India Squad SL Series: टी-ट्वेंटीत हार्दिकचे राज्य सुरू, विराट रोहित राहुल पंतला बाय बाय; हकालपट्टीचं कारण BCCI कडून स्पष्ट..
India Squad SL Series: ट्वेंटी-ट्वेंटी आणि तीन एक दिवसीय सामने खेळण्यासाठी श्रीलंकेचा संघ भारतीय दौऱ्यावर येणार आहे. (Srilanka tour of India) हा दौरा छोटा असला तरी गेल्या काही महिन्यांपासून भारतीय संघामध्ये कोणकोणते नवीन बदल होणार हे जाणून घेण्याची अनेकांची उत्सुकता होती. अखेर काल रात्री टी-20 आणि एकदिवसीय संघातचे संघ जाहीर करण्यात आले असून, यात धक्का देणारे अनेक बदल करण्यात आले आहेत. (India Squad announced for Sri Lanka series)
सलग दोन टी-ट्वेंटी विश्वचषकात (T20 World Cup) गुणवत्तेला साजेसा खेळ भारतीय संघाला (Indian cricket team) करता आला नाही. साहजिकच यामुळे भारतीय संघात अनेक बदल करण्यात येतील असं BCCI कडून स्पष्ट करण्यात आलं होतं. आगामी 2024 मध्ये होणाऱ्या T20 वर्ल्ड कपसाठी आत्तापासूनच भारतीय संघ तयारी करणार असून, 2024 मध्ये कोणते खेळाडू असणार याविषयी अभ्यास करून त्यांना अधिक-अधिक सामने खेळण्याची संधी मिळावी यासाठी बीसीसीने आता नवीन संघ उभा करण्याची तयारी केली.
आगामी 2024 मध्ये होणारा T20 विश्वचषक डोळ्यासमोर ठेवून, बीसीसीआयने (BCCI) श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या तीन T20 सामन्याच्या मालिकेसाठी संघ निवडला आहे. या संघातून रोहित शर्मा (rohit sharma) विराट कोहली (Virat Kohli) केएल राहुल (KL Rahul) ऋषभ पंत (Rishabh pant) यासारख्या अनेक दिग्गज खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. यापुढे आता टी-ट्वेंटी संघामध्ये या चार दिग्गजांना संधी दिली जाणार नाही. BCCI रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत या खेळाडूंना 2024 मध्ये होणाऱ्या विश्वचषकाच्या संघामध्ये पाहत नाही.
हार्दिक पांड्या आता यापुढे भारतीय टी-ट्वेंटी क्रिकेट संघाचा कर्णधार असणार आहे. Hardik Pandya announced T20 captain) रोहित शर्मा, विराट कोहली केएल राहुल, ऋषभ पंत, यांना कायमस्वरूपी बाहेरचा रस्ता दाखवला आहे. या खेळाडूंच्या जागी इशान किशन, संजू सॅमसन, शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, राहुल त्रिपाठी, दीपक हुड्डा, या नवीन खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. (Hardik Pandya was selected as the captain of the T20 cricket team)
टी-ट्वेंटी क्रिकेटमध्ये संधी देण्यात आलेल्या खेळाडूंचा खेळ फारच खराब राहिला, आणि दुसरीकडे विराट कोहली ऋषभ पंत यांनी आयपीएलमध्ये जबरदस्त कामगिरी केली तर या दोन खेळाडूंना संधी मिळू शकते. अन्यथा टी-ट्वेंटी क्रिकेटमध्ये निवडलेल्या नवीन खेळाडूंनी उत्तम खेळ केला, तर सीनियर खेळाडूंचं टी-ट्वेंटी मधील करिअर संपुष्टात आलं असल्याचं स्पष्ट झालं आहे.
टी-20 चा भारतीय संघ- हार्दिक पंड्या (कॅप्टन) (Hardik Pandya) सूर्यकुमार यादव (उपकर्णधार) (suryakumar Yadav) इशान किशन (wk) (Ishan Kishan) संजू सॅमसन (sanju Samson) रुतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) शुभमन गिल (Shubman Gill) राहुल त्रिपाठी (Rahul Tripathi) वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar) दीपक हुडा Deepak Hooda युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) अक्षर पटेल (Axar Patel) हर्षल पटेल (Harshal Patel) उमरान मलिक (Umran Malik) मुकेश कुमार (Mukesh Kumar) अर्शदीप सिंग (Arshdeep Singh) शिवम मावी (Shivam Mavi)
वनडेचा भारतीय संघ- रोहित शर्मा (कर्णधार) (Rohit Sharma) हार्दिक पंड्या (Hardik Pandya) विराट कोहली (Virat Kohli) शुभमन गिल Shubman Gill, सूर्यकुमार यादव, Suryakumar Yadav श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) केएल राहुल (KL Rahul) इशान किशन (Ishan Kishan) वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar) युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) कुलदीप यादव (Kuldeep Yadav) अक्षर पटेल (Axar Patel) शमी (Mohammad Shami) मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) उमरान मलिक (Umran Malik) अर्शदीप (Arshdeep Singh)
हे देखील वाचाIND vs SL: मोठा निर्णय! ऋषभ पंत, केएल राहुलला टी-20 संघातून डच्चू; इशान किशन संजू सॅमसनला पूर्व वेळ संधी..
Relationship Tips: संबंध करताना या 5 गोष्टींतून कळते तुमचा पार्टनर मनापासून साथ देतोय का..
IOCL Recruitment 2022-23: या उमेदवारांसाठी इंडियन ऑइलमध्ये दीड हजारांहून अधिक पदांची मेगा भरती..
Yamaha RX100: बुलेटला टक्कर देण्यासाठी Yamaha RX100 झाली सज्ज; जाणून घ्या किंमत लूक आणि फिचर्स..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम