला तहसीलमध्ये अनेक हेलपाटे घालावे लागत होते. अधिकाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरे दिल्याने सर्वसामान्यांची खूप मोठ्या प्रमाणात पिळवणूक व्हायची. साहजिकच या सगळ्यांचा मानसिक त्रास होत असताना अनेकजण रेशन कार्ड काढण्याच्या भानगडीत पडत नसल्याचे देखील दिसून येत होतं.

मात्र आता तुम्हाला रेशन कार्ड काढण्यासाठी किंवा रेशन कार्डमध्ये नवीन सदस्यांचं नाव समाविष्ट करण्यासाठी शासकीय कार्यालयात जाण्याची अजिबात आवश्यकता नाही. तुम्ही ऑनलाईन अर्ज करून नवीन रेशन कार्ड किंवा नवीन सदस्याचे नाव रेशन कार्डमध्ये समाविष्ट करू शकता. विशेष म्हणजे, तुम्ही केलेल्या अर्जाची स्थिती देखील तुम्ही ऑनलाइन तपासू शकता. चला तर मग जाणून घेऊया सविस्तर.

रेशनकार्ड काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे

रेशन कार्ड काढण्यासाठी तुम्हाला काही कागदपत्रांची आवश्यकता असणार आहे, आपण ते देखील जाणून घेऊ. ऑनलाईन अर्ज करताना तुम्हाला खालील कागदपत्रे जवळ ठेवणे आवश्यक आहे. ही कागदपत्रे फोटोच्या माध्यमातून सबमिट करून तुम्हाला अर्ज करायचा आहे. आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन, पॅन कार्ड, पासपोर्ट साईज फोटो, उत्पन्नाचा दाखला, रहिवाशी दाखला, लाईट बिल, गॅस बुक, बॅग स्टेटमेंट किंवा पासबुक. या कागदपत्रांपैकी काही कागदपत्रे तुम्हाला लागणार आहेत.

असा करा ऑनलाईन अर्ज

नवीन रेशन कार्ड काढण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईल मधील क्रोमवर जाऊन mahafood.gov.in असं सर्च करायचं आहे. यानंतर तुमच्यासमोर महाराष्ट्र राज्याची अन्न व नागरी पुरवठा विभागाचे (Food and Civil Supplies Department) अधिकृत वेबसाईट ओपन होईल. ही वेबसाईट ओपन झाल्यानंतर, तुम्हाला ‘Apply online for ration card’ या पर्यायावर क्लिक करायचं आहे. या पर्यावर क्लिक केल्यानंतर, तुम्हाला काही ओळखपत्र म्हणून पुरावख द्यावा लागणार आहे. यामध्ये आधार कार्ड/ मतदार ओळखपत्र/पासपोर्ट/ ड्राइव्हिंग लायसन्स या कागदपत्रांपैकी तुम्हाला एक ओळखपत्र सबमिट करावं लागणार आहे.

यासाठी तुम्हाला पाच रुपयांपासून 45 रुपयांपर्यंत अर्ज शुल्क आकारला जाईल. अर्ज भरल्यानंतर, तुम्ही हे अर्ज शुल्क जमा केल्यानंतर तुम्ही अर्जं सबमिट करणे आवश्यक आहे. ‘फीड व्हेरिफिकेशन’ झाल्यानंतर तुम्हाला ‘रेशन कार्ड’ मिळणार आहे. तुम्ही केलेल्या अर्जाची स्थिती देखील तुम्हाला ऑनलाईन पाहता येणार आहे. अर्जामध्ये काही त्रुटी आढळल्यास त्याची पूर्तता करून अर्जाची स्थिती तपासू शकता. आपण ते देखील सविस्तर जाणून घेऊ.

असा तपासा अर्जाचा स्टेट्स

जर तुम्ही नवीन रेशन कार्डसाठी अर्ज केला असेल, आणि तुम्हाला रेशन कार्ड मिळालं नाही. तर तुम्ही केलेल्या अर्जाची स्थिती देखील तुम्हाला तपासता येणार आहे. त्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईल मधील क्रोमवर जाऊन mahafood.gov.in असं सर्च करायचं आहे. त्यानंतर अन्न व पुरवठा विभागाची अधिकृत वेबसाईट ओपन होईल. नंतर तुम्हाला ‘Citizen Corner’ या पर्याय क्लिक करायचं आहे.

यानंतर तुम्हाला ‘Track Food Security Application’ या पर्यायावर क्लिक करायचं आहे. यानंतर तुमच्या समोर चार पर्याय ओपन होतील. त्यापैकी तुम्हाला संबंधित एक पर्याय भरायचा आहे. नंतर तुम्ही तुमच्या नवीन रेशन कार्डसाठी केलेल्या ऑनलाईन अर्जाची स्थिती तपासू शकतात. यापेक्षा अधिक सोपी आणि सविस्तर माहिती हवी असेल, तर यावर क्लिक करा

हे देखील वाचाRation Card: रेशन घेतल्याचा SMS तुम्हाला येतो का? SMS द्वारे कळतंय दरमहा किती रेशन घेतले, जाणून घ्या लगेच..

IND vs SL: मोठा निर्णय! ऋषभ पंत, केएल राहुलला टी-20 संघातून डच्चू; इशान किशन संजू सॅमसनला पूर्व वेळ संधी..

Hardik Pandya: हार्दिक पांड्याने नाकारली कॅप्टन पदाची ऑफर; कारणही आले समोर..

IND vs BAN: बाद झाल्यानंतर विराट कोहलीचा राग अनावर, थेट या खेळाडूला दिली आय-माय वरून शिवी; पाहा व्हिडिओ..

PMGKAY: मोफत रेशनच्या नियमात सरकारने केला मोठा बदल; आता रेशन मिळणार इतके..

FIFA world cup final: अर्जेंटिना जिंकताच तरुणी झाली पूर्णपणे उघडी; पाहा व्हिडिओ..

Yamaha RX100: बुलेटला टक्कर देण्यासाठी Yamaha RX100 झाली सज्ज; जाणून घ्या किंमत लूक आणि फिचर्स..

Kiara Advani: पायावर पाय टाकताना कियारा अडवाणीचं सगळंच दिसलं; पाहा व्हिडिओ..

CR Recruitment 2022: दहावी पास उमेदवारांसाठी सेंट्रल रेल्वेत हजारो पदांची मेगा भरती; असा करा ऑनलाईन अर्ज..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.