MSRTC Recruitment 2023: दहावी पास उमेदवारांसाठी एसटी महामंडळात निघाली मोठी भरती; जाणून घ्या सर्व डिटेल्स..

0

MSRTC Recruitment 2023: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) अंतर्गत काही रिक्त पदांसाठी भरती केली जाणार असून, इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांचे अर्ज मागविण्यात आले आहेत. या संदर्भातली अधिसूचना जारी करण्यात आली असून, ही भरती अहमदनगर विभागात करण्यात आली आहे. भरतीसाठी उमेदवारांना आपल्या अर्जाची नोंदणी ऑनलाइन तर अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने सबमिट करायचा आहे. जाणून घेऊया या भरती संदर्भात सविस्तर माहिती. (MSRTC Recruitment)

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अंतर्गत अहमदनगर विभागांमध्ये (Ahmednagar division) हे एकूण पास 64 रिक्त जागा भरण्यात येणार असून यासाठी उमेदवारांना 5 जानेवारी अर्ज करण्याची शेवटची तारीख निश्चित करण्यात आली आहे. या भरतीसाठी उमेदवाराच्या शैक्षणिक पात्रता काय आहे? त्याचबरोबर कोणत्या विभागात ही भरती केली जाणार आहे? जाणून घेऊया सविस्तर. (MSRTC Bharti)

पदाचे नाव/ शैक्षणिक पात्रता

मेकॅनिकल मोटार व्हेईकल” या पदासाठी 24 रिक्त पदे भरण्यात येणार असून, यासाठी उमेदवारांची शैक्षणिक पात्रता ही दोन वर्षाच्या शासन मान्यता प्राप्त आयटीआय उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. सोबतच माध्यमिक शाळेचे प्रमाणपत्र त्याचबरोबर झालेलं प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रे उमेदवारांकडे असणे आवश्यक आहेत.

ऑटो इलेक्ट्रीशियन: या पदासाठी उमेदवारांची शैक्षणिक पात्रता ही दोन वर्षाचा शासन मान्यता असणारा आयटीआय उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. सोबतच माध्यमिक शाळेचे दहावीचे उत्तीर्ण प्रमाणपत्र असणे देखील आवश्यक आहे. ऑटो इलेक्ट्रिशन या पदासाठी एकूण 10 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.

मोटर व्हेईकल बॉडी बिल्डर: या पदासाठी एकूण दहा रिक्त जागा भरण्यात येणार आहेत या पदासाठी उमेदवाराच्या शैक्षणिक पात्रतेविषयी जाणून घेतले उमेदवारांचा आयटीआय हा कोणत्याही मान्यता प्राप्त शिक्षण संस्थेतून झाला पाहिजे. माध्यमिक शाळेचे प्रमाणपत्र एसएससी उत्तीर्ण असलेले असणं आवश्यक आहे.

पेंटर पाच जागा, वेल्डर 05 पदे, डिझेल मेकॅनिक 06 पदे, इंजिनीरिंग ग्रॅज्युएट 02 पदे, अकाउंटन्सी आणि ऑडिटिंग 02 पदे या सर्व उमेदवारांसाठी उमेदवारांच्या शैक्षणिक पात्रतेचा विचार करायचा झाल्यास, उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त शिक्षण मंडळातून दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच शासनमान्य आयटीआय उत्तीर्ण प्रमाणपत्र उमेदवारांकडे असणे आवश्यक आहे.

पगार

मेकॅनिक मोटर व्हेईकल: या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना 10 हजार 27 रुपये दरमहा पगार दिला जाणार आहे. ऑटो इलेक्ट्रीशियन: या पदावर निवड झालेल्या उमेदवारांना 10 हजार 27 रुपये दरमहा पगार असणार आहे. मोटर व्हेईकल बॉडी बिल्डर: या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना 8 हजार 913 रुपये पगार दिला जाणार आहे.

पेंटर: या पदासाठी निवड केलेल्या उमेदवारांना 10 हजार 27 रुपये दरमहा पगार दिला जाणार आहे. वेल्डर: या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांसाठी 8 हजार 913 रुपये पगार दिला जाणार आहे. डिझेल मेकॅनिक: या पदासाठी 9 हजार पगार दिला जाणार आहे. इंजिनीरिंग ग्रॅज्युएट: या पदासाठी 8 हजार पगार दिला जाणार आहे. अकाउंटन्सी आणि ऑडिटिंग: या पदासाठी 7 हजार दरमहा पगार दिला जाणार आहे.

वयोमर्यादा आणि अर्ज शुल्क

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अहमदनगर विभागामध्ये करण्यात येणाऱ्या 64 रिक्त जागांसाठी उमेदवारांची वयोमर्यादा आणि अर्ज शुल्क निश्चित करण्यात आले आहे. या भरतीसाठी पात्र असाल तर तुमचे वय 18 ते 33 या दरम्यान असणे आवश्यक आहे. यामध्ये सरकारी नियमानुसार वयामध्ये सवलत दिली जाणार आहे. तुम्ही ओपन कॅटेगरीतून अर्ज करणार असाल तर तुम्हाला 590 रुपये अर्ज शुल्क आकारला जाणार आहे जर तुम्ही एसटी एससी कॅटेगिरीतून अर्ज करणार असलं तर तुम्हाला तीनशे रुपये अर्ज शुल्क आकारलं जाणार आहे.

या भरतीसाठी ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईल मधील क्रोमवर जाऊन msrtc.maharashtra.gov.in असं सर्च करणं आवश्यक आहे. नंतर तुमच्यासमोर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन विभागाची अधिकृत वेबसाईट ओपन होईल. त्यानंतर तुम्ही सविस्तर नोंदणी करू शकता. ही प्रक्रिया तुम्हाला किचकट वाटत असेल तर तुम्ही डायरेक्ट देखील अर्ज करू शकता त्यासाठी तुम्हाला यावर क्लिक करायचं आहे. https://www.apprenticeshipindia.gov.in/apprenticeship/opportunity

हे देखील वाचाMPSC Recruitment 2023: MPSC मार्फत या पदांसाठी हजाराहून अधिक जागांची मेगा भरती..

​​IOCL Recruitment 2022-23: या उमेदवारांसाठी इंडियन ऑइलमध्ये दीड हजारांहून अधिक पदांची मेगा भरती..

CR Recruitment 2022: दहावी पास उमेदवारांसाठी सेंट्रल रेल्वेत हजारो पदांची मेगा भरती; असा करा ऑनलाईन अर्ज..

Electric Bike: स्मार्टफोनच्या पैशात मिळतेय ही तगडी इलेक्ट्रिक बाईक; जाणून घ्या डिटेल्स..

PM Kusum Yojana: आता मागेल त्याला दिला जाणार सौर पंप; जाणून घ्या सौर पंप मिळवण्याची संपूर्ण प्रक्रिया..

PMGKAY: मोफत रेशनच्या नियमात सरकारने केला मोठा बदल; आता रेशन मिळणार इतके..

Virat Kohli: पुजाराने तीन वर्षानंतर शतक झळकावले, तरीही चर्चा विराटच्या सेलिब्रेशनची; काय केले विराटने, पाहा व्हिडिओ..

Relationship Tips: बॉयफ्रेंडची आठवण आल्यावर मुली करतात ह्या घाणेरड्या गोष्टी..

Wearing Bra While Sleeping: तुम्हीही ब्रा घालून झोपता? असाल तर त्वरीत थांबवा अन्यथा..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.