PM Kusum Yojana: आता मागेल त्याला दिला जाणार सौर पंप; जाणून घ्या सौर पंप मिळवण्याची संपूर्ण प्रक्रिया..

0

PM Kusum Yojana: देशातील शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी यासाठी केंद्र सरकारकडून पंतप्रधान कुसुम सोलार योजना (PM Kusum Yojana) राबवण्याचा निर्णय घेतला. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्याला सौर पंप देण्याचं काम केलं जातं. केंद्र त्याचबरोबर राज्य सरकार (central government and state government skim) मिळून या योजनेसाठी शेतकऱ्यांना अर्थसहाय्य करतात. आता या योजनेचा लाभ घेण्यासाठी देशातील कोणता शेतकरी अर्ज करू शकतो? त्याचबरोबर या योजनेचे स्वरूप काय आहे? जाणून घेऊया सविस्तर.

या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना तीन एचपी त्याचबरोबर पाच आणि साडेसात एचपीचे सौर पंप (Solar pump) देण्याचं काम केलं जातं. तीनही एचपी पंपाचा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना वेगवेगळ्या अटी आणि शर्ती पूर्ण कराव्या लागतात. एचपी नुसार पंपाची किंमत ठरविण्यात आली आहे. कोणत्या पंपाला किती रक्कम भरावी लागते? तसेच कोणत्या पंपाची किती किंमत आहे? जाणून घेऊया सविस्तर. 

3HP पंपाची किंमत 1 लाख 93 हजार 803 रुपये आहे. 5 HP पंपाची किंमत 2 लाख 69 हजार रूपये आहे. तर 7.5 पंपाची किंमत 3 लाख 74 हजार 402 रुपये आहे. आता तुम्हाला या पंपाचा लाभ घेण्यासाठी कॅटेगिरी नुसार अनुदान दिलं जातं. जर तुम्ही अनुसूचित जाती जमाती या प्रवर्गातून अर्ज करत असाल, तर तुम्हाला 95 टक्के अनुदान दिले जाते. जर तुम्ही ओपन या कॅटेगिरीतून अर्ज करणार असाल, तर तुम्हाला 90% अनुदान दिलं जातं. अनुदाना व्यतिरिक्त जी रक्कम आहे, ती रक्कम तुम्हाला लाभार्थी हिस्सा म्हणून भरणे आवश्यक आहे.

असं मिळतं अनुदान

3HP: जर तुम्ही सर्वसाधारण या प्रवर्गातून येत असाल, आणि तुम्हाला तीन एचपी पंप हवा असेल, तर तुम्हाला हिस्सा म्हणून 19,380 रुपये भरणे आवश्यक आहे. जर तुम्ही एससी/एसटी या कॅटेगिरी मधून अर्ज करणार असाल, तर तुम्हाला हिस्सा म्हणून 9,690 रुपये भरावे लागणार आहेत.

5 HP: 5 HP पंपाची किंमत 2 लाख 69 हजार आहे. जर तुम्हाला 5 HP पंप हवा असेल, आणि तुम्ही ओपन कॅटेगरी मधून अर्ज करणार असाल, तर तुम्हाला हिस्सा म्हणून 26 हजार 975 रुपये भरावे लागणार आहेत. जर तुम्ही एससी आणि एसटी या प्रवर्गातून अर्ज करू इच्छित असाल, तर तुम्हाला 13,488 रुपये भरावे लागणार आहेत.

7.5 HP पंप: 7.5 पंपाची किंमत 3 लाख 74 हजार 402 रुपये आहे. जर तुम्हाला पंतप्रधान कुसुम सोलार योजनेच्या माध्यमातून या कृषी पंपाचा लाभ घ्यायचा असेल, तर तुम्हाला 37,440 रुपये हिस्सा म्हणून भरावे लागणार आहेत. ही रक्कम सर्वसाधारण या प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी आहे. जर तुम्ही एससी आणि एसटी या प्रवर्गातून अर्ज करणार असाल, तर तुम्हाला लाभार्थी हिस्सा म्हणून 18,720 रुपये भरावे लागणार आहे.

आता आपण कोणता शेतकरी योजनेचा लाभ घेऊ शकतो हे जाणून घेऊ.

