Ration Card: सरकारचा मोठा निर्णय! या 14 जिल्ह्यांना मिळणार रेशन ऐवजी वर्षाला 36 हजार रुपये..

0

Ration Card: शेतकऱ्यांचे (farmer) जीवनमान उंचावण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून अनेक योजना राबवण्यात येतात. राज्यातल्या आत्महत्याग्रस्त भागातील शेतकऱ्यांना इतर शेतकऱ्यांच्या तुलनेत अनेक योजना राबवण्याचे काम राज्य सरकारकडून केले जाते. आता अशीच एक योजना राज्य सरकारने राबवण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या अडचणी कमी होण्यासाठी राज्य सरकारने स्वस्त धान्य देण्याऐवजी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या बँक अकाऊंटमध्ये थेट पैसे टाकण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेणार आहे.

राज्य सरकारच्या या महत्वपूर्ण योजनेचा लाभ राज्यातील एकूण 14 आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील शेतकऱ्यांना होणार आहे. एकूण 40 लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. यापूर्वी 14 आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील शेतकऱ्यांना स्वस्त धान्य देण्यात येत होते. मात्र काही महिन्यांपूर्वी ही योजना बंद केली होती. यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सुर उमटत होता. परंतु आता या संदर्भात बैठक झाली असून, राज्य सरकार आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दरवर्षी तब्बल 36 हजार रुपये देणार आहे.

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 59 हजार पासून एक लाखापर्यंत होते, अशा शेतकऱ्यांना दोन रुपये किलो गहू आणि तीन रूपये किलो तांदूळ या दराप्रमाणे धान्याचे वाटप केले जात होते. मात्र जुलै आणि सप्टेंबरमध्ये गहू आणि तांदूळ बंद करण्यात आला होता. मात्र आता पुन्हा एकदा 14 आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील शेतकऱ्यांना स्वस्त धान्य देण्याऐवजी कुटुंबातील महिलेच्या थेट बँक खात्यात पैसे पाठवण्याचा निर्णय झाला असल्याची माहिती आहे.

योजनेचे स्वरुप

आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार असून, कुटुंबातील प्रत्येकी एका व्यक्तीला वर्षाकाठी नऊ हजार रुपये देण्याचा राज्य सरकारचा मानस आहे. जर कुटुंबात चार व्यक्ती असतील, तर वर्षाकाठी 36 हजार रुपये कुटुंबाला लाभ मिळणार आहे. राज्य सरकार हा निधी कुटुंबातील महिलेच्या बँक अकाउंटवर जमा करणार आहे. त्यासाठी कुटुंबातील एका महिलेचे बँक खाते आधार कार्डशी लिंक असणे आवश्यक आहे. कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीच्या अकाऊंटवर दरमहा दीडशे रुपये जमा केले जाणार आहेत.

कोणत्या जिल्ह्यांना मिळणार लाभ

राज्यातील आत्महत्याग्रस्त जिल्ह्याला या योजनेचा लाभ घेता येणार आहे. यामध्ये. अमरावती, बुलढाणा, हिंगोली बीड वर्धा औरंगाबाद, लातूर, अकोला, वाशिम, परभणी, नांदेड, यवतमाळ उस्मानाबाद आणि जालना या एकूण 14 जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा घेता येणार आहे.

हे देखील वाचाYuzvendra Chahal: चहल होणार पिता, इतक्या महिन्यांची गरोदर आहे धनश्री; पाहा व्हिडिओ..

MSRTC Recruitment 2023: ST महामंडळात या उमेदवारांसाठी तब्बल इतक्या पदांची मेगा भरती; लगेच करा अर्ज..

Hug Day: मित्र आणि जोडीदाराला मारलेल्या मिठीतला हा फरक माहीत असायलाच हवा अन्यथा गमवाल..

Income Tax Recruitment 2023: आयकर विभागात या उमेदवारांसाठी मोठी भरती; जाणून घ्या डिटेल्स..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.