Yuzvendra Chahal: चहल होणार पिता, इतक्या महिन्यांची गरोदर आहे धनश्री; पाहा व्हिडिओ..

0

Yuzvendra Chahal: भारताचा स्टार क्रिकेटर युजवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्माच्या (Yuzvendra Chahal and Dhanashree Verma) चाहत्यांसाठी गूड न्यूज आहे. गेल्या काही दिवसांपासून या दोघांच्या नात्यात दुरावा आल्याचं बोललं जात होतं. मात्र या सगळ्या अफवा असल्याचं समोर आले असून चहल लवकरच पिता होणार असल्याची माहिती समोर आली आहे. या संदर्भातला एक व्हिडिओ देखील समोर आला असून या चर्चांना उधाण आले आहे. कियारा अडवाणीही आलिया प्रमाणे लग्नापूर्वीच प्रेग्नेंट; व्हिडिओ आला समोर..

सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात कसोटी मालिका सुरू असून, भारतीय संघ कमालीचा फॉर्ममध्ये आहे. एकीकडे भारतीय संघ जबरदस्त फॉर्ममध्ये असला तरी दुसरीकडे मात्र अंतिम 11 मध्ये युजवेंद्र चहलला पुरेशी संधी मिळत नसल्याचं चित्र आहे. चहलला सतत अंतिम अकरा मधून आत बाहेर केल्यामुळे युजवेंद्र चाहलचा फॉर्म थोडासा खाली गेला आहे. नुकत्याच पार पडलेल्या टी-ट्वेंटी विश्वचषकामध्ये देखील एकही सामना खेळण्याची संधी चहलला मिळाली नव्हती.

गेल्या काही महिन्यांपूर्वी चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा या दोघांमध्ये काहीतरी बिनसलं असल्याच्या बातम्या देखील प्रसारित झाल्या होत्या. श्रेयस अय्यर धनश्री वर्माला डेट करत असल्याचं बोललं गेलं. (Shreyas Iyer Dhanashree Verma deting) या दोघांच्या बातम्या येत असतानाच चहलने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक स्टोरी पोस्ट केली. आजपासून एका नव्या आयुष्याला सुरुवात. असं कॅपशन देत त्याने एक फोटो पोस्ट केला होता. एवढंच नाही तर धनश्रीने देखील आपल्या इंस्टाग्राम वरून चहल हे आडनाव काढून टाकले होते.

श्रेयस अय्यर चहलच्या पत्नीला डेट करत असल्याच्या बातम्या प्रसारित झाल्यानंतर, धनश्री वर्माने यावर आपली भूमिका स्पष्ट केली. या सगळ्या अफवा असल्याचं स्पष्ट करताना तिने चहल आणि मी खूप खुश असल्याचं म्हटलं. पुढे या चर्चांना पूर्णविराम मिळाला. आता पुन्हा एकदा हे कपल चर्चेत आले आहे. नुकताच या दोघांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत चहलची पत्नी धनश्री वर्मा बेबी बंप लावताना पाहायला मिळत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत चहलने ऑफ व्हाईट कलरचा टी-शर्ट आणि ब्ल्यू जीन्स परिधान केली आहे. तर धनश्रीने पिवळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. या व्हिडिओत धनश्री गरोदर असल्याचं सोशल मीडियावर बोललं जात आहे. एवढंच नाही तर काही युजर्सने धनश्री तीन महिन्यांची गरोदर असल्याचं देखील म्हंटले.

या व्हिडिओ खाली कमेंट करताना चाहते चहलला शुभेच्छा देखील देत असल्याचं पाहायला मिळत आहे. लिहून घ्या, धनश्री वर्मा गरोदर आहे. अशी देखील कमेंट एका युजर्सने केली आहे. चहलची पत्नी गरोदर असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगल्या असल्यातरी या संदर्भात अद्याप अधिकृत माहिती समोर आली नाही. मात्र काही माध्यमांनी या संदर्भातले वृत्त दिले आहे.

हे देखील वाचा Job: या उमेदवारांसाठी दूरसंचार विभागात नोकरीची मोठी संधी; जाणून घ्या लगेच..

Chanakya Niti: ..म्हणून विवाहित पुरूष दुसऱ्यांच्या बायकांकडे होतात आकर्षित; चाणक्यांनी सांगितलेली चार कारणे जाणून बसेल धक्का..

Relationship Tips: लग्नानंतर पार्टनर सोबत असं केलं तरच प्रेम आणि सन्मान वाढतो..

MSRTC Recruitment 2023: ST महामंडळात या उमेदवारांसाठी तब्बल इतक्या पदांची मेगा भरती; लगेच करा अर्ज..

Hug Day: मित्र आणि जोडीदाराला मारलेल्या मिठीतला हा फरक माहीत असायलाच हवा अन्यथा गमवाल..

Income Tax Recruitment 2023: आयकर विभागात या उमेदवारांसाठी मोठी भरती; जाणून घ्या डिटेल्स..

Kiara Advani: कियारा अडवाणीही आलिया प्रमाणे लग्नापूर्वीच प्रेग्नेंट; व्हिडिओ आला समोर..

Workout Tips: रिकाम्या पोटी वर्कआऊट करत असाल तर त्वरित थांबवा; जाणून घ्या व्यायामाची योग्य वेळ..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.