जर तुमच्याकडे अडीच एकर किंवा त्यापेक्षा जास्त जमीन असेल, तर तुम्हाला ‘तीन एचपी पंप’ या योजनेच्या माध्यमातून दिला जातो. जर तुमच्याकडे पाच एकर पर्यंत जमीन असेल, तर तुम्हाला ‘पाच एचपी’ चा पंप दिला जातो. जर तुम्हाला पाच एकर पेक्षा जास्त जमीन असेल, तर तुम्हाला ‘7.5 एचपीचा’ पंप या योजनेच्या माध्यमातून दिला जातो. आता आपण या योजनेत पात्र होण्यासाठी शेतकऱ्यांना कोणते निकष पूर्ण करणे आवश्यक आहे? सोबतच कागदपत्राची काय पूर्तता करणे गरजेचे आहे? जाणून घेऊया सविस्तर.

जर तुमच्याकडे वीज कनेक्शन नसेल, तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता. या सोबतच जर तुमच्याकडे शेततळे त्याचबरोबर विहीर, बोरवेल, ओढा, नदी या शेजारी शाश्वत पाण्याचा स्त्रोत असेल, तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येतो. सोबतच यापूर्वी तुम्हाला अटल सौर कृषी पंप योजना, त्याचबरोबर मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेचा लाभ घेतलेला नसणे देखील गरजेचे आहे. आता आपण योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना कोणकोणती कागदपत्रे सबमिट करायची आहेत जाणून घेऊया.

पंतप्रधान कुसुम सोलार योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला काही कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक आहे. यामध्ये सातबारा उतारा, या उताऱ्यावर विहिरीची किंवा बोरवेलची नोंद असणे गरजेचे आहे. जर तुमचा सातबारा सामायिक असेल, तर तुम्हाला इतर संबंधित उताऱ्यावरील शेतकऱ्यांचे ना हरकत प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. आधारकार्ड, जातीचा दाखला, बँक पासबुक, पासपोर्ट आकाराचे फोटो इत्यादी कागदपत्र तुमच्याकडे असणे आवश्यक आहे.

योजनेसाठी नोंदणी

आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन नोंदणी कशी करायची? हे माहीत नसेल, तर आपण हे देखील सोप्या भाषेत जाणून घेऊ. योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम तुम्ही तुमच्या मोबाईल मधील क्रोम वर जाऊन mahaurja.com असं सर्च करायचं आहे. नंतर तुमच्यासमोर “महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरचण” ही अधिकृत वेबसाईट ओपन होईल.

ही वेबसाईट ओपन झाल्यानंतर, तुम्हाला उजव्या साईटला “महाकृषी ऊर्जा अभियान कुसुम सौर कृषी पंप अर्ज नोंदणी” हा पर्याय पाहायला मिळेल, तुम्हाला बरोबर यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर उजव्या बाजूला “सिलेक्ट लैंग्वेज” हा पर्याय तुम्हाला निवडायचा आहे. अर्थात तुम्ही मराठी भाषा निवडल्यानंतर, “लाभार्थी नोंदणी” हा पर्याय तुमच्यासमोर ओपन होईल.

लाभार्थी नोंदणी हा पर्याय ओपन झाल्यानंतर, तुम्हाला सध्या तुम्ही डिझेल पंप वापरात आहात का? या प्रश्नाचे उत्तर द्यायचे आहे. वापरत असाल तर होय, नसाल तर नाही असा तपशील तुम्हाला भरायचा आहे. यामध्ये तुम्हाला तुमचा पंप किती क्षमतेचा आहे? वर्षाला किती लिटर डिझेल लागतं. असे उपप्रकार देखील तुम्हाला भरायचे आहेत.

इथपर्यंत तुम्ही सविस्तर माहिती भरल्यानंतर, तुम्हाला “अर्जदाराची वैयक्तिक व जमीन विषयक माहिती” या पर्यायावर क्लिक करून, सविस्तर माहिती भरायची आहे. यामध्ये तुम्हाला आधार कार्ड नंबर त्याचबरोबर जिल्हा, तालुका, गाव, मोबाईल क्रमांक, जात वर्गवारी इत्यादी प्रकार निवडून सविस्तर माहिती भरावी लागणार आहे.

इथपर्यंत व्यवस्थित माहिती भरल्यानंतर, तुम्हाला तुमच्या जिल्ह्यामधील सौर पंपाचा कोटा संपला असेल, तर तशा सूचना तुमच्या समोरील स्क्रीनवर पाहायला मिळतील. मात्र जर कोटा उपलब्ध असेल, तर मात्र तुम्ही “ऑनलाईन अर्जासाठी भरणा” या पर्याय क्लिक करायचं आहे. तुम्ही या पर्यायावर क्लिक केल्यानंतर, तुम्हाला तुमच्या जिल्ह्यामध्ये असणाऱ्या पंपाचा तपशील त्याचबरोबर तुम्ही कोणत्या कॅटेगिरीतून अर्ज करणार आहे, त्या कॅटेगिरीत किती कोटा शिल्लक आहे? हे देखील सांगितलं जाईल. हे सविस्तर वाचल्यानंतर तुम्हाला “लाभार्थी हिस्सा भरण्याची प्रक्रिया” या पर्याय क्लिक करायचा आहे.

