PM Kisan Maandhan Yojana: या योजनेअंतर्गत शेतकर्‍यांना सरकार देतंय दरमहा तीन हजार; जाणून घ्या लगेच..

0

PM Kisan Maandhan Yojana: भारत हा कृषिप्रधान ( agriculture) देश आहे. तरीही भारतातील शेतकरी (Indian farmers) अजूनही उपेक्षितच आहे. शेतकर्‍यांची अवस्था सुधारावी यासाठी सरकारकडून सुद्धा प्रयत्न केले जातात. अनेक प्रोत्साहनपर योजना राबवत शेतकर्‍यांना मदतीचा हात देण्याचा प्रयत्न केंद्र सरकारकडून सातत्याने केला जात आहे. अशाच एका योजनेची यामध्ये भर पडली आहे. ज्याअंतर्गत शेतकर्‍यांना महिन्याला ३००० रुपयांपर्यंतचे सहाय्य मिळणार आहे. जाणून घेऊया या योजनेविषयी सविस्तर.

पीएम किसान मानधन योजना असे या योजनेचे नाव आहे. अल्पभूधारक वृद्ध शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर ठेऊन ही योजना सुरु करण्यात आली आहे. बर्‍याचदा वय झाल्यानंतर शेतीची कामे करणे अवघड होऊन जाते. साहजिकच त्यामुळे उदरनिर्वाचा प्रश्न निर्माण होतो. वृद्ध शेतकर्‍यांची या अडचणीतून सुटका व्हावी हा या योजनेमागील उद्देश असून, केंद्र सरकार या योजनेअंतर्गत देशातील अनेक पात्र शेतकऱ्यांना दरमहा तीन हजार रुपये देते.

केंद्र सरकारच्या या योजनेअंतर्गत वृद्ध शेतकर्‍यांस ३००० रुपये महिना पेंशन स्वरुपात अर्थसहाय्य मिळणार आहे. वयाची साठी ओलांडताच शेतकर्‍याच्या खात्यात या योजनेचे पैसे येण्यास सुरुवात होईल. वय वर्ष १८ ते ४० दरम्यान या योजनेसाठी अर्ज करता येणार आहे. यानंतर शेतकर्‍यांना या योजनेसाठी वयाच्या ६० वर्षापर्यंत प्रिमीयम भरावा लागेल. ज्याची किंमत अगदी तुरळक ठेवण्यात आली आहे. जर तुम्ही १८ वर्षाचे असाल तर तुम्हाला दरमहा ५५ रुपये ३० वर्षाचे असल्यास ११० रुपये आणि ४० वर्षाचे असल्यास २०० रुपये प्रिमीयम भरावे लागणार आहे.

योजनेच्या पात्रतेचे निकष

दोन हेक्टरपर्यंत शेती असणार्‍या शेतकर्‍यांनाच या योजनेचा लाभ मिळवता येणार आहे. तसेच वय वर्ष १८ ते ४० दरम्यान वय असणारे शेतकरीच या योजनेसाठी अर्ज करु शकतात. शेतकर्‍यांचे नाव त्यांच्या राज्याच्या भूमी रेकॉर्डवर असणे अनिवार्य आहे. शेतकर्‍यांचे बॅंकेत खाते, जनधन खाते तसेच या खात्यांना आधार कार्डशी लिंक केलेले असावे. शेतकर्‍यांना वयाच्या ६० वर्षापर्यंत ५५ ते २०० रुपये प्रतिमहिना प्रिमीयम या योजनेअंतर्गत भरावा लागेल. पीएम किसान योजनेअंतर्गत हा प्रिमीयम भरला जाऊ शकतो. वयाच्या ६० वर्षानंतर या योजनेअंतर्गत पेंशन लाभार्थी शेतकर्‍ यांना दरमहा तीन हजार मिळण्यास सुरुवात होईल. तसेच लाभार्थ्यांचा मृत्यु झाल्यास, पती किंवा पत्नीस पारिवारिक पेंशन म्हणून ५० टक्के लाभ मिळू शकेल.

डॉक्टर, इंजिनिअर, वकिल, सरकारी कर्मचारी तसेच या प्रकारातल्या इतर लोकांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. याशिवाय ज्या शेतकर्‍यांचे मासिक उत्पन्न १५ हजारांपेक्षा अधिक आहे, अशा शेतकर्‍यांना सुद्धा या योजनेच्या लाभापासून वगळण्यात आले आहे. प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना तसेच राष्ट्रीय पेंशन योजनेच्या लाभार्थ्यांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळणार नाही.

कसा कराल अर्ज?

पीएम किसान मानधन योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया आम्ही तुम्हाला येथे सांगणार आहोत. सर्वप्रथम आधार कार्ड आणि बॅंक पासबूक घेऊन कॉमन सर्विस सेंटरवर या योजनेसाठी अर्ज करावा. अर्ज करण्याच्या प्रक्रियेदरम्यान सर्व माहिती भरुन झाल्यानंतर युनिक किसान पेंशन खाते क्रमांक निर्माण होईल. त्याआधारे तुम्ही पीएम किसान मानधन योजनेची पेंशन मिळवू शकाल.

हे देखील वाचा Sex Life Tips: सेक्स लाईफचा आनंद द्विगुणित करायचाय? फॉलो करा या चार गोष्टी..

Sex Mistakes: सेक्स केल्यानंतर चुकूनही करू नका हे काम अन्यथा..

Amruta fadnavis: मकर संक्रांतीच्या या शुभेच्छामुळे अमृता फडणवीस पुन्हा ट्रोल; पाहा व्हिडिओ..

Chanakya Niti: स्त्री-पुरुषांना लग्नापूर्वी या चार गोष्टी माहीत असायलाच हव्या अन्यथा..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.