Viral video: सापाची आणि माकडाची थरारक झुंज पाहून व्हाल थक्क; पाहा काय झाला शेवट..

0

इंटरनेटचा (internet) वापर विविध कामांसाठी केला जातो. तसाच तो मनोरंजनासाठी सुद्धा केला जातो. सोशल मिडीयावर (social media) विविध मनोरंजनात्मक व्हिडिओ (video) आपल्याला रोजच पाहायला मिळतात. यातले काही व्हिडिओ अतिशय मजेशीर असतात, तर काही व्हिडिओ धक्कादायक आणि गंभीर सुद्धा असतात. नेटकर्‍यांकडून मात्र या व्हिडीओंना चांगला प्रतिसाद मिळत असतो. त्यामुळे अशा प्रकारचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात. सध्या सोशल मिडीयावर (social media Viral video) असाच एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. (animals viral video)

प्राण्यांच्या लढतीचे अनेक व्हिडीओ आपण पाहिले आहेत. मात्र हा व्हिडीओ पाहून तुम्ही थेट डोक्यालाच हात लावाल. याशिवाय या व्हिडीओतील गंमत पाहून तर तुम्ही पोट दुखेपर्यंत हसाल. यामध्ये चक्क माकड आणि सापामध्येच जुंपली असून दोघेही हार मानायला तयार नसल्याचं दिसत आहे. किंग कोब्रा लगावरून अनेक मोठमोठे प्राणी देखील धूम ठोकून पळून जातात मात्र माकडाने किंग कोब्रा सोबत दोन हात करत सगळ्यांनाच धक्का दिला.

किंग कोब्रा (King Kobra and monkey video) हा सर्वात विषारी साप आहे. त्यामुळे बर्‍याचदा किंग कोब्राचे रेस्क्यु करत असताना सुद्धा प्रचंड सावधगिरी बाळगली जाते. किंग कोब्राचे विष इतके प्रभावी असते की, त्याने डंख मारल्यानंतर मृत्यच्या दारातून सुटण्याची शक्यता जवळजवळ मावळते. असं असताना देखील माकडाने चक्क किंग कोब्राशी दोन हात करण्याची हिंमत केली. माकड एवढ्यावरच थांबले नाही तर माकडाने या किंग कोब्राची मजा सुद्धा घेतली. त्यामुळे माकडाच्या या कृत्यामुळे व्हिडिओ पाहताना तुमची हसू आवरता आवरता चांगलीच पंचाईत होईल.

सोशल मीडियावर व्हायरल झालेले व्हिडिओत चुकून किंग कोब्रा माकडाच्या समोर आला. परंतू समोर किंग कोब्रा दिसताच तेथून निसटण्याऐवजी त्या माकडाने, थेट त्याला अंगावर घेण्याचा निर्धार केला. घाबरुन पळून न जाता, माकडाने थेट कोब्राची शेपटी धरली आणि त्याला ओढत नेले. कोब्राने त्यावेळीच माकडावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र माकड त्याला चकवून इकडून तिकडे उड्या मारताना सुटलं. वारंवार एका जागेवरुन, दुसर्‍या जागेवर उड्या मारत माकडाने त्या सापाला अक्षरश: भारावून सोडले.

माकडाच्या या करामतींमुळे किंग कोब्रा प्रचंड खवळला. अखेर त्याने खवळून पुन्हा फणा काढला. मात्र हे माकड चांगलेच निर्भीड निघाले. या माकडाने त्याला घाबरण्याऐवजी त्याच्या फण्यावरच एक जोराची चापट मारली. व्हिडीओमध्ये किंग कोब्राची झालेली पंचाईत बघून हसू आवरणे कठीण आहे. त्यामुळे सोशल मिडीयावर हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतो आहे.

हिंस्त्र प्राण्यांच्या एकमेकांविरोधातील लढाया आपण नेहमी पाहतो. मात्र साप विरुद्ध माकड अशी लढाई पहिल्यांदा बघायला मिळते आहे. विशेष म्हणजे, सहसा साप समोर असताना इतर प्राण्यांकडून माघार घेतली जाते. मात्र हे माकड कमालीचे निर्भीड निघाले. त्यातल्या-त्यात हे माकड पाळीव असल्याचे व्हिडीओमध्ये पाहून जाणवते आहे. कारण या माकडाच्या गळ्यात एक साखळी बांधलेली बघायला मिळते. साखळीने बांधलेले असून देखील या माकडाने केलेल्या करामतीमुळे सापाची अक्षरश: तारांबळ उडाल्याची या व्हिडीओत बघायला मिळत आहे.

हे देखील वाचाVirat Kohli: इच्छा नसूनही रोहीत शर्मामुळे BCCI ला द्यावा लागतोय विराट कोहलीचा बळी..

BCCI: भूकंप! BCCI संधीच देत नसल्याने या खेळाडूने अखेर दुसर्‍या देशाकडून खेळण्याचा घेतला निर्णय..

Bigg Boss season 16: बिग बॉस 16 च्या विजेत्या स्पर्धकाचे नाव आले समोर; जाणून घ्या धुमाकुळ घालणाऱ्या या स्पर्धकाचे नाव..

Babar Azam Sexting Video: मित्राच्या गर्लफ्रेंड सोबत बाबर आझमचे तसले व्हिडिओ व्हायरल; क्रिकेट विश्वात एकच खळबळ..

PM Kisan Maandhan Yojana: या योजनेअंतर्गत शेतकर्‍यांना सरकार देतंय दरमहा तीन हजार; जाणून घ्या लगेच..

Aadhar card: आधार कार्डवरून बँक अकाउंट  केलं जातंय रिकामं; त्वरित फॉलो करा या टीप्स..

Sex Life Tips: सेक्स लाईफचा आनंद द्विगुणित करायचाय? फॉलो करा या चार गोष्टी..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.