“लाभार्थी हिस्सा भरण्याची प्रक्रिया” या पर्यायावर क्लिक केल्यानंतर, तुम्हाला एक “ट्रांजेक्शन आयडी” दिला जाणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला नोंदणी फी म्हणून शंभर रुपये देखील भरायचे आहेत. यापुढे गेल्यानंतर, तुम्हाला पेमेंट करण्याचे अनेक पर्याय पाहायला मिळतील. यामध्ये तुम्हाला तुमचं नाव, पत्ता, त्याचबरोबर फोन नंबर इत्यादी माहिती टाकायची आहे. ही माहिती तुम्ही सबमिट केल्यानंतर, मग पेमेंट करायचं आहे. पेमेंट झाल्याचा मेसेज तुम्हाला स्क्रीनवर पाहायला मिळेल. यानंतर तुमच्या मोबाईलवर युजरनेम त्याचबरोबर पासवर्ड पाठवला जाईल. इत्यादी माहिती सविस्तर भरल्यानंतर, तुमची नोंदणी पूर्ण होणार आहे.

पीएम कुसुम सोलार योजनेचा लाभ घेण्यासाठी केलेली प्रक्रिया प्राथमिक स्वरूपात झाली. यापुढे तुम्हाला जर तुमच्या जिल्ह्यामध्ये कोटा उपलब्ध झाला, तर तुम्हाला एसएमएस द्वारे सांगण्यात येतं. पुढे तुम्हाला अर्जदाराची संपूर्ण माहिती सबमिट करणे, त्याचबरोबर कोटेशन लाभार्थी हिस्सा स्वीकारणं, त्याचबरोबर पंपाची कंपनी सिलेक्ट करणं, आणि नंतर सौर पंप वाटप करणे, इत्यादी प्रक्रिया राबवली जाते. अशी माहिती या वेबसाईटवर देण्यात आली आहे.

या योजनेविषयी तुम्हाला काही माहिती किंवा तक्रार असेल, तर तुम्ही 020-3500 0450 या टोल फ्री क्रमांकवर कॉल करून देखील माहिती घेऊ शकता.

हे देखील वाचा PMGKAY: मोफत रेशनच्या नियमात सरकारने केला मोठा बदल; आता रेशन मिळणार इतके..

Shikhar Dhawan: मिस्टर आयसीसीचे करिअर संपुष्टात; BCCI ने संपवलं शिखर धवनचे करिअर..

IND vs SL: केएल राहुलचा व्हाईट बॉलमधून सुपडा साप; हार्दिकच्या नेतृत्वात भारतीय टीमचा बदलला चेहरा मोहरा..

Sajid Khan: साजिद खानचे काळे कारनामे उघड, प्रसिद्ध अभिनेत्रीच्या पँटमध्ये हात घालून करायचा..; पहा व्हिडिओ 

Sushant Singh Rajput: सुशांत सिंगच्या शरीरावर होत्या विचित्र खुणा, सुशांतची हत्या होऊनही डॉक्टरांनी मला..; पोस्टमार्टम करणाऱ्याने सांगितले त्या रात्री काय घडलं..

India Squad SL Series: टी-ट्वेंटीत हार्दिकचे राज्य सुरू, विराट रोहित राहुल पंतला बाय बाय; हकालपट्टीचं कारण BCCI कडून स्पष्ट..

Relationship Tips: संबंध करताना या 5 गोष्टींतून कळते तुमचा पार्टनर मनापासून साथ देतोय का..

​​IOCL Recruitment 2022-23: या उमेदवारांसाठी इंडियन ऑइलमध्ये दीड हजारांहून अधिक पदांची मेगा भरती..

CR Recruitment 2022: दहावी पास उमेदवारांसाठी सेंट्रल रेल्वेत हजारो पदांची मेगा भरती; असा करा ऑनलाईन अर्ज..

Electric Bike: स्मार्टफोनच्या पैशात मिळतेय ही तगडी इलेक्ट्रिक बाईक; जाणून घ्या डिटेल्स..

Ration Card: रेशनकार्ड मिळणार आता एका आठवड्यात; जाणून घ्या सर्व डिटेल्स अर्जासहित..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.