Sex Life Tips: सेक्स लाईफचा आनंद द्विगुणित करायचाय? फॉलो करा या चार गोष्टी..

0

Sex Life Tips: सेक्सबाबत समाजातली धारणा आता हळूहळू बदलत चालली आहे. विविध ठिकाणी सेक्सबाबत चर्चा केली जात आहे. सेक्सविषयी सखोल विचार केला जात आहे. सेक्स हा माणसाच्या जिवनातला एक महत्वाचा भाग आहे. त्यामुळे आपल्याला त्याबद्दल सविस्तर माहिती असणे आवश्यक आहे. सेक्स लाईफचा पुरेपुर आनंद घ्यायचा असेल, तर अगोदर निरोगी कसे राहता येईल यावर भर देणे गरजेचे आहे. कारण तुम्ही निरोगी असाल तरच सेक्सचा पुरेपुर आनंद घेऊ शकता.

सेक्सबद्दल काही चुकीच्या धारणा समाजात असल्यामुळे बर्‍याचदा सेक्स संबधित आजारांचा सामना करण्याची वेळ अनेकांवर येते. सेक्सबाबत गुप्तता पाळली जात असल्यामुळे सेक्स संबंधित आजाराबाबत सुद्धा गुप्ततेचं धोरण अवलंबिले जाते. परिणामी आजाराचा प्रभाव वाढत जातो आणि मग गंभीर समस्येला सामोरे जावे लागू शकते. साहजिकच भविष्यातील समस्येपासून दूर राहण्यासाठी सेक्स विषयी स्पष्ट बोलणं आवश्यक आहे. याशिवाय सेक्स संबंधित काही गोष्टी गांभीर्याने देखील घेतल्या पाहिजेत. महिलांच्या तुलनेत पुरुषांमध्ये सेक्स विषयी अधिक समस्या असल्याचं जाणवतं. तुमची लाईफस्टाईल आणि निरोगी आहार हे तुमच्या सेक्स लाईफमध्ये खूप म्हत्वाची भूमिका पार पाडतात.

सेक्सनंतर मोठ्याप्रमाणात थकवा येतो. बर्‍याचदा अशक्तपणा सुद्धा जाणवू लागतो. मात्र अशावेळी घाबरुन न जाता लगेच काही खाऊ नये. सेक्स झाल्यानंतर थोड्या वेळाने तुम्ही पाणी पिऊ शकता. तसेच दुध पिल्यास अतिशय उत्तमच. मात्र दुध किंवा पाणी पिताना घाई करु नये. सावकाश हळूहळू प्यावे. तसेच सेक्सनंतर जर तुम्ही फळे खाण्याच्या विचारात असाल तर तुम्ही चुकीचा विचार करताय. रात्रीच्या वेळी फळे खाणे योग्य नाही. त्यामुळे पोटाचे विकार तुम्हाला जडू शकतात.

सेक्स झाल्यानंतर लगेच लघवीला जावे की नाही? असा प्रश्न अनेकांना पडतो. मात्र काही तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार निरोगी सेक्स लाईफसाठी सेक्स झाल्यानंतर लघवीला गेलेच पाहिजे. कारण शरीरातील अनावाश्यक घटक तसेच जिवजंतू लघवी वाटे शरीराच्या बाहेर पडतात. सेक्स दरम्यान शरीरात निर्माण झालेल्या काही घटकांना सुद्धा शरीराबाहेर टाकणे फार गरजेचे असते. त्यामुळे सेक्स होताच, लघवीला जाणे फायदेशीर आहे. तसेच लघवी आल्यानंतर सुद्धा लघवीला जाणे टाळल्यास युरीनरी ईन्फेक्शन होण्याची शक्यता बळावते.

