Workout Tips: रिकाम्या पोटी वर्कआऊट करत असाल तर त्वरित थांबवा; जाणून घ्या व्यायामाची योग्य वेळ..

0

Workout Tips: निरोगी आरोग्य (Healthy health) ठेवण्यासाठी नियमितपणे व्यायाम (Workout) करणे फार महत्त्वाचं असतं. हे वेगळं सांगण्याची गरज नाही. अलीकडे अनेक जण आरोग्याच्या समस्येपासून दूर राहण्यासाठी नियमितपणे व्यायाम देखील करत असल्याचं पाहायला मिळतं. मात्र अनेकांना व्यायाम करण्याची योग्य पद्धत माहित नसल्यामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. तुम्ही देखील रिकाम्या पोटी व्यायाम करत असाल, तर त्वरित थांबवा, अन्यथा आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवतील. (Side Effects of Doing Workout on an Empty Stomach)

आपण पाहतो, बरेचजण सकाळी वर्कआउट करणं पसंत करतात. साहजिकच यामुळे अनेक जण रिकाम्या पोटी व्यायाम करत असल्याचे दिसते. मात्र तुमची ही सवय तुमच्या आरोग्यासाठी खूप हानिकारक करू शकते. रिकाम्या पोटी व्यायाम केल्यामुळे, तुम्हाला डीहायड्रेशन, अशक्तपणा त्याचबरोबर पोटदुखी यासारख्या अनेक समस्या उद्भवण्याची दाट शक्यता असते. एवढेच नाही, तर पोटात काहीही नसल्यामुळे तुमची साखर देखील कमी होण्याची अधिक शक्यता असते. जाणून घेऊया, व्यायाम करण्याची योग्य वेळ आणि रिकाम्या पोटी व्यायाम केल्यामुळे कोणते दुष्परिणाम होऊ शकतात.

थकवा/अशक्तपणा

अनेकांना सकाळी वर्कआउट करायची सवय असते. मात्र सकाळी पोटात काहीही नसतं. सकाळी-सकाळी रिकामं पोट असल्यामुळे तुम्हाला थकवा त्याचबरोबर अशक्तपणा देखील येण्याची अधिक शक्यता असते. शरीरामध्ये ऊर्जा कमी प्रमाणात असते. आणि म्हणून नेहमी रिकाम्या पोटी वर्कआउट करणे आवश्यक आहे. सकाळी उठल्यानंतर गरम पाणी पिल्यानंतर तुम्ही केळी किंवा काही प्रमाणात ओट्स खाणे आवश्यक आहे.

रक्तातील साखरेची पातळी

सकाळी व्यायाम करणे ही एक उत्तम सवय आहे. मात्र चुकूनही रिकाम्यापोटी सकाळी व्यायाम करू नये. पोटामध्ये काही नसेल आणि जर तुम्ही व्यायाम करत असाल, तर नेहमी रक्तातील साखरेची कमी होण्याची दाट शक्यता असते. सोबतच डीहायड्रेट, उलट्या मळमळ इत्यादी लक्षणे देखील तुम्हाला जाणवण्याची अधिक शक्यता असते. जर तुम्हाला साखरेचा त्रास असेल, तर चुकूनही तुम्ही सकाळी वर्कआउट करू नका. अन्यथा गंभीर परिणामाला सामोरे जावे लागू शकते.

रिकाम्या पोटी व्यायाम केल्यामुळे स्नायूंना दुखापत होण्याची देखील शक्यता अधिक असते. आणि म्हणून व्यायाम करण्यापूर्वी केळी ओट्स यासारखे पदार्थ कमी प्रमाणात खाणे आवश्यक आहे. रिकाम्या पोटी व्यायाम करण्याचे दुष्परिणाम आपण जाणून घेतले, मात्र व्यायाम करण्याची योग्य वेळ काय आहे? हे देखील जाणून घेऊया. सकाळी उठल्यानंतर एक ग्लास कोमट पाणी नियमितपणे पिने आवश्यक आहे.

कोमट पाणी पिल्यानंतर बरोबर अर्ध्या तासानंतर तुम्ही दोन केळी किंवा कमी प्रमाणात ओट्स खाणे आवश्यक आहे. या दोन्ही पदार्थांव्यतिरिक्त सकाळी उठल्यानंतर गरम पाणी पिल्यानंतर बरोबर अर्ध्या तासाने दोन अंडी देखील खाऊ शकता. नियमितपणे जर तुम्ही या गोष्टींची काळजी घेतली तर तुम्हाला पूर्वीपेक्षा अधिक जास्त प्रमाणात व्यायामाचे परिणाम जाणवू लागतील.

हे देखील वाचा Life Hacks: या ट्रीकचा वापर करा, स्वयंपाक गॅस सिलेंडर चालेल दुप्पट..

Chanakya Niti: ..म्हणून विवाहित पुरूष दुसऱ्यांच्या बायकांकडे होतात आकर्षित; चाणक्यांनी सांगितलेली चार कारणे जाणून बसेल धक्का..

IND vs AUS: स्मिथ-वॉर्नर प्रमाणे जडेजानेही केली चेंडू सोबत छेडछाड; व्हिडिओ समोर आल्याने उडाली खळबळ..

Job: या उमेदवारांसाठी दूरसंचार विभागात नोकरीची मोठी संधी; जाणून घ्या लगेच..

Relationship Tips: लग्नानंतर पार्टनर सोबत असं केलं तरच प्रेम आणि सन्मान वाढतो..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.