IB Recruitment 2023: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी या विभागात मेगा भरती; लगेच जाणून घ्या सर्व डिटेल्स..

0

IB Recruitment 2023: वाढत्या बेरोजागरीमुळे तरुणांच्या मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. लाखो युवक आज नोकरीच्या शोधात आहेत. पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेऊन सुद्धा नोकरी नसणार्‍यांची संख्या पुष्कळ आहे. परंतू हा बेरोजगारीचा दर कमी व्हावा यासाठी प्रयत्न सुरु आहेत. मोठ्या संख्येत पदभरती काढण्यासाठी सरकारने पाऊले ऊचलण्यास सुरुवात केली आहे. अशातच एका पदभरतीची जाहीरात काढण्यात आली आहे. ज्यामध्ये १० वी उत्तीर्ण असणार्‍यांना नोकरी मिळू शकणार आहे.

थेट केंद्र सरकारकडून ही भरती काढण्यात आली आहे. या पदभरतीने इंटेलिजेंस ब्युरोमध्ये विभागातील एकुण १६७५ रिक्त पदे भरली जाणार आहेत. विशेष म्हणजे १०वी उत्तीर्ण उमेदवार सुद्धा या भरती प्रक्रियेत सहभागी होऊ शकणार आहेत. त्यामुळे १० वी पास असणार्‍यांसाठीर ही सुवर्णसंधी आहे.  नेमक्या कुठल्या पदांसाठी ही भरती काढण्यात आली आहे? तसेच भरतीची पात्रता व निकष काय? याबाबत जाणून घेऊया सविस्तर.

इंटेलिजेंस ब्युरो या भरतीची अधिसुचना जारी करण्यात आलेली आहे. २१ जानेवारी २०२३ पासून इच्छुकांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख १० फेब्रुवारी २०२३ असणार आहे. अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन असून https://www.mha.gov.in/ या संकेतस्थळावर अर्ज करता येणार आहे.

इंटेलिजेंस ब्युरो अंतर्गत जाहीर करण्यात आलेल्या अधिसुचनेनुसार सुरक्षा सहाय्यक तथा सुरक्षा कार्यकारी व मल्टि टास्कींग स्टाफ रिक्त पदांच्या दोन जागा सुरक्षा सहाय्यक अधिकारी या पदासाठी १५२५ रिक्त जागा तर मल्टि टास्कींग स्टाफ या पदासाठी १५० रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या जागांसाठी मान्यताप्राप्त मंडळातून दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच बोलीभाषेचे प्राथमिक ज्ञान जरुरी आहे. या जागांसाठी वय वर्षे १८ ते २७ निश्चित करण्यात आले आहे. सरकारी नियमानुसार कॅटेगिरीच्या विद्यार्थ्यांना वयोमर्यादेत सूट दिली जाणार आहे.

इंटेलिजेंस ब्युरो अंतर्गत जाहीर करण्यात आलेल्या भरती अंतर्गत नोकरीच्या ठिकाणाबाबत कुठलीही स्पष्टता करण्यात आलेली नाही. संपूर्ण भारतामध्ये कुठेही नोकरीचे ठिकाण असेल असे अधिसूचनेत नमूद करण्यात आलेले आहे. या पदांच्या भरतीसाठी परिक्षा घेतली जाणार असून, ४५० रुपये परिक्षेची फी असणार आहे. कॅटेगिरी च्या विद्यार्थ्यांना परीक्षा फी मध्ये सवलत दिली जाणार आहे.

कशी असेल निवड प्रक्रिया

सर्वप्रथम अर्जदाराची लेखी परिक्षा घेतली जाईल. ज्यामध्ये दोन टप्प्यात ही परिक्षा होणार आहे. टियर 1 आणि टियर 2 असे या परिक्षेचे स्वरुप आहे. टियर 1 मध्ये उद्दिष्टात्मक प्रश्न असतील, तर टियर 2 मध्ये वर्णनात्मक प्रश्न असणार आहेत. काही विशेष अर्जदारांसाठी स्थानिक भाषा चाचणी सुद्धा ठेवण्यात आली आहे.

परिक्षेनंतर अर्जदाराला मुलाखतीसाठी बोलावण्यात येईल. मुलाखतीनंतर दस्तऐवज तपासणी आणि वैद्यकीय तपासणी होईल, ज्यानंतर अर्जदाराची नोकरीसाठी निवड करण्यात येईल. त्यामुळे जर तुम्ही गुप्तचर विभागामध्ये काम करण्यास उत्सुक असाल आणि वरील सर्व निकषांमध्ये बसत असाल तर ही तुमच्या साठी सुवर्णसंधी ठरु शकते.

हे देखील वाचा Babar Azam Sexting Video: मित्राच्या गर्लफ्रेंड सोबत बाबर आझमचे तसले व्हिडिओ व्हायरल; क्रिकेट विश्वात एकच खळबळ..

Virat Kohli: इच्छा नसूनही रोहीत शर्मामुळे BCCI ला द्यावा लागतोय विराट कोहलीचा बळी..

BCCI: भूकंप! BCCI संधीच देत नसल्याने या खेळाडूने अखेर दुसर्‍या देशाकडून खेळण्याचा घेतला निर्णय..

PM Kisan Yojana: म्हणून PM किसान योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या होतेय कमी; आत्ताच जाणून घ्या, अन्यथा मिळणार नाही १३ वा हप्ता..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.