Bigg Boss season 16: बिग बॉस 16 च्या विजेत्या स्पर्धकाचे नाव आले समोर; जाणून घ्या धुमाकुळ घालणाऱ्या या स्पर्धकाचे नाव..

0

Bigg Boss season 16: सध्या बिग बॉस सीजन 16 सुरु आहे. बिग बॉसच्या १६वा सिझन (bigg Boss season 16) आता अंतिम टप्प्यात आला आहे. त्यामुळे या शोमध्ये रोज काही ना काही ट्विस्ट पाहायला मिळतोय. ग्रॅन्ड finale (grand finale) अद्याप एक महिना वेळ आहे. मात्र रोजच्या घडामोडींमुळे प्रेक्षकांच्या उत्कंठा सुद्धा वाढत आहे. अशातच श्रीजिता डे (Sreejita De) साजिद खान (Sajid Khan) आणि प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळवणारा सर्वांचा लाडका अब्दु रोजिक (Abdu Rozik) सुद्धा शो मधून बाहेर पडला आहे. त्यामुळे बिग बॉसच्या घरातील स्पर्धा आता अधिकच रंगतदार झाली आहे.

बिग बॉसच्या घरात प्रत्येक आठवड्यात होणार्‍या विकेंड वॉर एपीसोडच्या अगोदरच तीन स्पर्धकांवर घराच्या बाहेर जाण्याची वेळ आली. त्यामध्ये साजिद खानचा सुद्धा समावेश आहे. साजिद खान हा एका ग्रुपचा मास्टरमाईंड आहे. त्यामुळे हा ग्रुप काहीसा कमजोर झाला आहे. या ग्रुपमधीलच अब्दुल रेजिकला सुद्धा बाहेर जावे लागले. त्यामुळे आता या ग्रुपपमध्ये उर्वरीत शिव ठाकरे, एमसी स्टॅन (MC Stan) सुम्बुल तौकीर खान (Sumbul Touqeer) आणि निमृत अहलूवालिया यांच्या समोर मोठे आव्हान असणार आहे. तरीही शिव ठाकरे (Shiv Thakare) कमालीची लढत देतो आहे.

शिव ठाकरेला त्याच्या ग्रुपमधून सुद्धा चांगला सपोर्ट मिळत आहे. मात्र टेलीव्हीजनवर सुनेच्या भुमिकेने सगळ्यांची मने जिंकणारी प्रियंका चाहर चौधरी (Priyanka Chahar Chaudhary) हीने शिव ठाकरे समोर मोठे आव्हान उभे केले आहे. सध्या शिव ठाकरे, प्रियंका चाहर चौधरी आणि रॅपर ‘एमसी स्टॅन’ हे तीन स्पर्धक ‘ग्रँड फिनालय’ दाखल झालेले आहेत. मात्र यात खरी लढत शिव ठाकरे आणि प्रियांका चाहर चौधरी यांमध्येच आहे.

टेलीव्हीजनवरील आपल्या भूमिकेने प्रियांकाने अगोदरच प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. तसेच बिग बॉसच्या घरातील एक-एक यशाची पायरी ती गाठत आहे. सोशल मिडीयावर सुद्धा तिला भरपूर प्रतिसाद मिळतो आहे. यासोबतच नुकत्याच झालेल्या बिगेस्ट बॉस कॉन्टेस्टमध्ये प्रियांकाने शिव ठाकरेवर विजय मिळवला आहे. त्यामुळे आता तिच्या चाहत्यांनी तिलाच बिग बॉस १६ ची विजेती घोषित केले आहे.

‘ग्रँड फिनालय’ला अद्याप एक महिन्याचा अवधी बाकी आहे. त्यामुळे या एक महिन्यांत बिग बॉसच्या घरात कोणत्या मोठ्या घडामोडी घडतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. कारण एका महिन्यात घडणार्‍या या घडामोडींवरुन बिग बॉस १६ चा विजेता ठरणार आहे. त्यामुळे पुढील एका महिन्यांत काय होणार हे बघणे औत्सुक्याचे असणार आहे.

सध्या बिग बॉसच्या घरात शिव ठाकरे आणि प्रियांका चहर चौधरी यांच्याशिवाय टिना दत्ता, (Tina Datta) शालीन भनोट (Shalin Bhanot) अर्चना गौतम (Archana Gautam) एमसी स्टॅन (MC Stan) ) आणि सौंदर्या (Soundarya) असे स्पर्धक आहेत. मात्र टिना दत्ता आणि शालीन भनोट इतर मुद्द्यांमध्येच गुंतल्या आहेत. अर्चना गौतम (Archana Gautam) केवळ एन्टरटेनमेंटसाठी घरात असल्याचे बोलले जात आहे.

तसेच सौंदर्या सुद्धा तिच्या ध्येयापासून लांब आहे. एमसी स्टॅन सुद्धा पिछाडीवर पडतो आहे. अशात आता शिव ठाकरे आणि प्रियांका चौधरी यांच्यात थेट लढत आहे. या दोघांच्याही चाहत्यांकडून त्यांना भरभरुन प्रतिसाद मिळतोय. मात्र या दोघांपैकी बिग बॉस१६ च्या सीजनवर, कोण आपले नाव कोरणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार असले तरी प्रियांका चौधरी बिग बॉस सिझन16 ची विजेती होईल असा अंदाज विश्लेषकांनी वर्तवला आहे.

हे देखील वाचा Virat Kohli: इच्छा नसूनही रोहीत शर्मामुळे BCCI ला द्यावा लागतोय विराट कोहलीचा बळी..

BCCI: भूकंप! BCCI संधीच देत नसल्याने या खेळाडूने अखेर दुसर्‍या देशाकडून खेळण्याचा घेतला निर्णय..

Babar Azam Sexting Video: मित्राच्या गर्लफ्रेंड सोबत बाबर आझमचे तसले व्हिडिओ व्हायरल; क्रिकेट विश्वात एकच खळबळ..

Amruta fadnavis: मकर संक्रांतीच्या या शुभेच्छामुळे अमृता फडणवीस पुन्हा ट्रोल; पाहा व्हिडिओ..

Aadhar card: आधार कार्डवरून बँक अकाउंट  केलं जातंय रिकामं; त्वरित फॉलो करा या टीप्स..

PM Kisan Maandhan Yojana: या योजनेअंतर्गत शेतकर्‍यांना सरकार देतंय दरमहा तीन हजार; जाणून घ्या लगेच..

Sex Life Tips: सेक्स लाईफचा आनंद द्विगुणित करायचाय? फॉलो करा या चार गोष्टी..

Sex Mistakes: सेक्स केल्यानंतर चुकूनही करू नका हे काम अन्यथा..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.