सेक्सअगोदर जेवण करावे की नाही? असा प्रश्न अनेकदा विचारला जातो. तज्ज्ञांच्या मते, सेक्स करण्याअगोदर जेवण करण्यास हरकत नाही. परंतू जेवण सहसा हलक्या स्वरुपाचे करावे. तसेच जेवणानंतर किमान दोन ते तीन तासानंतर सेक्स करावा. जेवण झाल्या-झाल्या लगेच सेक्स केल्यास काही समस्या उद्भवण्याच्या शक्यता असते. त्यामुळे सेक्स करण्याअगोदर जेवण करण्यास हरकत नाही. मात्र जेवणात हलके पदार्थ खावे तसेच सेक्स करण्याच्या किमान तीन तास अगोदर जेवण करुन घ्यावे.

सेक्स करतांना व सेक्स केल्यानंतर स्वच्छतेला विशेष महत्व देणे फार गरजेचे आहे. सेक्स करतांना शरीराच्या हालचालीचा वेग वाढतो. त्यामुळे शरीर घाम सोडू लागते. परिणामी अंगावरील कपडे त्या घामाने भिजतात. सेक्सनंतर थकवा येत असल्याने बर्‍याचदा तेच कपडे घालून आपण झोपी जातो. मात्र असे करणे चुकीचे आहे. सेक्स करतांना वापरण्यात आलेले कपडे स्वच्छ धुतल्याशिवाय वापरात घेऊ नये. त्यामुळे त्वचेशी संबंधित आजार होऊ शकतात. तज्ज्ञांच्या मते, सेक्सचा मुड बनवण्यात कपडे महत्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे न धुतलेले, अस्वच्छ कपडे वापरल्यास थेट जोडीदाराच्या मुडवर त्याचा परिणाम होत असल्याचे बघायला मिळू शकते.

सेक्सनंतर जोडीदारासोबतच झोपावे

सेक्स केल्यानंतर अनेकांना वेगळ्या जागी जाऊन झोपण्याची सवय असते. मात्र ही सवय त्यांच्या सेक्स लाईफवर परिणाम करु शकते. विशेषत: पुरुषांनी याची काळजी घेणे जरुरी आहे. सेक्स झाल्यानंतर थोडा वेळ आपल्या जोडीदारासोबत घालवला पाहिजे. त्यांना एकटे वाटणार नाही याची काळजी घेणे जरुरी आहे. त्यामुळे सेक्सनंतर मोबाईल बघत बसणे किंवा दुसरीकडे जाऊन झोपणे तुम्ही टाळले पाहिजे. सेक्सनंतर जोडीदारासोबत बोलले पाहिजे. परिणामी तुमची सेक्स लाईफ अधिक परिपूर्ण होऊन तुम्ही तिचा पुरेपुर आनंद घेऊ शकता.

सेक्स करताना या काही महत्वांच्या गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे. जेणेकरुन सेक्सशी संबंधित कुठलाही आजार तुम्हाला होणार नाही. परिणामी शरीर निरोगी राहिल्यास तुम्ही सेक्स लाईफचा पुरेपुर आनंद घेऊ शकाल. सेक्स लाईफमधील आनंदाला फार महत्व आहे. कारण सेक्स लाईफमधला आनंद हरवल्यास नैराश्य सुद्धा येऊ शकतं. त्यामुळे पुरुषांनी या काही गोष्टींची विशेष काळजी घेतली पाहिजे. जेणेकरुन आपला आनंद द्विगुणित करता येईल.

हे देखील वाचा Sex Mistakes: सेक्स केल्यानंतर चुकूनही करू नका हे काम अन्यथा..

Chanakya Niti: स्त्री-पुरुषांना लग्नापूर्वी या चार गोष्टी माहीत असायलाच हव्या अन्यथा..

Amruta fadnavis: मकर संक्रांतीच्या या शुभेच्छामुळे अमृता फडणवीस पुन्हा ट्रोल; पाहा व्हिडिओ..

Health Benefits of Sex: शारीरिक संबंधामध्ये अंतर पडल्यास या पाच गंभीर समस्या घेतात जन्म; जाणून घ्या महिन्यात किती वेळा सेक्स करणे आहे गरजेचे..

Benefits Of Foreplay: फोरप्लेमुळे दीर्घ काळ सेक्स आणि महिलांना मिळतो भरपूर आनंद; जाणून घ्या लैंगिक संबंधात याचे महत्व..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.